Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026

दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
  • धडगावच्या भीषण अपघातातील जखमींच्या भेटीसाठी रतनदादा पाडवी रुग्णालयात; जखमींची विचारपूस करत दिला धीर
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»स्थानिक बातम्या»दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
स्थानिक बातम्या

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेOctober 10, 2026No Comments1 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

शनिमांडळ येथे विधिवत पूजन; शेतकरी व ग्रामस्थांशी साधला संवाद

नंदुरबार : राज्यातील दुष्काळाचे संकट दूर होऊन शेतकरी आणि नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, तसेच आगामी काळात योग्य पर्जन्यमान व्हावे, यासाठी माजी आदिवासी विकास मंत्री तथा भाजपाचे विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी शनि अमावस्येनिमित्त नंदुरबार तालुक्यातील श्रीक्षेत्र शनिमांडळ येथे शनिदेवाचे विधिवत पूजन करून साकडे घातले.

शनिमहाराजांचे दर्शन घेतल्यानंतर डॉ. गावित यांनी शनिमांडळ, तलवाडे आणि तिलाली शिवारातील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. आगामी काळात पाणीटंचाई निर्माण झाल्यास शेतकरी व ग्रामस्थांनी कोणती दक्षता घ्यावी, तसेच उपलब्ध पाण्याचा योग्य वापर आणि आवश्यक उपाययोजनांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

शनिक्षेत्रातील सुविधांबाबत चर्चा

श्रीक्षेत्र शनिमांडळ येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, तसेच मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत भाविकांना सुलभपणे दर्शन घेता यावे, यासाठी आवश्यक सोयी-सुविधांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना पावसाची प्रतीक्षा असताना डॉ. गावित यांनी शनि अमावस्येच्या निमित्ताने शनिदेवाच्या चरणी प्रार्थना केली. यावेळी धार्मिक विधींसोबतच स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांची माहिती घेतल्याने परिसरातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली.

या प्रसंगी भाजपाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील, शनी मंदिराचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते जगदीश पाटील यांच्यासह ग्रामस्थ, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट

October 9, 2026

धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी

September 27, 2026

नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’

September 18, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.