Author: जगदिश निळकंठ सोनवणे

जगदिश निळकंठ सोनवणे

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

“धर्म, त्याग आणि राष्ट्रभक्तीचा महामहोत्सव – गुरु तेग बहादुर साहिबजींच्या शहीदी शताब्दी सोहळ्याची जय्यत तयारी” क्षेत्रीय आयोजन समिती अध्यक्षपदी सरदार डॉ. विजय सतबीर सिंग, सहअध्यक्षपदी श्रावण चव्हाण यांची नियुक्ती या भव्य सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती नंदुरबार (प्रतिनिधी) : भारतीय संस्कृतीच्या अभेद्य एकात्मतेचे प्रतीक आणि हिंद-की-चादर म्हणून जगभर ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त नांदेड येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहून देशवासीयांना गुरुंच्या महान त्याग, साहस आणि धर्मरक्षणाच्या संदेशाचे स्मरण करून देणार आहेत. राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या माध्यमातून आणि…

Read More

आजच्या बदलत्या काळात, आभाळभर दोस्तांच्या दुनियेत प्रत्येकाच्या काळजावर अधिराज्य गाजवणारे, कार्य व कर्तृत्वाने जिल्ह्याच्या नेतृत्वाला नवे दिशा व नवा दृष्टिकोन देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच ‘विशाल बाबा मोहन माळी’! अफाट उत्साह, निर्भय कार्यशैली, प्रामाणिक विचार आणि लोककल्याणाची तळमळ या चार गुणांनी घडलेले हे व्यक्तिमत्त्व आज नंदुरबारच्या जनमानसात ‘आपले बाबा’ म्हणून ओळखले जाते. “ज़मीर ज़िंदा हो तो राहें खुद बखुद बनती हैं, इरादे नेक हों तो मंज़िलें झुक कर सलाम करती हैं…” 🕊️ माळी कुटुंबाचा सामाजिक वारसा वडील नानासाहेब मोहन माळी आणि आई शकुंतलाताई माळी यांच्या संस्कारातून विशाल बाबांनी समाजकारणाची प्रेरणा घेतली. घरातील संस्कारांमुळेच बालपणापासूनच इतरांच्या मदतीसाठी तत्पर राहण्याची वृत्ती त्यांच्यात दृढ झाली.…

Read More

मुंबई, दि. 1 (प्रतिनिधी) : राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यपदाचे आरक्षण निश्‍चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. संबंधित जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबर 2025 रोजी वृत्तपत्रांत सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील. त्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. प्रारूप अधिसूचनेवर 14 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्याची संधी असेल. प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार करून 3 नोव्हेंबर 2025 रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रक्रियेनंतर राज्यातील स्थानिक…

Read More

‘दुर्गा दौड’मधे डॉ. विजयकुमार गावित यांचा उत्साही सहभाग; श्रद्धा व राष्ट्रप्रेमाचा संगम नंदुरबार (प्रतिनिधी) नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, नंदुरबार विभाग आयोजित पारंपरिक ‘दुर्गा दौड’ यंदाही जयघोष, भक्ती आणि राष्ट्रभक्तीच्या गजरात पार पडली. या प्रेरणादायी सोहळ्यात राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तरुणांना नवचैतन्याचा संदेश दिला. विशेष म्हणजे, डॉ. विजयकुमार गावित व डॉ. सुप्रिया गावित यांनी कार्यकर्त्यांसमवेत धर्मध्वज हाती घेऊन बरेच अंतर चालत उपस्थिती लक्षणीय ठरवली. त्यांच्या सहभागामुळे या दौडीचे आकर्षण अधिक वाढले. दौडीची सुरुवात ग्रामदैवत आई खोडाईमाता मंदिरात महाआरतीने झाली.…

Read More

नंदुरबार (प्रतिनिधी) आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून तालुका स्तरावर जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. या तयारीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून आज नंदुरबार शहरातील शहादा बायपास रस्त्यालगत भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. कुमुदिनी गावित व डॉ. सुप्रिया गावित प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. फित कापून झालेल्या या उद्घाटन सोहळ्यात आमदार डॉ. गावित यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी उत्साहाने झटण्याचे आवाहन केले. उद्घाटन प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पाटील, माजी जि.प. सदस्य…

