Author: जगदिश निळकंठ सोनवणे

जगदिश निळकंठ सोनवणे

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

नंदुरबार (प्रतिनिधी) शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नंदुरबार येथे दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम तसेच पालक सभा यशस्वीरीत्या पार पडली.     हा कार्यक्रम प्राचार्य प्रा. पंकज एम. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य चौधरी यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्यपूर्ण अभ्यास व नैतिक मूल्यांचा अंगीकार करून आपले शैक्षणिक तसेच वैयक्तिक जीवन घडवावे, असे आवाहन केले. पालक व संस्था यांच्यातील योग्य समन्वयातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले. इंडक्शन प्रोग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची शैक्षणिक रचना, नियमावली, अभ्यासक्रम व विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. फार्मसी शिक्षणाचे महत्त्व, शिस्तीचे पालन आणि…

Read More

नंदुरबार  (प्रतिनिधी) शिवण नदीवरील बहुप्रतिक्षित बिलाडी धरण प्रकल्प अखेर मार्गी लागत असून, या प्रकल्पाला गती देण्याचे श्रेय माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाला जाते, असे प्रतिपादन त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी खासदार डॉ. हिना गावित उपस्थित होत्या. डॉ. गावित यांनी सांगितले की, १९९९ साली तत्कालीन मंत्री म्हणून त्यांनीच या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर २००८ मध्ये प्रकल्पाला मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली व भूमिपूजनही झाले. मात्र शेतकरी मोबदला आणि खामगाव गाव बुडीत जाण्याच्या भीतीमुळे हा प्रकल्प तब्बल दीड दशक रखडला होता. या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी शासन, प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधत मध्यम मार्ग…

Read More

लोणखेडा (प्रतिनिधी) जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ३ डिसेंबर रोजी समूह साधन केंद्र लोणखेडा अंतर्गत दगाजी महाराज विद्यालय, पळाशी येथे समता सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्राचे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय जाधव साहेब व केंद्रप्रमुख माननीय तावडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला दिव्यांग शिक्षक, दिव्यांग व सामान्य विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रस्तरीय विशेष शिक्षिका श्रीमती निर्मला देशमुख मॅडम यांनी केले. यावेळी दिव्यांग विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा सत्कार करून त्यांचा गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले तसेच दिव्यांगांविषयी जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली. माननीय जाधव साहेब यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या…

Read More

नंदुरबार (प्रतिनिधी) शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथे इयत्ता प्रथम वर्ष बी.फार्मसीचा १०० टक्के निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय शैक्षणिक यश संपादन करून संस्थेचे नाव उज्वल केले आहे. या परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी करत खालीलप्रमाणे यश मिळविले — ✅ प्रथम क्रमांक – कावेरी किशोर पावरा (8.24 CGPA) ✅ द्वितीय क्रमांक – संस्कृती संतोश पाटील (8.21 CGPA) ✅ तृतीय क्रमांक – दिव्याणी राजाराम पटेल (8.00 CGPA) ✅ चतुर्थ क्रमांक – रुपल तुकाराम पाटील (7.79 CGPA) ✅ पंचम क्रमांक – दिव्या अमृत कोळी (7.66 CGPA) विद्यार्थ्यांच्या या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांचे मार्गदर्शन…

Read More

नंदुरबार (प्रतिनिधी) घरकुल व नरेगा कार्यक्रमांतर्गत जबाबदारी निर्धारणाबाबत निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना, नंदुरबार जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की, शासनस्तरावर घरकुल व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) संदर्भातील अडचणींबाबत अद्याप स्पष्ट निर्णय न झाल्यामुळे अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कामकाज करताना अडथळे निर्माण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिनांक 6 व 8 डिसेंबर 2025 रोजी सामूहिक रजा आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र विकास सेवा महासंघाच्या मार्गदर्शनानुसार राज्यभरातील अधिकारी सामाजिक रजा आंदोलनात सहभागी होत असून, या आंदोलनास नंदुरबार जिल्ह्यातही…

