Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!
  • दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»क्राईम»बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त; 10.17 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत
क्राईम

बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त; 10.17 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेJune 18, 2026No Comments24 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter
नंदुरबार (प्रतिनिधी) नंदुरबार जिल्ह्यात अवैध दारूनिर्मितीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बनावट देशी दारू तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत सुमारे 10 लाख 17 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपीला अटक करण्यात आली आहे.
      नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी जिल्ह्यातील अवैध दारूनिर्मिती, वाहतूक, साठवणूक, अंमली पदार्थ, अवैध शस्त्रे व इतर बेकायदेशीर धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की, जुगनी (ता. अक्कलकुवा) येथील दुगलीबारी पाड्यात एका घरात स्पिरीटच्या साहाय्याने बनावट देशी दारू तयार केली जात आहे.
      मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. एका कौलारू घराजवळ स्पिरीटचा तीव्र वास येत असल्याने पोलिसांनी घराची पाहणी केली. यावेळी एक इसम दारूच्या बाटल्यांमध्ये द्रव भरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव लक्ष्मण हात्या पाडवी (वय 31, रा. तलावडी, पोस्ट धनाजे बु., ता. धडगाव) असे सांगितले.
     घराची झडती घेतली असता पोलिसांना मोठ्या प्रमाणात बनावट देशी दारू, स्पिरीट आणि दारूनिर्मितीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. कारवाईदरम्यान 39 बॉक्स बनावट देशी दारू, 150 लिटर स्पिरीट, बाटल्यांना बुच व पॅकिंग करणारे इलेक्ट्रिक मशीन, दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य तसेच एक बोलेरो वाहन असा एकूण 10.17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
        या प्रकरणी आरोपीविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 229/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 123 तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(इ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप व अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
        या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारूनिर्मिती करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाने अशा बेकायदेशीर व्यवसायांवर पुढेही कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.
Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

August 23, 2026

नंदुरबार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! सराईत घरफोडी आरोपी जेरबंद; चार गुन्ह्यांची उकल, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

August 15, 2026

सोशल मीडियावर तलवारीचे प्रदर्शन करून दहशत पसरविणाऱ्यावर पोलिसांची कारवाई; लोखंडी तलवार जप्त

August 3, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.