Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत

August 27, 2026

गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

August 23, 2026

चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक

August 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत
  • गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान
  • चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक
  • मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड
  • कै. श्री. पी. एन. पाटील यांच्या कुटुंबीयांची ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सांत्वनभेट
  • नंदुरबार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! सराईत घरफोडी आरोपी जेरबंद; चार गुन्ह्यांची उकल, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
  • जिल्ह्याच्या विकासकामांना गती; ऑक्टोबरअखेर अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश
  • रस्त्यांच्या दुरवस्थेवर पालकमंत्र्यांची तीव्र नाराजी; आता दर महिन्याला तालुकानिहाय आढावा
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»आरोग्य»विदाल हेल्थ आणि सिरम इन्स्टिट्यूटची एचपीव्ही लसीकरणासाठी भागीदारी : डिजिटल कॅशलेस सुविधा उपलब्ध
आरोग्य

विदाल हेल्थ आणि सिरम इन्स्टिट्यूटची एचपीव्ही लसीकरणासाठी भागीदारी : डिजिटल कॅशलेस सुविधा उपलब्ध

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेSeptember 26, 2025No Comments2 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

नंदुरबार (प्रतिनिधी) 
भारतातील आरोग्यसेवेच्या डिजिटल आणि प्रतिबंधात्मक प्रवासात मोठे पाऊल उचलत विदाल हेल्थ आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) प्रा. लि. यांनी एचपीव्ही लसीकरणासाठी महत्त्वपूर्ण भागीदारी जाहीर केली आहे. या उपक्रमाचा उद्देश गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती वाढवणे आणि लस अधिक सुलभ करणे हा आहे.

दि. १ ऑक्टोबर २०२५ पासून विदाल हेल्थचा डिजिटल प्लॅटफॉर्म हा देशातील पहिला असा प्लॅटफॉर्म ठरणार आहे, जिथे एचपीव्ही लसीसाठी सर्वकष (एंड-टू-एंड), कागदपत्रविरहित आणि कॅशलेस सुविधा उपलब्ध होईल. डॉक्टरची वेळ ठरवणे, संमतीपत्र भरणे, प्रमाणपत्र मिळवणे, डोसची आठवण करून देणे आणि उपचारांचे पालन या सर्व प्रक्रिया डिजिटल माध्यमातून पूर्ण केल्या जाणार आहेत.

बजाज फिनसर्व्ह हेल्थची १००% मालकी असलेल्या विदाल हेल्थच्या या उपक्रमाबाबत बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज म्हणाले,  “भारतातील आरोग्यसेवा आता उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक सेवांकडे झुकत आहे. आयुष्मान भारतसारख्या योजनांमुळे हे परिवर्तन वेगाने घडत आहे. सिरम इन्स्टिट्यूटसोबतची भागीदारी ही आमच्या लसीकरण उपक्रमाची सुरुवात आहे. यामुळे लोकांना दीर्घकालीन आरोग्य खर्च वाचविण्यास मदत होईल.”

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी सांगितले, “गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी एचपीव्ही लस अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, तिचा प्रभाव वाढवण्यासाठी व्यापक उपलब्धता आणि जनजागृती गरजेची आहे. विदाल हेल्थसोबतची भागीदारी यात महत्त्वाची भूमिका बजावेल.” विदाल हेल्थकेअर सर्व्हिसेस लि.च्या कार्यकारी संचालिका नीथा उत्तय्या यांनी म्हटले की, “संपूर्णपणे व्यवस्थापित या उपक्रमाद्वारे भारतात वाढत चाललेला हॉस्पिटलायझेशन व वैद्यकीय खर्च कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा प्रकल्प आरोग्यसेवा प्रदाते, लस उत्पादक आणि राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म्स यांना एकत्र आणणारा आहे.”

सध्या विदाल हेल्थचा प्लॅटफॉर्म डॉक्टरांचा सल्ला, नैदानिक चाचण्या, आरोग्य तपासण्या, वेलनेस कार्यक्रम आणि वित्तीय आरोग्यसेवा पुरवतो. आता एचपीव्ही लसीकरणाची सुविधा थेट डिजिटल पद्धतीने मिळणार असून, आरोग्यसेवेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात हा उपक्रम महत्वाचा टप्पा मानला जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

उजैन महाकाल नगरीत श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय सन्मान — ‘राष्ट्रीय अवंतिका सेवा सम्मान म.प्र. 2025’ ने गौरव 

October 11, 2025
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,118

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025790

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025618
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.