Author: जगदिश निळकंठ सोनवणे

जगदिश निळकंठ सोनवणे

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

नंदुरबार (प्रतिनिधी) नंदुरबार येथील जी.टी.पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या एककाचे उद्घाटन लोकमत वृत्तसमूह नंदुरबार जिल्हयाचे उपसंपादक मनोज शेलार यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.डॉ.एम.जे. रघुवंशी होते.        या प्रसंगी उपसंपादक मनोज शेलार यांनी राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वयंसेवकांनी एककाच्या माध्यमातून स्वतःमध्ये चांगले संस्कार रुजवून, सुसंस्कारित समाज निर्मितीत योगदान देण्याचे आवाहन करताना एक चांगला नागरिक बनून महाविद्यालयाचे तसेच जिल्ह्याचे नाव लौकिक करणे, हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सेवा योजनेची फलश्रुती आहे, असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य.डॉ.एम.जे.रघुवंशी यांनी स्वयंसेवकांना शिस्त, परिश्रम आणि संघर्ष या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. मोबाईलच्या…

Read More

बामदोड (नंदुरबार), दि. २५ सप्टेंबर २०२५ – शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे जागतिक फार्मासिस्ट दिन सामाजिक जाणीव, सांस्कृतिक उपक्रम आणि आरोग्यविषयक जनजागृतीच्या वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात रक्तदान शिबिराने झाली. यामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली. त्यानंतर मोफत आरोग्य तपासणी शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांनी परिसरात झाडे लावून हरित संदेश दिला. जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर नाटिका (स्ट्रीट प्ले) सादर करून औषधांचा योग्य वापर, दुष्परिणाम आणि फार्मासिस्टची महत्त्वाची भूमिका जनतेसमोर प्रभावीपणे मांडली. संस्कृती व कलेला प्रोत्साहन देण्यासाठी रांगोळी स्पर्धा व रिल स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेशासोबत कलात्मक कल्पकता सादर केली. तसेच प्रबोधनात्मक रॅली…

Read More

नंदुरबार (प्रतिनिधी) –ग्रामपंचायत होळ तर्फे हवेली येथे “एक दिवस – एक तास – एक साथ” या घोषवाक्याखाली स्वच्छता ही सेवा २०२५ अभियानांतर्गत स्वच्छता महाश्रमदान मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमास पंचायत समिती नंदुरबारचे गटविकास अधिकारी सन्मा. अनिल बिराडे साहेब, सरपंच सन्मा. मनीष नाईक, विस्तार अधिकारी सन्मा. युवराज पवार नाना, ग्रामपंचायत अधिकारी श्री. विजय पाटील आप्पा साहेब, ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, सीआरसी प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, घनकचरा संकलन, गटारी व परिसर स्वच्छता या उपक्रमांवर भर देण्यात आला. ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळे ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबद्दल जनजागृती निर्माण झाली. स्वच्छतेतून आरोग्य आणि विकास साध्य होतो, यावर सर्व मान्यवरांनी…

Read More

छत्रपति संभाजिनगर दिनांक 24 ( प्रतिनिधि ) नाशिक येथे काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पत्रकारांवर जीवघेणा हल्ला करून मारहाण केली. या घटनेत अनेक पत्रकार गंभीर जखमी झाले असून, राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीचा हा धक्कादायक नमुना असल्याची तीव्र चर्चा सुरू झाली आहे. गुन्हेगारी वाढण्याचे मूळ कारण हफ्तेखोरी व कायद्याच्या अंमलबजावणीतील कमजोरी असल्याचे नागरिकांचे स्पष्ट मत आहे. “राज्यात कॅबिनेट मंत्री असो, केंद्रीय राज्यमंत्रीची मुलगी असो वा पत्रकार असो, कुणीही सुरक्षित नाही. मग सामान्य गरीब जनता, महिला, शाळा-कॉलेजमधील मुली कशा सुरक्षित राहणार?” असा थेट सवाल लोकांमध्ये उपस्थित होत आहे. राज्याचे गृहमंत्री कमजोर आणि कमकुवत ठरत असल्यामुळेच राज्यात गुन्हेगारी वाढीस लागली आहे, अशी जनतेत चर्चा…

Read More

नंदुरबार (प्रतिनिधी) पिंजारी, मन्सुरी, नदाफ समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच करिअर संदर्भात मार्गदर्शन व्हावे या हेतूने नंदुरबार जिल्हा मन्सुरी–पिंजारी–नदाफ सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट आणि जे.के. पार्क इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दि. २१ सप्टेंबर रोजी जे.के. पार्क हॉल, नंदुरबार येथे सकाळी १० वाजता उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मन्सुरी–पिंजारी समाज मुंबई आरीफ अली मन्सुरी, जे.के. पार्क फाऊंडेशनचे अध्यक्ष हाजी डॉ. किस्मत शेख, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हाजी कलीम हाजी हसन मन्सुरी, नगर परिषद शहादा मुख्याधिकारी साजिद मुनाफ पिंजारी, पोलीस निरीक्षक राजन मोरे, रेल्वे स्टेशन अधीक्षक…

