Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत

August 27, 2026

गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

August 23, 2026

चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक

August 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत
  • गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान
  • चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक
  • मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड
  • कै. श्री. पी. एन. पाटील यांच्या कुटुंबीयांची ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सांत्वनभेट
  • नंदुरबार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! सराईत घरफोडी आरोपी जेरबंद; चार गुन्ह्यांची उकल, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
  • जिल्ह्याच्या विकासकामांना गती; ऑक्टोबरअखेर अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश
  • रस्त्यांच्या दुरवस्थेवर पालकमंत्र्यांची तीव्र नाराजी; आता दर महिन्याला तालुकानिहाय आढावा
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»स्थानिक बातम्या»मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यात मदत कक्ष कार्यरत विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क क्रमांक जाहीर; नागरिकांना थेट संपर्काचे आवाहन
स्थानिक बातम्या

मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यात मदत कक्ष कार्यरत विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क क्रमांक जाहीर; नागरिकांना थेट संपर्काचे आवाहन

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेJuly 15, 2026No Comments32 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यात मदत कक्ष कार्यरत
विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क क्रमांक जाहीर; नागरिकांना थेट संपर्काचे आवाहन

नंदुरबार | प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि भारतीय संविधानाच्या कलम 324 अन्वये राज्यभर राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision-2026) मोहिमेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष मदत कक्ष (हेल्प डेस्क) सुरू करण्यात आले आहेत. या मदत कक्षांच्या माध्यमातून मतदार यादीशी संबंधित माहिती, अडचणी आणि तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, त्याची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तसेच संबंधित तहसील कार्यालयांत मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती, वगळणे, हरकती तसेच निवडणूक विषयक इतर माहिती व तक्रारींसाठी नागरिक या मदत कक्षांशी थेट संपर्क साधू शकतात.

विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत :

• जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार (निवडणूक शाखा) : 02564-210008

• 01-अक्कलकुवा (तहसील कार्यालय, अक्कलकुवा) : 02567-252226

• अक्राणी (तहसील कार्यालय, अक्राणी) : 02595-220232

• 02-शहादा (तहसील कार्यालय, शहादा) : 9404442441 / 7666635390

• तळोदा (तहसील कार्यालय, तळोदा) : 02567-232367

• 03-नंदुरबार (तहसील कार्यालय, नंदुरबार) : 02564-232269

• 04-नवापूर (तहसील कार्यालय, नवापूर) : 02569-295282

उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेचा लाभ घ्यावा आणि मतदार यादीसंदर्भात कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्यास संबंधित मदत कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांच्या सक्रिय सहभागातून ही मोहीम अधिक प्रभावी आणि यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक

August 23, 2026

कै. श्री. पी. एन. पाटील यांच्या कुटुंबीयांची ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सांत्वनभेट

August 23, 2026

जिल्ह्याच्या विकासकामांना गती; ऑक्टोबरअखेर अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश

August 14, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,118

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025790

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025618
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.