Author: जगदिश निळकंठ सोनवणे

जगदिश निळकंठ सोनवणे

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई; पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणखी एक मोठे यश नंदुरबार : जिल्ह्यातील वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नंदुरबार पोलीस दलाने मोठी कामगिरी करत आंतरराज्यीय सोनसाखळी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक करून नंदुरबार जिल्ह्यातील ५ आणि महाराष्ट्रासह कर्नाटकातील १३ असे एकूण १८ गुन्हे उघडकीस आणले असून ५ लाख ४३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मागील काही महिन्यांपासून नंदुरबार शहर, उपनगर परिसर तसेच राज्यातील विविध भागांमध्ये धुमस्टाईल सोनसाखळी चोरीच्या घटना घडत होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर प्रकारांची दखल घेत…

Read More

विषय क्रमांक ६ ने पेटवले राजकारण; विरोधक, सत्ताधारी आणि एमआयएमच्या भूमिकेमुळे निर्माण झाले अनेक प्रश्न नंदुरबार : नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतील विषय क्रमांक ६ मुळे नंदुरबारच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. जुन्या पशुवधगृहाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार दुरुस्ती व सुधारणा करण्याचा प्रस्ताव सभेपुढे आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने याला “कत्तलखाना पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न” असे संबोधत तीव्र विरोध केला. दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) सत्ताधाऱ्यांनी हा विरोध केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठीचा राजकीय स्टंट असल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे या संपूर्ण वादात एमआयएम नगरसेवकांनी विषयाचे समर्थन करत सत्ताधाऱ्यांचे आभार मानल्याने या प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढला आहे. सभागृहात जे घडले आणि त्यानंतर बाहेर…

Read More

“यंग प्रोफेशनल्स राउंडटेबल”मधून डिजिटल वेलनेस, नेतृत्व आणि राष्ट्रनिर्माणावर मंथन नंदुरबार, (दि. 29 मे 2026) देशाला “विकसित भारत 2047” या ध्येयाकडे नेण्यासाठी केवळ आर्थिक प्रगती नव्हे, तर मानसिकदृष्ट्या सक्षम, तंत्रज्ञानसाक्षर आणि मूल्याधिष्ठित युवा पिढी घडविणे अत्यावश्यक असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश नंदुरबार येथे आयोजित “Viksit Bharat Young Leaders Dialogue 2026 – Young Professionals Roundtable” या विशेष कार्यक्रमातून देण्यात आला. युवकांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाने नंदुरबार जिल्ह्यात नव्या वैचारिक चळवळीची सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळाले. युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली माय भारत नंदुरबार आणि झेप फाउंडेशन (World Digital Detox Day) यांच्या संयुक्त विद्यमाने…

Read More

शहादा (प्रतिनिधी) अवैधरित्या अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना शहादा पोलिसांनी धाडसी कारवाई करत ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २० किलो ५६४ ग्रॅम सुका गांजा व दुचाकीसह एकूण ४ लाख ८१ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दि. १५ मे २०२६ रोजी शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री. हेमंतकुमार पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, दोन इसम धडगावकडून असलोद मार्गे शिरपूरकडे मोटारसायकलद्वारे सुका गांजा वाहतूक करत आहेत. या माहितीच्या आधारे श्री. पाटील यांनी तात्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलीस पथकाने पंचांसह असलोद-दामळदा रोडवरील संस्थानजवळ सापळा रचला. रात्रीच्या सुमारास संशयित अवस्थेत…

Read More

नंदुरबार (प्रतिनिधी) ७ मे २०२५ च्या रात्री भारतीय वायुसेनेने अवघ्या २३ मिनिटांत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील नऊ महत्त्वाच्या लक्ष्यांवर अचूक हल्ले करत “ऑपरेशन सिंदूर” यशस्वीरीत्या पार पाडले. आधुनिक तंत्रज्ञान, उपग्रह-मार्गदर्शित शस्त्रे, लोइटरिंग ड्रोन आणि अचूक गुप्तचर माहितीच्या साहाय्याने राबविण्यात आलेल्या या कारवाईने भारताची लष्करी क्षमता आणि तांत्रिक प्रगती जगासमोर अधोरेखित केली आहे.       या मोहिमेदरम्यान भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या चिनी बनावटीच्या हवाई संरक्षण यंत्रणांना निष्प्रभ करत अत्यंत नियोजनबद्ध आणि अचूक पद्धतीने लक्ष्यांवर हल्ले केले. विशेष म्हणजे या संपूर्ण कारवाईचे पुरावे ४८ तासांच्या आत उपग्रह चित्रांच्या माध्यमातून समोर आले. Maxar, KawaSpace आणि MizarVision या संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या चित्रांमध्ये पाकिस्तानातील शाहबाज…

