Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत

August 27, 2026

गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

August 23, 2026

चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक

August 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत
  • गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान
  • चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक
  • मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड
  • कै. श्री. पी. एन. पाटील यांच्या कुटुंबीयांची ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सांत्वनभेट
  • नंदुरबार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! सराईत घरफोडी आरोपी जेरबंद; चार गुन्ह्यांची उकल, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
  • जिल्ह्याच्या विकासकामांना गती; ऑक्टोबरअखेर अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश
  • रस्त्यांच्या दुरवस्थेवर पालकमंत्र्यांची तीव्र नाराजी; आता दर महिन्याला तालुकानिहाय आढावा
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»लोकविश्वास न्यूज विशेष»शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भरती घोटाळा उघडकीस; उच्चस्तरीय चौकशी व फौजदारी कारवाईची जोरदार माग
लोकविश्वास न्यूज विशेष

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भरती घोटाळा उघडकीस; उच्चस्तरीय चौकशी व फौजदारी कारवाईची जोरदार माग

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेApril 24, 2026No Comments8 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

नंदुरबार – जनतेच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू असलेल्या कथित गैरव्यवहारांनी संतापाची लाट उसळली आहे. गोरगरीब रुग्णांचे आधारस्थान असलेल्या या संस्थेत भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता, भ्रष्टाचार आणि प्रशासकीय निष्काळजीपणा झाल्याची चर्चा जोर धरत आहे.

महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, कंत्राटी भरतीत पारदर्शकतेचा पूर्ण अभाव, नियमबाह्य नियुक्त्या आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार यामुळे संपूर्ण प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कोणतीही अधिकृत निविदा प्रक्रिया न राबविता करण्यात आलेली महागडी संगणक खरेदी हा देखील गंभीर गैरप्रकार मानला जात आहे. “या खरेदीला परवानगी कोणी दिली?” हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

याशिवाय स्वच्छता ठेकेदारांना करण्यात आलेले अवाजवी देयके, केवळ नाममात्र उपस्थिती दाखवून मानधन घेणारे प्राध्यापक, सेवा न देता वेतन घेणारे तज्ज्ञ डॉक्टर, तसेच कर्मचाऱ्यांकडून अनुपस्थितीचा मोबदला वसूल करण्याचे प्रकार हे सर्व प्रशासनातील भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूप दर्शवतात. इतकेच नव्हे तर, संस्थेच्या इमारतीची नियमित पाहणीसारखी मूलभूत जबाबदारीही अधिष्ठात्यांकडून पार पाडली जात नसल्याचे समोर येत आहे.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री हसन मुश्रीफ यांच्या नंदुरबार भेटीदरम्यान या प्रकरणाची चर्चा रंगली होती. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांना चौकशीचे आदेश देण्यात आले असले तरी अद्याप ठोस कारवाई न झाल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाने स्वतः पुढाकार घेऊन उच्चस्तरीय, निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे. दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करावी आणि संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशीही ठाम मागणी पुढे येत आहे.

आरोग्य व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी अशा गंभीर आरोपांची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा जनतेसाठी उभारलेली ही व्यवस्था काही मोजक्या लोकांच्या स्वार्थाचे साधन बनत असल्याची भावना अधिक तीव्र होईल.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत

August 27, 2026

संघर्षातून घडलेले नेतृत्व… जनतेच्या विश्वासाचे नाव!

June 30, 2026

विकासाचा ध्यास, जनसेवेचा श्वास… खानदेशाच्या पहिल्या महिला खासदार डॉ. हिनाताई विजयकुमार गावित यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

June 27, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,118

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025790

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025618
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.