Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर; पर्जन्य, शेती, आरोग्य व विकास कामांचा घेणार आढावा
- मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यात मदत कक्ष कार्यरत विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क क्रमांक जाहीर; नागरिकांना थेट संपर्काचे आवाहन
- ज्येष्ठ शिक्षणप्रेमी कुटुंबातील मातृछत्र हरपले; सौ. नवसाबाई रतीलाल रोकडे यांचे निधन
- संघर्षातून घडलेले नेतृत्व… जनतेच्या विश्वासाचे नाव!
- विकासाचा ध्यास, जनसेवेचा श्वास… खानदेशाच्या पहिल्या महिला खासदार डॉ. हिनाताई विजयकुमार गावित यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
- आंतरराज्यीय मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ३०.३० लाखांच्या ३२ दुचाकी जप्त, नंदुरबार एलसीबीची धडाकेबाज कामगिरी
- नंदुरबार पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम; ३५.२० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, जिल्ह्यात सुरक्षिततेची भावना अधिक बळकट
- शेतकऱ्यांच्या घामाच्या कमाईवर चोरट्यांचा डल्ला; ग्रामीण भागातील वाढत्या चोरींनी शेतकरी भयभीत, पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा
Author: जगदिश निळकंठ सोनवणे
मुंबई (मुंबई) – महाराष्ट्र राज्य परिषद वर्गीय कर्मचारी कर्मचारी-615 संघ आणि भारतीय मजदूर यांच्या संयुक्त क्षेत्रीय जिल्हा परिषद लिपिकांच्या विविध लिपी ग्रामविकास मंत्री जय गोरे दालन बैठक पार पडली. या लिपिकांच्या पदोन्नतीचे स्तर कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकी दरम्यान कनिष्ठ सहायक लिपी आणि वरिष्ठ सहायक लिपीक दोन पदे एकत्र करून “विकास सहयोगी” हे नवे पदनाम आपले प्रस्ताव मांडण्यात आले. तसेच या पदासाठी S-6 वेतनश्रेणी व्यवस्था ठेवावी, अशी भूमिका मांडली. पदांचे एकत्रीकरणाचे परिणाम प्रचलित विश्वस्वरूप आणि परिणाम काही होणार नाही, सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यपद्धतीचे मत विचारात घ्या, मुख्य भूमिका जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली.…
नंदुरबार : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना नंदुरबार जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात सध्या सुमारे १९ हजार स्वयं सहायता समूह कार्यरत असून महिलांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी अभियान प्रभावीपणे काम करीत आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर शेजारील डोम येथे २५ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत जिल्हास्तरीय ‘नंदिनी मिनी सरस’ प्रदर्शन व विक्री मेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रदर्शनाचे उद्घाटन नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲड. गोवाल पाडवी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी जिल्हाधिकारी मिताली शेठी, जिल्हा…
नंदुरबार : शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात भारतीय फार्मसीचे जनक महादेवलाल श्रॉफ तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांच्या हस्ते महादेवलाल श्रॉफ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी महान व्यक्तिमत्त्वांना अभिवादन करून त्यांच्या कार्याची आठवण काढली. यावेळी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना भारतीय फार्मसी शिक्षणाच्या उभारणीत महादेवलाल श्रॉफ यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. त्यांनी फार्मसी शिक्षणाला वैज्ञानिक दिशा देत देशातील औषधनिर्मिती क्षेत्राच्या प्रगतीस मोठी चालना दिली. त्यांच्या कार्यामुळे आज भारतात…
लेखक: कमल माडिशेट्टी १२ फेब्रुवारी रोजी केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने दिलेला “भारत बंद” हा देशव्यापी पातळीवर संघटित कामगार शक्तीचे प्रदर्शन मानला गेला. संघटनांनी मोठ्या प्रतिसादाचा दावा केला; मात्र विविध राज्यांतील प्रत्यक्ष चित्र मिश्र स्वरूपाचे दिसले. काही औद्योगिक पट्ट्यांत आंशिक कामबंदी दिसून आली, तर अनेक शहरांमध्ये व्यापारी व्यवहार आणि सार्वजनिक वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरूच होती. या पार्श्वभूमीवर एक व्यापक प्रश्न पुन्हा समोर आला—भारतातील कामगार संघटनांची ताकद आणि प्रभाव आज नेमका कुठे उभा आहे? ◆ अनौपचारिक अर्थव्यवस्थेची वस्तुस्थिती भारताचा कामगार बाजार दीर्घकाळापासून अनौपचारिक स्वरूपाचा आहे. विविध श्रमशक्ती सर्वेक्षणांनुसार सुमारे ८५–९० टक्के कामगार अजूनही अनौपचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत. स्व-रोजगार, कंत्राटी पद्धती,…
