Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत

August 27, 2026

गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

August 23, 2026

चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक

August 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत
  • गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान
  • चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक
  • मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड
  • कै. श्री. पी. एन. पाटील यांच्या कुटुंबीयांची ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सांत्वनभेट
  • नंदुरबार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! सराईत घरफोडी आरोपी जेरबंद; चार गुन्ह्यांची उकल, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
  • जिल्ह्याच्या विकासकामांना गती; ऑक्टोबरअखेर अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश
  • रस्त्यांच्या दुरवस्थेवर पालकमंत्र्यांची तीव्र नाराजी; आता दर महिन्याला तालुकानिहाय आढावा
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»EVM अॅपवर मतदान करून विद्यार्थ्यांनी निवडले वर्ग प्रतिनिधी एकलव्य विद्यालयात लोकशाही प्रक्रियेचा अनोखा अनुभव
शैक्षणिक

EVM अॅपवर मतदान करून विद्यार्थ्यांनी निवडले वर्ग प्रतिनिधी एकलव्य विद्यालयात लोकशाही प्रक्रियेचा अनोखा अनुभव

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेJune 26, 2026No Comments136 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

नंदुरबार  (प्रतिनिधी) लोकशाही प्रक्रियेची ओळख विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून करून देण्यासाठी एकलव्य विद्यालयातील इयत्ता १० वी ‘क’ च्या वर्गात ईव्हीएम (EVM) अॅपद्वारे वर्ग प्रतिनिधी निवडणुकीचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. मोबाईलवरील ईव्हीएम अॅपचा वापर करून मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत लोकशाहीचा अनुभव घेतला.

शालेय जीवनात वर्ग प्रतिनिधी (मॉनिटर) निवडीसाठी पारंपरिक पद्धतीने चिठ्ठीद्वारे मतदान केले जाते. मात्र यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेची अनुभूती देण्यात आली. मतदानापूर्वी वर्गशिक्षक संतोष पाटील यांनी मतदानाची संपूर्ण प्रक्रिया, मतदानाचे महत्त्व आणि मतदारांनी पाळावयाचे नियम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

त्यानंतर इच्छुक उमेदवारांची नावे ईव्हीएम अॅपमध्ये नोंदवून विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मतदानाचा हक्क बजावला. प्रत्यक्ष मतदान केंद्राप्रमाणेच संपूर्ण वातावरण तयार करण्यात आले होते. या उपक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे, उपमुख्याध्यापक डॉ. गिरीश पवार तसेच पर्यवेक्षक टिका पाडवी यांनी सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

विद्यार्थिनी गटातून श्वेता पवार, रिद्धिमा मालचे, राधिका भोये आणि रिषिका राव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये श्वेता पवार वर्ग प्रतिनिधी तर रिद्धिमा मालचे उपवर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून आल्या. विद्यार्थी गटातून श्रेयस बोरसे, दुर्गेश माळी, हर्ष काळे आणि स्वप्निल वाघ यांनी निवडणूक लढविली. त्यामध्ये श्रेयस बोरसे वर्ग प्रतिनिधी तर दुर्गेश माळी उपवर्ग प्रतिनिधी म्हणून विजयी झाले.

या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. भविष्यात जबाबदार आणि सजग मतदार घडविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 23, 2026

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने एकलव्य विद्यालयात रंगला आदिवासी गौरव दिन

August 8, 2026

गुरुपौर्णिमेनिमित्त एकलव्य विद्यालयात महर्षी व्यास व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त

August 3, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,118

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025790

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025618
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.