Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट

October 9, 2026

धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी

September 27, 2026

नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’

September 18, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
  • धडगावच्या भीषण अपघातातील जखमींच्या भेटीसाठी रतनदादा पाडवी रुग्णालयात; जखमींची विचारपूस करत दिला धीर
  • सामाजिक बांधिलकी जपत ‘अक्का माय फाउंडेशन’चा उपक्रम; होळ तर्फे रणाळा येथे पाणी जार वितरण
  • नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»स्थानिक बातम्या»नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
स्थानिक बातम्या

नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेSeptember 18, 2026No Comments4 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

२२ हून अधिक शासकीय सेवा नागरिकांच्या दारी; सेवा सेतू व महसूल समाधान शिबिरांतून प्रलंबित कामांचा निपटारा

नंदुरबार | प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीस २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य शासनाच्या निर्देशानुसार नंदुरबार जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून महसूल व इतर शासकीय सेवा तसेच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.

याबाबतची माहिती जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी गुरुवारी (दि. १८) जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांच्यासह प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रत्येक तालुक्यात ‘सेवा सेतू’ व महसूल समाधान शिबिरे

जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी सांगितले की, अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर ‘सेवा सेतू’ शिबिर तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित केले जाणार आहे. ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

प्रलंबित महसूल कामांना मिळणार गती

या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा, ७/१२ व ८-अ उतारे अद्ययावत करणे, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते, शिधापत्रिका वितरण, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्म-मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्रे, दिव्यांग प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, शिकाऊ वाहनचालक परवाना तसेच वन हक्क दाव्यांच्या मंजुरी यांसह २२ हून अधिक महत्त्वाच्या सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे.

‘सेवा माझे योगदान’मधून सामाजिक उपक्रम

अभियानाचा एक भाग म्हणून ‘सेवा माझे योगदान’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गावागावांत तसेच शहरातील विविध प्रभागांमध्ये युवक, महिला आणि नागरिकांच्या सहभागातून रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, प्लास्टिकमुक्ती आणि जलस्रोत स्वच्छता मोहीम यांसारखे सामाजिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

विद्यार्थ्यांमध्ये विकसित भारताची संकल्पना रुजविण्यासाठी ‘विकसित भारत’ या विषयावर चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच अंगणवाडी उत्सव आणि ‘नमो सेवागाथा’ अंतर्गत सांस्कृतिक व नाट्य पथकांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

‘सेवा ज्योत यात्रा’ आणि बाईक रॅली

गावागावांत आणि शहरांमध्ये ‘विकसित भारत-सेवा ज्योत यात्रा’ तसेच बाईक रॅलीचे आयोजन करून विकसित भारत-२०४७ आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

अभियानाचे नियोजन व संनियंत्रण जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी अभियानाच्या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांचा आणि विविध उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट

October 9, 2026

धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी

September 27, 2026

श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!

September 16, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025619
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.