Read More

नंदुरबार – जनतेच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू असलेल्या कथित गैरव्यवहारांनी संतापाची लाट उसळली आहे. गोरगरीब रुग्णांचे आधारस्थान असलेल्या या संस्थेत भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता, भ्रष्टाचार आणि प्रशासकीय निष्काळजीपणा झाल्याची चर्चा जोर धरत आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, कंत्राटी भरतीत पारदर्शकतेचा पूर्ण अभाव, नियमबाह्य नियुक्त्या आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार यामुळे संपूर्ण प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कोणतीही अधिकृत निविदा प्रक्रिया न राबविता करण्यात आलेली महागडी संगणक खरेदी हा देखील गंभीर गैरप्रकार मानला जात आहे. “या खरेदीला परवानगी कोणी दिली?” हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.…

Read More

नंदुरबार जिल्ह्यात कायद्याची अंमलबजावणी ही केवळ प्रक्रिया न राहता ती जनतेसाठी सुरक्षिततेची हमी बनावी, यासाठी ज्या काही मोजक्या अधिकाऱ्यांनी सातत्याने धडाडीने काम केले आहे, त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. हेमंत सुभाष पाटील साहेब यांचे नाव ठळकपणे पुढे येते. त्यांच्या कार्यशैलीत कठोरता आहे, पण त्यामागे न्यायाची स्पष्ट भूमिका आणि जनतेच्या विश्वासाचे भक्कम भान आहे. गेल्या काही काळात त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात गुन्हेगारीविरोधात उभारलेली मोहीम ही केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नाही, तर ती परिणामकारक आणि दूरगामी ठरलेली आहे. गुन्हे उघडकीस आणताना त्यांनी दाखवलेली तपासकौशल्य, तांत्रिक दक्षता आणि संघटनात्मक नेतृत्व यामुळे अनेक गुन्हेगारी साखळ्या मोडीत निघाल्या. चोरी, घरफोडी, दरोडे अशा पारंपरिक…

Read More

केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) च्या नेतृत्व संरचनेत आयपीएस अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत नुकतेच सुरू झालेले वादविवादाने तीव्र मतप्रकट केले आहेत, विशेषतः जे सीएपीएफमध्ये पूर्णपणे कॅडर-आधारित कमांड मॉडेलची मागणी करत आहेत. थेट भरती झालेल्या सीएपीएफ अधिकाऱ्यांच्या करिअर प्रगती, मनोधारणा आणि संस्थात्मक ओळखीच्या चिंता निश्चितपणे योग्य विचारात घेण्यायोग्य आहेत, परंतु यापलीकडे मोठा संस्थात्मक चित्र दुर्लक्षित करता येणार नाही. हा मुद्दा केवळ बढती किंवा पदांचा नाही. तो मूलभूतपणे भारताच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेच्या रचनेशी, पोलिसिंग नेतृत्वाच्या संवैधानिक भूमिकेशी आणि केंद्र व राज्यांमधील सामरिक समन्वयाच्या गरजेशी संबंधित आहे. या चौकटीत, सीएपीएफमध्ये आयपीएस अधिकाऱ्यांची नेतृत्व भूमिका तर्कसंगत आणि आवश्यक दोन्ही आहे. या चर्चेच्या केंद्रस्थानी भारतीय पोलिस…

Read More

नाशिक (प्रतिनिधी) नंदुरबार येथील युवा पत्रकार विशाल मोहन गायकवाड (माळी) यांनी नाशिक येथे आयोजित पत्रकार पदविका कोर्समध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. हा कोर्स दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अकॅडमी तर्फे आयोजित करण्यात आला होता. या कोर्सचा पदवीदान समारंभ १५ मार्च रोजी नाशिक येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. हिमगौरी आडके-आहेर (महापौर, नाशिक मनपा), मा. अजय बोरस्ते (शिवसेना उपनेते तथा नगरसेवक) तसेच डॉ. आशाताई पाटील (राष्ट्रीय संस्थापक अध्यक्षा – ग्राहक रक्षक समिती) उपस्थित होते. यावेळी अकॅडमीच्या संचालिका डॉ. कृतिका मराठे व डॉ. महेंद्र देशपांडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पत्रकार…

Read More

मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना-615 आणि भारतीय मजदूर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद लिपिकांच्या विविध मागण्यांबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत लिपिकांच्या पदोन्नतीचे स्तर कमी करण्यासंदर्भातील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान कनिष्ठ सहाय्यक लिपीक आणि वरिष्ठ सहाय्यक लिपीक या दोन पदांचे एकत्रिकरण करून “विकास सहाय्यक” हे नवे पदनाम देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच या पदासाठी विद्यमान S-6 वेतनश्रेणी कायम ठेवावी, अशी भूमिका संघटनेने मांडली. पदांचे एकत्रिकरण केल्यास प्रशासन व्यवस्थेवर व नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर काही प्रतिकूल परिणाम होणार नाही, याबाबत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य…

Read More