Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत

August 27, 2026

गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

August 23, 2026

चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक

August 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत
  • गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान
  • चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक
  • मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड
  • कै. श्री. पी. एन. पाटील यांच्या कुटुंबीयांची ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सांत्वनभेट
  • नंदुरबार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! सराईत घरफोडी आरोपी जेरबंद; चार गुन्ह्यांची उकल, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
  • जिल्ह्याच्या विकासकामांना गती; ऑक्टोबरअखेर अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश
  • रस्त्यांच्या दुरवस्थेवर पालकमंत्र्यांची तीव्र नाराजी; आता दर महिन्याला तालुकानिहाय आढावा
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»सेवाज्येष्ठ TET/CTET पात्र शिक्षकांवरील अन्याय थांबवावा; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना शिक्षक परिषदेचे निवेदन
शैक्षणिक

सेवाज्येष्ठ TET/CTET पात्र शिक्षकांवरील अन्याय थांबवावा; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना शिक्षक परिषदेचे निवेदन

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेJune 25, 2026No Comments257 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

 

नंदुरबार (प्रतिनिधी)  : राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रियेत सेवाज्येष्ठ TET/CTET पात्र शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) च्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) यांच्या वतीने मुंबई येथील मंत्री महोदयांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट घेण्यात आली. यावेळी शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेत उद्भवलेल्या विविध प्रश्नांकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधण्यात आले.

शिक्षण संचालकांनी १४ मे २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रामुळे पदोन्नती प्रक्रियेत संभ्रम निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामविकास विभागाशी आवश्यक समन्वय न साधता प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने संबंधित पत्राला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, तसेच पदोन्नती समितीच्या बैठकीच्या अंतिम दिनांकापर्यंत TET/CTET पात्रता प्राप्त केलेल्या सेवाज्येष्ठ शिक्षकांची ज्येष्ठता ग्राह्य धरून पदोन्नती प्रक्रिया राबविण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

याशिवाय विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्रप्रमुख पदासाठी सुरू असलेल्या समुपदेशन प्रक्रियेतील त्रुटींकडेही मंत्री महोदयांचे लक्ष वेधण्यात आले. गुणवत्ता यादीत स्थान मिळवूनही अनेक CTET पात्र उमेदवारांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आल्याचे पुराव्यांसह निदर्शनास आणून देण्यात आले.

पदोन्नती प्रक्रिया राबविण्याच्या दिनांकापर्यंत आवश्यक TET/CTET पात्रता प्राप्त केलेल्या शिक्षकांची सेवाज्येष्ठता व गुणवत्ता विचारात घेणे हेच न्याय्य ठरेल, असे शिक्षक परिषदेने स्पष्ट केले. कृत्रिम ‘कट-ऑफ’ दिनांक निश्चित करून पात्र शिक्षकांना डावलले जात असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला.

यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी पदोन्नतीसंदर्भातील १८ जुलै २०२५ रोजीची अधिसूचना तसेच संबंधित सर्व बाबींची तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे सकारात्मक आश्वासन दिल्याची माहिती शिक्षक परिषदेकडून देण्यात आली.

अन्यायग्रस्त सेवाज्येष्ठ TET/CTET पात्र शिक्षक तसेच गुणवत्ता यादीत स्थान मिळूनही पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या उमेदवारांना न्याय मिळेपर्यंत शिक्षक परिषदेचा लढा सुरू राहील, असा निर्धार संघटनेने व्यक्त केला.

या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) चे महाराष्ट्र प्रांत कार्यवाह पुरुषोत्तम वसंत काळे, कोकण विभागीय अध्यक्ष गणेश पोतदार आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अंकुश माळी यांचा समावेश होता. ही माहिती जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 23, 2026

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने एकलव्य विद्यालयात रंगला आदिवासी गौरव दिन

August 8, 2026

गुरुपौर्णिमेनिमित्त एकलव्य विद्यालयात महर्षी व्यास व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त

August 3, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,118

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025790

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025618
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.