Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत
- गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान
- चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक
- मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड
- कै. श्री. पी. एन. पाटील यांच्या कुटुंबीयांची ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सांत्वनभेट
- नंदुरबार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! सराईत घरफोडी आरोपी जेरबंद; चार गुन्ह्यांची उकल, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- जिल्ह्याच्या विकासकामांना गती; ऑक्टोबरअखेर अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश
- रस्त्यांच्या दुरवस्थेवर पालकमंत्र्यांची तीव्र नाराजी; आता दर महिन्याला तालुकानिहाय आढावा
Author: जगदिश निळकंठ सोनवणे
नंदुरबार : सोशल मीडियावर हातात तलवार घेऊन व्हिडिओ प्रसारित करत नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या युवकाविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसांनी तातडीची कारवाई करत त्याला अटक केली असून त्याच्या ताब्यातील लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच भारतीय हत्यार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या सूचनेनुसार नंदुरबार शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत १ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८…
नंदुरबार : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त एकलव्य विद्यालयात महर्षी व्यास तसेच शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा अभिवादन सोहळा उत्साहात पार पडला. भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार करून त्यांच्याविषयीचा आदर आणि ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यादायिनी माता सरस्वती आणि महर्षी व्यास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. ध्रुव सहाणे याने प्रास्ताविकातून गुरुपौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी प्रमुख वक्ते राजेंद्र पाटील यांनी महर्षी व्यास यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्याचा सविस्तर परिचय करून दिला. भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान सर्वोच्च असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे त्यांनी विविध उदाहरणे, कथा आणि प्रेरणादायी प्रसंगांच्या…
नंदुरबार : वनपट्टाधारक शेतकऱ्यांचे e-KYC तांत्रिक कारणांमुळे पूर्ण होत नसल्याने कर्जमाफीची प्रक्रिया रखडली असून त्याच कारणामुळे पुढील पीक कर्जही मिळत नसल्याने शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. या प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत e-KYC प्रक्रिया पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ तसेच पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट)चे प्रदेश सरचिटणीस तथा नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री. रतन के. पाडवी यांनी जिल्हाधिकारी, नंदुरबार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यासह अनेक वनपट्टाधारक शेतकऱ्यांचे e-KYC तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण होत नसल्याने शासनाच्या कर्जमाफी योजनेतील प्रक्रिया…
नंदुरबार : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत अक्राणी तालुक्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांचे अर्ज दीर्घकाळापासून “Block Level Pending” स्थितीत प्रलंबित असल्याने शेतकरी आर्थिक लाभापासून वंचित राहत आहेत. या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून सर्व पात्र शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट)चे प्रदेश सरचिटणीस तथा नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री. रतन के. पाडवी यांनी जिल्हाधिकारी, नंदुरबार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, अक्राणी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केले असून त्यांची स्थिती अनेक महिन्यांपासून “Block Level Pending” अशीच कायम आहे. संबंधित शेतकरी कृषी विभाग व इतर…
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयामुळे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा; कर्जमाफी व वीजबिल माफी ऐतिहासिक : मंत्री संजय सावकारे नंदुरबार : राज्य सरकारने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ आणि शेतकऱ्यांच्या 48 हजार कोटी रुपयांच्या वीजबिल थकबाकी माफीचा निर्णय हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले. नंदुरबार येथील विजय पर्व येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उत्तर महाराष्ट्र समन्वयक विजयभाऊ चौधरी, जिल्हाध्यक्ष निलेश माळी, सदानंद रघुवंशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री सावकारे यांनी सांगितले की, राष्ट्रीयकृत, व्यापारी, खासगी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या ‘पुण्यश्लोक…
नंदुरबार : लोकनेते स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तर्फे आयोजित जनसेवा सप्ताह अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत “एक झाड स्व. अजितदादा पवार यांच्या नावाने” या संकल्पनेतून विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग नोंदविला. जनसेवा सप्ताहानिमित्त मतदान जागृती, महिला सक्षमीकरण, आदिवासी हक्क, पर्यावरण संरक्षण, आरोग्य जनजागृती, शेतकरी व कृषी विकास, युवकांना रोजगार व कौशल्य विकास…
नंदुरबार : तोरखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन कै. नथू गोरख रामोळे (वय ७४) यांचे शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी रात्री १२.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. कै. रामोळे हे मनमिळावू, शांत स्वभावाचे व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात परिचित होते. विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी उल्लेखनीय कार्य केले. तसेच ते वारकरी संप्रदायाशी निगडित असून धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाने तोरखेडा परिसरात शोककळा पसरली असून रामोळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ते सामाजिक कार्यकर्ते विलास नथू रामोळे यांचे वडील होत.…
नंदुरबार : महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या नंदुरबार तालुकाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अरुण शांतिलाल साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक कार्यातील त्यांचे योगदान आणि रुग्णसेवा क्षेत्रातील सक्रिय सहभागाची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण समाधान भोटकर यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेश उपाध्यक्ष सुरज एस. यादव यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णसेवा, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्य नागरिक तसेच श्रमिक कामगारांच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याच्या उद्देशाने साळुंखे यांच्यावर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. संघटनेची शिस्त, नियम व उद्दिष्टांचे पालन करत निष्ठेने कार्य करावे, तसेच गरजू…
नंदुरबार : महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी आकीब असलम धोबी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक कार्यातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुरज एस. यादव यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रानुसार, संस्थापक अध्यक्ष प्रवीण समाधान भोंटकर यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णसेवा, सामाजिक बांधिलकी आणि श्रमिक कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याच्या उद्देशाने आकीब धोबी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. संघटनेच्या नियमांचे व उद्दिष्टांचे पालन करत गरजू रुग्णांना मदत करणे, श्रमिक कामगारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे…
नंदुरबार, दि. १६ जुलै : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शुक्रवार, दि. १७ जुलै २०२६ रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून शेती, आरोग्य, विकास कामे तसेच विविध शासकीय योजनांचा आढावा घेणार आहेत. दौऱ्यानुसार, गुरुवार (दि. १६ जुलै) रोजी रात्री ११.३० वाजता मुंबईतील शासकीय निवासस्थान ‘विशाळगड’ येथून दादर रेल्वे टर्मिनसकडे प्रयाण करून रात्री १२.१५ वाजता दादर-भुसावळ एक्सप्रेसने ते नंदुरबारकडे रवाना होतील. शुक्रवार (दि. १७ जुलै) रोजी सकाळी ८.२५ वाजता नंदुरबार रेल्वे स्थानकावर आगमनानंतर ते शासकीय विश्रामगृहात दाखल होतील. सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉल (व्हीसी रूम) येथे पालकमंत्री मुश्रीफ यांच्या…

