Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!
  • दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»प्रशासकीय»लिपिकांच्या मागण्यांवर शासन दरबारी सकारात्मक चर्चा; लवकर निर्णयाची शक्यता
प्रशासकीय

लिपिकांच्या मागण्यांवर शासन दरबारी सकारात्मक चर्चा; लवकर निर्णयाची शक्यता

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेMarch 15, 2026No Comments7 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना-615 आणि भारतीय मजदूर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद लिपिकांच्या विविध मागण्यांबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत लिपिकांच्या पदोन्नतीचे स्तर कमी करण्यासंदर्भातील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान कनिष्ठ सहाय्यक लिपीक आणि वरिष्ठ सहाय्यक लिपीक या दोन पदांचे एकत्रिकरण करून “विकास सहाय्यक” हे नवे पदनाम देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच या पदासाठी विद्यमान S-6 वेतनश्रेणी कायम ठेवावी, अशी भूमिका संघटनेने मांडली. पदांचे एकत्रिकरण केल्यास प्रशासन व्यवस्थेवर व नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर काही प्रतिकूल परिणाम होणार नाही, याबाबत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लेखी मत घेऊन पुढील निर्णय घेण्याची भूमिका मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली.

संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी यांनी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार भूमिका स्पष्ट करताना मंत्रालयीन विभागातील लिपिक आणि जिल्हा परिषदेमधील लिपिक यांच्या कर्तव्यांमधील फरकही बैठकीत मांडला. कनिष्ठ सहाय्यकाची शैक्षणिक पात्रता अधिक असून वरिष्ठ सहाय्यक पदावर टायपिंगची अट नसल्यामुळे कामकाजाची गती कमी होते, त्यामुळे पदे एकत्र केल्यास प्रशासन अधिक गतिमान होईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी या पदांचे एकत्रिकरण करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला असून तो लवकर मंजूर करून शासन निर्णय प्रसिद्ध करावा, अशी मागणी संघटनेचे राज्याध्यक्ष सागर बाबर यांनी केली. तसेच वरिष्ठ सहाय्यक लिपीक पदाच्या स्पर्धा परीक्षेसाठी दुसऱ्या दिवसाला ज्येष्ठता दिनांक मानण्याबाबतही निवेदन मंत्री जयकुमार गोरे यांना देण्यात आले. हे निवेदन आमदार सत्यजित भाऊ देशमुख यांच्या हस्ते मंत्री महोदयांना देण्यात आले असून त्यावर प्रधान सचिवांना पुढील कार्यवाहीसाठी निर्देश देण्यात आले आहेत.

बैठकीदरम्यान मंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व संघटनांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. तसेच पुढील आठवड्यात या विषयावर पाठपुरावा करून निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीत आमदार सत्यजित भाऊ देशमुख यांनीही लिपिकांवर होत असलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधत दोन पदोन्नती स्तर एकत्र केल्यास कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल, अशी भूमिका मांडली.

या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना 615, शाखा नंदुरबार यांच्यावतीनेही सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. जिल्हाध्यक्ष व राज्य कार्यकारिणी सदस्य गजानन नागरे, सचिव रघुनाथ भोये तसेच संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी कनिष्ठ सहाय्यक व वरिष्ठ सहाय्यक ही पदे एकत्रित करण्याबाबत शासन दरबारी सातत्याने प्रयत्न केले असल्याचे सांगण्यात आले.

बैठकीस संघटनेचे राज्याध्यक्ष सागर बाबर, राज्य कार्याध्यक्ष पंकज गुल्हाने, राज्य उपाध्यक्ष संजय चव्हाण, मराठवाडा विभागीय अध्यक्ष संजय जगताप, राज्य प्रसिद्धी प्रमुख हेमंतकुमार यावले, राज्य सचिव अरुण जोर्वेकर, राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी, नाशिक जिल्हाध्यक्ष प्रमोद निरगुडे, पुणे जिल्हाध्यक्ष इंद्रजीत जाधव, पुणे जिल्हा कोषाध्यक्ष रेव्हलिंग यादव, सांगली जिल्हा कोषाध्यक्ष महेश गावंदरे व सांगली जिल्हा संघटक संजय शिंदे उपस्थित होते.

तसेच ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उपसचिव जाधव मॅडम, कक्ष अधिकारी नितीन पवार यांच्यासह विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

नंदुरबारमध्ये ‘नंदिनी मिनी सरस’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; पाच दिवसांत ५३ लाखांची उलाढाल

March 12, 2026

सेवापुर्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभ देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम – सीईओ नमन गोयल, नंदुरबार जिल्हा परिषदेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा

February 2, 2026

घरकुल व नरेगा कामांबाबत अधिकाऱ्यांचे आंदोलन ; नंदुरबारमध्ये प्रशासनाला निवेदन

December 8, 2025
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.