Author: जगदिश निळकंठ सोनवणे

जगदिश निळकंठ सोनवणे

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

अधिकृत पत्रकारांची नावे वापरून नागरिकांची दिशाभूल; धडगाव तालुका पत्रकार संघ आक्रमक, पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी धडगाव (प्रतिनिधी) आदिवासीबहुल आणि दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धडगाव तालुक्यात कथित तोतया व बोगस पत्रकारांच्या वाढत्या वावरामुळे पत्रकारितेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अधिकृत पत्रकारांची नावे वापरून ग्रामीण नागरिक, व्यावसायिक आणि कर्मचाऱ्यांची दिशाभूल करणे, तसेच जाहिरातींच्या नावाखाली कथित बेकायदेशीर वसुली आणि खंडणी उकळण्याचा प्रयत्न होत असल्याचे गंभीर आरोप पुढे आले आहेत. या प्रकारांविरोधात धडगाव तालुका पत्रकार संघाने आक्रमक भूमिका घेत पोलीस प्रशासनाकडे तातडीच्या कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. धडगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने १२ ऑक्टोबर रोजी धडगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे तक्रार अर्ज सादर करण्यात…

Read More

शनिमांडळ येथे विधिवत पूजन; शेतकरी व ग्रामस्थांशी साधला संवाद नंदुरबार : राज्यातील दुष्काळाचे संकट दूर होऊन शेतकरी आणि नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, तसेच आगामी काळात योग्य पर्जन्यमान व्हावे, यासाठी माजी आदिवासी विकास मंत्री तथा भाजपाचे विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी शनि अमावस्येनिमित्त नंदुरबार तालुक्यातील श्रीक्षेत्र शनिमांडळ येथे शनिदेवाचे विधिवत पूजन करून साकडे घातले. शनिमहाराजांचे दर्शन घेतल्यानंतर डॉ. गावित यांनी शनिमांडळ, तलवाडे आणि तिलाली शिवारातील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. आगामी काळात पाणीटंचाई निर्माण झाल्यास शेतकरी व ग्रामस्थांनी कोणती दक्षता घ्यावी, तसेच उपलब्ध पाण्याचा योग्य वापर आणि आवश्यक उपाययोजनांबाबत त्यांनी…

Read More

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त डॉ. श्रद्धा शिंदे मदनकर यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन नंदुरबार : किशोरवयीन मुलींच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांविषयी जागरूकता निर्माण करून त्यांच्यात आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने श्रीमती ही. गो. श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ‘कळी उमलताना’ या विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. श्रद्धा शिंदे मदनकर यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत किशोरवयातील बदल, मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि समस्यांना सामोरे जाण्याच्या योग्य पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. किशोरवय हा मुलींच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि संवेदनशील टप्पा असतो. या काळात शरीरात होणारे बदल, भावनांमधील चढ-उतार, मनातील भीती, संभ्रम आणि आत्मविश्वासाशी संबंधित प्रश्न निर्माण होतात. या बदलांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे आणि त्याविषयी…

Read More

सेवा संकल्प अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना नंदुरबार (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी नंदुरबार तालुक्यातील दुधाळे येथे भेट देऊन सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी केंद्राची पाहणी करून अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. राज्यभरात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश श्री. गोयल यांनी दिले. ग्रामपंचायत कार्यालय, शाळा आणि अंगणवाडी परिसरातील स्वच्छतेची पाहणी करत त्यांनी अभियानांतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. तसेच, उर्वरित उपक्रम निर्धारित वेळेत…

Read More

विद्यार्थी, शेतकरी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय; जि.प.चे माजी सदस्य तथा माजी सभापती रतन के. पाडवी यांचे विभाग नियंत्रकांना निवेदन धडगाव : धडगाव तालुक्यातील सोमाणा, मुंदलवड, खर्डी, वरखेडी, खुटामोडी, सुरवाणी, मोजरा, खांडबारा, हरणपुरी व भुजगाव या गावांना जोडणाऱ्या मार्गावर नियमित एसटी बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांसह शेतकरी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य प्रवाशांना दैनंदिन प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या मार्गावर नियमित एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा माजी सभापती रतन के. पाडवी यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, शहादा विभागाच्या विभाग नियंत्रकांना १७ सप्टेंबर २०२६…

