Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर; पर्जन्य, शेती, आरोग्य व विकास कामांचा घेणार आढावा

July 16, 2026

मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यात मदत कक्ष कार्यरत विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क क्रमांक जाहीर; नागरिकांना थेट संपर्काचे आवाहन

July 15, 2026

ज्येष्ठ शिक्षणप्रेमी कुटुंबातील मातृछत्र हरपले; सौ. नवसाबाई रतीलाल रोकडे यांचे निधन

July 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर; पर्जन्य, शेती, आरोग्य व विकास कामांचा घेणार आढावा
  • मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यात मदत कक्ष कार्यरत विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क क्रमांक जाहीर; नागरिकांना थेट संपर्काचे आवाहन
  • ज्येष्ठ शिक्षणप्रेमी कुटुंबातील मातृछत्र हरपले; सौ. नवसाबाई रतीलाल रोकडे यांचे निधन
  • संघर्षातून घडलेले नेतृत्व… जनतेच्या विश्वासाचे नाव!
  • विकासाचा ध्यास, जनसेवेचा श्वास… खानदेशाच्या पहिल्या महिला खासदार डॉ. हिनाताई विजयकुमार गावित यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
  • आंतरराज्यीय मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ३०.३० लाखांच्या ३२ दुचाकी जप्त, नंदुरबार एलसीबीची धडाकेबाज कामगिरी
  • नंदुरबार पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम; ३५.२० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, जिल्ह्यात सुरक्षिततेची भावना अधिक बळकट
  • शेतकऱ्यांच्या घामाच्या कमाईवर चोरट्यांचा डल्ला; ग्रामीण भागातील वाढत्या चोरींनी शेतकरी भयभीत, पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»स्थानिक बातम्या»पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर; पर्जन्य, शेती, आरोग्य व विकास कामांचा घेणार आढावा
स्थानिक बातम्या

पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर; पर्जन्य, शेती, आरोग्य व विकास कामांचा घेणार आढावा

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेJuly 16, 2026No Comments1 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

नंदुरबार, दि. १६ जुलै : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शुक्रवार, दि. १७ जुलै २०२६ रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून शेती, आरोग्य, विकास कामे तसेच विविध शासकीय योजनांचा आढावा घेणार आहेत.

दौऱ्यानुसार, गुरुवार (दि. १६ जुलै) रोजी रात्री ११.३० वाजता मुंबईतील शासकीय निवासस्थान ‘विशाळगड’ येथून दादर रेल्वे टर्मिनसकडे प्रयाण करून रात्री १२.१५ वाजता दादर-भुसावळ एक्सप्रेसने ते नंदुरबारकडे रवाना होतील. शुक्रवार (दि. १७ जुलै) रोजी सकाळी ८.२५ वाजता नंदुरबार रेल्वे स्थानकावर आगमनानंतर ते शासकीय विश्रामगृहात दाखल होतील.

सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉल (व्हीसी रूम) येथे पालकमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पर्जन्यमानाचा आढावा, पेरणीची सद्यस्थिती, बियाणे, खते तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत बैठक होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित राहणार आहेत.

त्यानंतर सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत विविध विकास कामांचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये महिला व बाल रुग्णालयातील एसएनसीयू (Special New Born Care Unit), मिल्क बँक (दुग्धपेढी), क्षयरोग अतिदक्षता कक्ष, बालरोग अतिदक्षता कक्ष (PICU) तसेच इतर विकास कामांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे.

दुपारी १२.०० ते १२.३० या वेळेत जिल्हा रुग्णालय सभागृहात जिल्हा एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती, जिल्हा संनियंत्रण व सल्लागार समिती तसेच जिल्हा पालक जन आरोग्य संरक्षण कार्यकारिणी समितीच्या बैठका पार पडतील.

दुपारी १२.४० वाजता लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘सेवा सप्ताह’ कार्यक्रमांतर्गत धुळे रोडवरील संजय टाऊन हॉल येथे आयोजित बूथ कार्यकर्ता (BLA) मेळाव्यास पालकमंत्री उपस्थित राहतील. दुपारी १.३० ते २.३० हा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.

यानंतर दुपारी ३.०० वाजता ते प्रकाशा (ता. शहादा) येथे रवाना होतील. दुपारी ३.३० वाजता श्री केदारेश्वर देवस्थानाचे दर्शन घेऊन प्रकाशा तीर्थक्षेत्राची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी ४.३० वाजता शहादा तहसील कार्यालयात शासनाच्या विविध विभागांच्या विकास योजनांचा तालुकास्तरीय आढावा घेतील.

सायंकाळी ६.०० ते ६.३० या वेळेत शासकीय विश्रामगृह, शहादा येथे नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यात येतील. रात्री ८.५५ वाजता नंदुरबार रेल्वे स्थानकावरून दादर-भुसावळ एक्सप्रेसने ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यात मदत कक्ष कार्यरत विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क क्रमांक जाहीर; नागरिकांना थेट संपर्काचे आवाहन

July 15, 2026

ज्येष्ठ शिक्षणप्रेमी कुटुंबातील मातृछत्र हरपले; सौ. नवसाबाई रतीलाल रोकडे यांचे निधन

July 10, 2026

पदोन्नतीनिमित्त ग्रामपंचायत अधिकारी संजय देवरे यांचा संघटनेतर्फे सत्कार

June 16, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,117

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025809

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025784

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025614
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.