Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!
  • दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»श्रीमती प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत
शैक्षणिक

श्रीमती प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेJune 15, 2026No Comments258 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

 

नंदुरबार (प्रतिनिधी) : शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक बालकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. याच भावनेला साजेसा आनंदोत्सव येथील वेस्ट खान्देश भगिनी सेवा मंडळ, धुळे संचलित श्रीमती प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित प्रवेशोत्सवाने संपूर्ण शाळा परिसर आनंद, उत्साह आणि चैतन्याने फुलून गेला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक राहुल मोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा जयश्री बोरसे, उपाध्यक्ष तथा पालक प्रतिनिधी हेमंत परदेशी आणि समिती सदस्य मंजुबेन जैन उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.

यावेळी इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीत आणि ईशस्तवनाने वातावरण प्रसन्न झाले. त्यानंतर इयत्ता पहिलीत नव्याने दाखल झालेल्या चिमुकल्यांचे औक्षण करून त्यांना गुलाबपुष्प, फुगे आणि चॉकलेट देत प्रेमपूर्वक स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या डोळ्यांतील समाधान कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

याच प्रसंगी सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या पाठ्यपुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे हेमंत परदेशी यांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करताना बदलत्या युगात गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेचा पहिला दिवस हा केवळ शिक्षणाचा प्रारंभ नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाच्या निर्देशानुसार उपस्थित मान्यवर, पालक आणि विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राहुल मोरे यांनी केले. सूत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन शशिकांत निकम यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख वैशाली पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नवागत विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण स्वागतामुळे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी आणि संस्मरणीय वातावरणात झाली.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 23, 2026

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने एकलव्य विद्यालयात रंगला आदिवासी गौरव दिन

August 8, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.