Read More

नदुरबार (प्रतिनिधी) नंदुरबार तालुका विधायक संचना विद्यालय व कनिष्ठ सत्य शमांडळ येथील शाळानि दुरबार तालुका तालुका मैदानी कुलस्थानी घडवली आहे.       विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य कुंदन पाटील सर व पर्यवेक्षक पि.यू. आव्हा यांच्या मार्गदर्शनात तरुण तसेच तडफदार कुलगुरू पंकज शिरसाठ सर यांच्या अथक परिश्रमा सरड मुख्य हे यश प्राप्त करतात.        इयत्ता दहावीचा विद्यार्थी प्रथम क्रमांक साहिल भीमराव पानपाटील याने ८०० मीटर धावणे या गटात तालुकास्तरावर पटकावला. तर इत्ता नववीचा विद्यार्थी हरीश गोकुळ ठाकरे यांनी हातोडा फेक या प्रकार संपादन तालुका स्तरावर प्रथम क्रमांक केला. या दोन्ही परीक्षा यशस्वि नंद दुरबाराच्या तालुका मनोधैर्य कार्यालयाचे अध्यक्ष चेअरमन…

Read More

नंदुरबार (प्रतिनिधी) नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त शहरात हिंदु सेवा सहाय्य समिती व लताई आरोग्य धाम यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदीपक कन्यापूजन सोहळा संपन्न झाला. मोठा मारुती मंदिर सभागृहात पार पडलेल्या या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यात १०९ कन्यांचे वैदिक मंत्रघोषात पूजन करून त्यांना नवीन कपडे, शालेय साहित्य व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी कन्यांच्या नेत्रात देवीभाव तर पूजकांच्या डोळ्यांत भावाश्रू दिसत होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री दुर्गामातेच्या महाआरतीने झाली. यानंतर मान्यवर व यजमानांच्या हस्ते कन्यांचे पाद्यपूजन करून विधिवत पूजन करण्यात आले. सर्व कन्यांना नवीन पोशाख परिधान करून शालेय उपयोगी साहित्य प्रदान करण्यात आले. कन्याभोजनाच्या माध्यमातून या कन्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख…

Read More

नंदुर (प्रतिनिधी) कालपर्वतबारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने दुरबार कोली, ओसरली, अमळथे, होळ, मांजरे, निंभेल व शिवार सन्मानाचे अमर अक्षरशः नंद टाकले. एकीकडे शेतात डोल सर्वच बाजूच्या बाजूच्या बाजूच्या जागांत भविष्याची आशा दाटली होती; तर दुसरीकडे अवकाळी पावसाच्या झोडपाट्याने ती स्वप्ने क्षणात चिरडली. या अनपेक्षित पावसाने मिरची, पपई, केळी, कापूस, सोयाबीन यासह विविध पिकांचे मोठे नुकसान. अनेकांच्या शेतात पाणी साचणे उभी पिके आडवी, मूळ साडली, पाने गळाली, मेहनत दिवस काही क्षणांत मातीमोलंड. कोपर्लीतील शेतकरी दिलीप भगीरथ व सचिन वान्खेडे यांच्या एकर पपई पिकाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. “दररोज सूर्योदयापासून संध्याकाळपर्यंत घाम गाळले पाहिले. झटक्यात आता पुढचा भाग कसा गेला, घरखर्च कसा…

Read More

नंदुरबार (प्रतिनिधी) प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि नंदुरबार तालुका विधायक समिती यांच्या सहकार्याने बटेसिंगभैया रघुवंशी विधी महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर कायदेविषयक शिक्षण व संशोधन संस्था, नंदुरबार येथे दिनांक २६ सप्टेंबर रोजी पार पडले. शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. पी. एन. देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतात ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी संघटित होणे व कायद्याचे ज्ञान मिळवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. बदलत्या कौटुंबिक परिस्थितीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. दुसऱ्या सत्रात धुळे विधी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. वैभव सबनीस यांनी…

Read More

नंदुरबार (प्रतिनिधी)  भारतातील आरोग्यसेवेच्या डिजिटल आणि प्रतिबंधात्मक प्रवासात मोठे पाऊल उचलत विदाल हेल्थ आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) प्रा. लि. यांनी एचपीव्ही लसीकरणासाठी महत्त्वपूर्ण भागीदारी जाहीर केली आहे. या उपक्रमाचा उद्देश गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती वाढवणे आणि लस अधिक सुलभ करणे हा आहे. दि. १ ऑक्टोबर २०२५ पासून विदाल हेल्थचा डिजिटल प्लॅटफॉर्म हा देशातील पहिला असा प्लॅटफॉर्म ठरणार आहे, जिथे एचपीव्ही लसीसाठी सर्वकष (एंड-टू-एंड), कागदपत्रविरहित आणि कॅशलेस सुविधा उपलब्ध होईल. डॉक्टरची वेळ ठरवणे, संमतीपत्र भरणे, प्रमाणपत्र मिळवणे, डोसची आठवण करून देणे आणि उपचारांचे पालन या सर्व प्रक्रिया डिजिटल माध्यमातून पूर्ण केल्या जाणार आहेत. बजाज फिनसर्व्ह हेल्थची १००% मालकी असलेल्या…

Read More