नंदुरबार (प्रतिनिधी) नंदुरबार जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने कोपरगाव येथे होणाऱ्या महाराष्ट्र ऍथलेटिक्स असोसिएशन आयोजित सब-ज्युनिअर गटाच्या राज्यस्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघाची निवड करण्यात आली आहे. या निवड चाचणी स्पर्धा नंदुरबार येथील जिल्हा क्रीडा संकुलात उत्साहात संपन्न झाल्या असून निवड झालेले खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. निवड झालेल्या खेळाडूंना नंदुरबार जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच उपाध्यक्ष प्रा. दिलीप जानराव यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेचे सचिव डॉ. मयूर ठाकरे, तलवारबाजी संघटनेचे सचिव बाबुराव जाधव, क्रीडाशिक्षक तुषार सोनवणे, योगेश माळी, रुपेश महाजन, चेतन शेवाळे, आर्चरी संघटनेचे सचिव राजेश्वर चौधरी,डॉ.…
नंदुरबार (प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्रशासनातील विविध विभागात दीर्घकाळ सेवा देऊन सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान व्हावा तसेच सेवापुर्तीच्या दिवशीच त्यांना सर्व सेवाविषयक लाभ मिळावेत, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या याहा मोगी सभागृहात सामान्य प्रशासन विभागामार्फत जानेवारीअखेर सेवानिवृत्त झालेल्या वर्ग–३ व वर्ग–४ मधील कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना नमन गोयल बोलत होते. त्यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. श्री गोयल म्हणाले की, जिल्हा परिषद प्रशासनातील कर्मचारी आपल्या आयुष्यातील ३० ते ३५ वर्षे प्रामाणिकपणे सेवा देतात.…
नंदुरबार, (दि. २ फेब्रुवारी २०२६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ हा वाढ, समावेश आणि सुधारणा यांचा समतोल साधणारा असून ‘विकसित भारत २०४७’ या ध्येयाच्या दिशेने देशाला वेगाने पुढे नेणारा आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेश महामंत्री मा. श्री. विजयभाऊ चौधरी यांनी केले. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हा कार्यालय, नंदुरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, जिल्हाध्यक्ष निलेश माळी व जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी उपस्थित होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत भाजपची भूमिका मांडताना विजय चौधरी यांनी सांगितले की, हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला, विद्यार्थी,…
नंदुरबार (प्रतिनिधी) ग्रामीण भारतातील रोजगार व आजीविका उन्नतीसाठी केंद्र सरकारने आणलेला विकसित भारत रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण अधिनियम, 2025 (VB GRAM G) ग्रामीण विकास धोरणात नवा अध्याय उघडणारा ठरत आहे. मनरेगाच्या जागी लागू झालेल्या या नव्या कायद्यामुळे रोजगार निर्मिती केवळ तात्पुरत्या मजुरीपुरती न राहता कौशल्यविकास, टिकाऊ मालमत्ता निर्मिती आणि दीर्घकालीन आजीविकेशी जोडली जात आहे. ◆ रोजगाराला स्थैर्याची दिशा VB GRAM G अंतर्गत रोजगार सहाय्य अधिक शिस्तबद्ध, मोजता येण्याजोगे आणि उत्तरदायित्वाशी जोडलेले करण्यात आले आहे. ठरावीक कालमर्यादा, परिणामांवर आधारित निधी वितरण आणि संस्थात्मक जबाबदाऱ्या यामुळे काम मिळण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होणार आहे. यामुळे मजुरी विलंब, काम न मिळणे अशा…
नंदुरबार (प्रतिनिधी) जिल्ह्याचे भाग्यविधाते, जिल्हा निर्मितीचे शिल्पकार आणि जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करणारे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित साहेब यांच्यावर नाशिक येथे दि. ८ जानेवारी रोजी हृदयविकाराची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले. सध्या देवाच्या कृपेने साहेबांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत असल्याचे समजते. ही बातमी ऐकताच संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्ते, समर्थक व सामान्य नागरिकांमध्ये दिलासा आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे. डॉ. विजयकुमार गावित साहेब लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, त्यांना दीर्घायुष्य लाभावे व पुन्हा एकदा त्यांच्या हातून जनतेची सेवा घडावी, या सद्भावनेतून आज शनिवार, दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६.३०…
नंदुरबारचे सुपुत्र मनोज श्रॉफ यांचा फोर्ब्स यादीत गौरव जागतिक उद्योगविश्वातील भारतीय नेतृत्वाचा अभिमान नंदुरबार : महाराष्ट्राच्या आदिवासी व सीमावर्ती भागातील नंदुरबार जिल्ह्याने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपली ओळख ठळक केली आहे. नंदुरबारचे सुपुत्र, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उद्योजक आणि NITI Group चे संस्थापक व अध्यक्ष मनोज शशिचंद्र श्रॉफ यांचा Forbes Middle East च्या प्रतिष्ठित यादीत समावेश झाला असून, मध्यपूर्वेतील अव्वल भारतीय उद्योगपतींमध्ये त्यांना ५९ वा क्रमांक मिळाला आहे. ही बाब नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे. ४ जानेवारी १९६४ रोजी नंदुरबार येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मनोज श्रॉफ यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नंदुरबार येथेच पूर्ण केले. मर्यादित साधनसंपत्ती असतानाही कष्ट,…