Read More

२२ हून अधिक शासकीय सेवा नागरिकांच्या दारी; सेवा सेतू व महसूल समाधान शिबिरांतून प्रलंबित कामांचा निपटारा नंदुरबार | प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीस २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य शासनाच्या निर्देशानुसार नंदुरबार जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून महसूल व इतर शासकीय सेवा तसेच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी गुरुवारी (दि. १८) जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांच्यासह प्रिंट…

Read More

उधना–पुणे अमृत भारत एक्स्प्रेसला मंजुरी; राजकीय श्रेयासाठी भाजप–शिवसेनेत दावे, मात्र जनतेतून सुविधेचे स्वागत नंदुरबार (प्रतिनिधी) : नंदुरबार जिल्ह्यातील प्रवाशांची अनेक वर्षांची पुणे रेल्वेसेवेची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. मध्य व पश्चिम रेल्वे विभागाकडून उधना–पुणे अमृत भारत एक्स्प्रेस नंदुरबारमार्गे सुरू करण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली असून, या निर्णयामुळे नंदुरबारसह धुळे, जळगाव, अमळनेर परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या रेल्वेसेवेच्या मंजुरीनंतर मात्र तिच्या पाठपुराव्याचे श्रेय घेण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये राजकीय दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. भाजपकडून माजी खासदार डॉ. हिनाताई गावित यांनी खासदारकीच्या कार्यकाळात रेल्वेमंत्री व रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा केल्याचे सांगितले जात आहे. तर शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून…

Read More

नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर वेलफेअर असोसिएशनचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन; जिल्हाधिकारी श्रीमती मिताली शेट्टी यांचीही उपस्थिती नंदुरबार | प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी विकास विभागांतर्गत पूर्ण झालेल्या विविध विकासकामांची बिले दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याने कंत्राटदार वर्ग गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. ५०५४-५११७ (T6) या लेखाशिर्षांतर्गत प्रलंबित देयकांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर वेलफेअर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात असोसिएशनच्या अध्यक्षांसह जिल्ह्यातील असंख्य कंत्राटदारांनी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदन साद केले. निवेदन देतेवेळी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी श्रीमती मिताली शेट्टी यांचीही उपस्थिती होती. यावेळी कंत्राटदारांनी गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या देयकांमुळे निर्माण झालेल्या गंभीर आर्थिक…

Read More

शहादा | प्रतिनिधी धडगावहून सावऱ्यादिगर-बुरखेडा पाड्याकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा काल तीव्र वळणाच्या उतारावर भीषण अपघात होऊन तब्बल २१ प्रवासी जखमी झाले. या अपघाताने संपूर्ण परिसर हादरला असून, जखमींच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सावऱ्यादिगर गावाजवळील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन रस्त्यावरच पलटी झाले. अपघाताची तीव्रता एवढी होती की, अनेक प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. एका प्रवाशाचा पाय फ्रॅक्चर झाला असून, तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तत्काळ धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जखमींना पुढील उपचारासाठी शहादा येथील रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी…

Read More

होळ तर्फे रणाळा (प्रतिनिधी) नंदुरबार तालुक्यातील होळ तर्फे रणाळा येथे अक्का माय फाउंडेशन, नंदुरबार यांच्या वतीने ग्रामस्थांना पाणी जारचे वितरण करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. विजय पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम घेण्यात आला. गावातील नागरिकांना विशेषतः उन्हाळ्यात तसेच दैनंदिन वापरासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. विजय पाटील यांचा सामाजिक उपक्रमांचा सातत्यपूर्ण सहभाग श्री. विजय पाटील हे आपल्या गावासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध उपक्रम राबवत असून, गरजू नागरिकांना तसेच शैक्षणिक संस्थांना वेळोवेळी मदतीचा हात देत आहेत. मागील वर्षीही त्यांनी…

Read More