Read More

नंदुरबार (प्रतिनिधी) त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वृत्तांकनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर पार्किंगचा ठेका वसूल करणाऱ्या तथाकथित गुंडांनी केलेल्या मारहाणीचा जिल्हा मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने तीव्र निषेध केला आहे. या संदर्भातील निवेदन आज जिल्हाधिकारी मिताली शेठी यांना देण्यात आले.     या हल्ल्यात पुढारी न्यूजचे किरण ताजणे, झी २४ तासचे योगेश खरे यांच्यासह इतर पत्रकार जखमी झाले असून घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. “पत्रकार हे लोकशाहीतील चौथा स्तंभ आहेत. त्यांच्यावर हात उचलण्याचे धाडस होणे ही लोकशाहीसाठी धोकादायक बाब असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात आहे,” असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले. ◆ पत्रकार संघाच्या वतीने मांडण्यात…

Read More

शहादा (प्रतिनिधी): शहादा येथील साने गुरुजी मित्र मंडळ तर्फे प्राथमिक शिक्षक नरेंद्र दगा कुवर व शांतीलाल रामचंद्र अहिरे यांना प्रतिष्ठेचा ‘खान्देशरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सदर शिक्षकांचा जिवलग मित्र पंचशील ग्रुप तर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सहपत्नीक सत्कार करण्यात आला. या गौरवाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमाला केंद्रप्रमुख नरेंद्र महिरे, केंद्रप्रमुख संतोष पंढरीनाथ कुवर, पत्रकार बापू घोडराज, ग्रामसेवक राजेंद्र आगळे, प्रकाश निकम, प्रवीण खाडे, प्रा. चंद्रविलास बिऱ्हाडे, संगणक चालक मिलिंद शिरसाट, बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वरिष्ठ लिपिक तुकाराम बागले, ग्रामसेवक रमेश बर्डे, पोलीस नाईक धनंजय पवार यांसह जिवलग मित्र परिवाराचे मान्यवर उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना…

Read More

नंदुरबार (प्रतिनिधी)- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या झराळी येथील शिवण नदीवरील विरचक प्रकल्पाचा पाणी पातळीत अलीकडेच वाढ झाल्याने शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला रविवारी जलपूजन करण्यात येऊन नदीला साडीचोळी अर्पण करण्यात आली. नंदुरबार शहरासह परिसरात अपेक्षेप्रमाणे मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली होती.ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सिंचन प्रकल्पांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या झराळी येथील शिवण नदीवरील विरचक प्रकल्पाचा पाणीसाठा सध्या ९६.५६ टक्के असून,पुढील कालावधीत भेडसवणाऱ्या पाण्याच्या प्रश्न सुटला आहे. रविवारी सकाळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते रविवारी जलपूजन करण्यात येऊन नदीला साडीचोळी…

Read More

नंदुरबार (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत नंदुरबार विभागीय आंतरमहाविद्यालयीन महिला कबड्डी स्पर्धा नुकत्याच वसंतराव नाईक महाविद्यालय, शहादा येथे पार पडल्या. या स्पर्धेत विभागातील नऊ महाविद्यालयांच्या संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत जी. टी. पाटील महाविद्यालयाच्या महिला कबड्डी संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत विभागातील तीन संघांचा पराभव करून अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, मात्र जी. टी. पाटील महाविद्यालयाच्या खेळाडूंच्या चपळाई, अचूक पकडी आणि धडाकेबाज चढायांपुढे प्रतिस्पर्धी संघ टिकाव धरू शकला नाही. संघाची कर्णधार कु. दीपिका पाडवी हिने अष्टपैलू खेळ आणि प्रभावी नेतृत्व करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तिच्या साथीला सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट साथ…

Read More

बामदोड/नंदुरबार (प्रतिनिधी) राष्ट्रीय औषध निरीक्षण (फार्माकोविजिअन्स) सप्ताह २०२५ च्या चौथ्या दिवशी शताब्दी ट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड (जि. नदुरबार) ग्रामीण व्यवसायासाठी रुग्ण सुरक्षा जन संस्था आयोजित करण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण औषधांचा सुरक्षितता वापरणे, संभाव्यतांची माहिती तसेच पर्यायी औषधी अस्तित्वाची खात्रीशीर माहिती देणे हा होता. कार्यक्रमात पालकांनी ” रुग्णांच्या सुरक्षा – सर्वांचे उमेदवार ” या संकल्पनेवर आधारित मार्गदर्शन केले. पेट्रोलशी संबंधित डॉक्टरांच्या साधने, औषधोपचार औषधांच्या सूचनांचे संवाद, नवीन पूर्ण दिसणे, कळवणे, विक्रेत्यांची योग्य माहिती आणि औषध नोंदविण्याची प्रक्रिया या विषयावर विशेष भर देण्यात आला. के. डी. गावीत शैक्षणिक संकुल, कोरीट इथनी या कार्यक्रमात सहभागी. बँकेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षक कर्मचारी…

Read More