Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026

दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट

October 9, 2026

धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी

September 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
  • धडगावच्या भीषण अपघातातील जखमींच्या भेटीसाठी रतनदादा पाडवी रुग्णालयात; जखमींची विचारपूस करत दिला धीर
  • सामाजिक बांधिलकी जपत ‘अक्का माय फाउंडेशन’चा उपक्रम; होळ तर्फे रणाळा येथे पाणी जार वितरण
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
शैक्षणिक

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेOctober 10, 2026No Comments1 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त डॉ. श्रद्धा शिंदे मदनकर यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन

नंदुरबार : किशोरवयीन मुलींच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांविषयी जागरूकता निर्माण करून त्यांच्यात आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने श्रीमती ही. गो. श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ‘कळी उमलताना’ या विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. श्रद्धा शिंदे मदनकर यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत किशोरवयातील बदल, मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि समस्यांना सामोरे जाण्याच्या योग्य पद्धतींबाबत मार्गदर्शन केले.

किशोरवय हा मुलींच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि संवेदनशील टप्पा असतो. या काळात शरीरात होणारे बदल, भावनांमधील चढ-उतार, मनातील भीती, संभ्रम आणि आत्मविश्वासाशी संबंधित प्रश्न निर्माण होतात. या बदलांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे आणि त्याविषयी योग्य माहिती मिळविणे आवश्यक असल्याचे डॉ. मदनकर यांनी स्पष्ट केले.

शारीरिक बदलांच्या काळात वैयक्तिक स्वच्छता, आरोग्यदायी सवयी आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगितले. मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांना घाबरून न जाता ते समजून घ्यावेत, आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त कराव्यात आणि गरज भासल्यास पालक, शिक्षक किंवा तज्ज्ञांची मदत घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे!

‘शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे,’ हा संदेश देत विद्यार्थिनींनी स्वतःच्या भावना ओळखाव्यात, आत्मविश्वासाने अडचणींचा सामना करावा आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाकडे सकारात्मकतेने पाहावे, असे डॉ. मदनकर यांनी सांगितले. त्यांच्या सहज, मैत्रीपूर्ण आणि संवेदनशील संवादामुळे विद्यार्थिनींना मनातील शंका मोकळेपणाने मांडण्याची संधी मिळाली. विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.

संस्थेच्या समन्वयक सुषमा शाह यांच्या संकल्पनेतून आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासाला चालना मिळावी, हा उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी प्राध्यापिका नीलिमा पाटील, प्रा. विद्या थोरात, प्रा. प्रतिभा पाटील आणि प्रा. गायत्री पाटील यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्राध्यापिका नेहा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला इयत्ता दहावी, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

‘कळी उमलताना’ या उपक्रमातून किशोरवयीन मुलींना स्वतःला समजून घेण्याची, मनातील भावना व्यक्त करण्याची आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होण्याची दिशा मिळाली. आरोग्याविषयी जागरूकता आणि आत्मविश्वासाची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शक ठरला.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 23, 2026

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने एकलव्य विद्यालयात रंगला आदिवासी गौरव दिन

August 8, 2026

गुरुपौर्णिमेनिमित्त एकलव्य विद्यालयात महर्षी व्यास व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त

August 3, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.