Read More

नंदुरबार – स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर झटलेले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नंदुरबार येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणांद्वारे महात्मा फुले यांच्या समाजपरिवर्तनातील योगदानाचे स्मरण केले आणि त्यांच्या कार्याला उजाळा दिला. मृणाली राजपूत, दिव्या पाटील, नंदू ठाकरे, मोहिनी मोरे, जिया पाटील, ज्ञानदीप वाघ, दक्ष पाटील, यशराज परमार व मोहित राजपूत यांनी सहभागातून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे नियोजन कल्चरल कमिटीतील प्राध्यापिका कल्याणी चौधरी, जागृती शेवाळे, पूजा गायकवाड, भावना वसावे, तश्विता मगरे व श्रद्धा पटेल यांनी समन्वयाने…

Read More

नंदुरबार (प्रतिनिधी) शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय संविधान दिन मोठ्या उत्साहात, अनुशासनबद्ध वातावरणात आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. संविधान दिनाचे औचित्य साधत उपस्थितांनी प्रास्ताविक वाचनातून संविधानाबद्दल आदर व्यक्त केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संविधानाचे महत्व, त्यातील मूलभूत हक्क व कर्तव्ये आणि नागरिक म्हणून प्रत्येकाने पाळावयाच्या मूल्यांवर सखोल प्रकाश टाकला. “संविधान हा देशाच्या विकासाचा भक्कम पाया असून त्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले. युवा वर्गाने संविधानातील लोकशाही, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांना दैनंदिन…

Read More

नंदुरबार (प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीचे नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख युवा नेतृत्व आणि गेल्या चार–पाच वर्षांपासून पक्षाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळणारे युवा जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ सूर्यवंशी यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या मोठ्या प्रवेशामुळे भाजपला जिल्ह्यातील युवा वर्गामध्ये अधिक बळ प्राप्त झाले असून वंचित बहुजन आघाडीसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. या प्रवेश सोहळ्यास माजी मंत्री व आमदार डॉ. विजयकुमार गावित हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सुनील सूर्यवंशी यांच्या प्रवेशानंतर डॉ. गावित यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांचे मनापासून स्वागत केले. गेल्या काही वर्षांत सुनील सूर्यवंशी यांनी जिल्ह्यात मोठा जनसंपर्क वाढवत वंचित बहुजन…

Read More

नंदुरबार | प्रतिनिधी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना (शिंदे गट)चे वरिष्ठ नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्ह्यातील संपूर्ण राजकीय परिस्थिती, युतीचे प्रयत्न, उमेदवारांची स्थिती आणि आगामी रणनिती स्पष्टपणे मांडली. महायुतीने दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक पातळीवर युतीसाठी प्रयत्न झाले असले तरी काही ठिकाणी ते शक्य झाले नाही, असे त्यांनी सांगितले. नंदुरबार आणि तळोदा — धनुष्यबाणवर पूर्ण पॅनल उभा रघुवंशी यांनी स्पष्ट केले की नंदुरबार आणि तळोदा या दोन्ही नगरपालिकांमध्ये शिवसेना (शिंदे गट) धनुष्यबाण या अधिकृत चिन्हावर पूर्ण पॅनलसह निवडणूक लढवत आहे. नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे चार उमेदवारही या पॅनलमध्ये सहभागी असून, तेही धनुष्यबाणवरच निवडणूक…

Read More

बामडोद (ता. नंदुरबार) | दिनांक 4 नोव्हेंबर 2025 – शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथे “अविष्कार २०२६” या शैक्षणिक आणि संशोधनाधिष्ठित प्रकल्प सादरीकरण स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमात एकूण २८ विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपले नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सादर करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या दिशेने पाऊल टाकून नवसंकल्पना विकसित कराव्यात आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवावा, यासाठी “अविष्कार”सारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून श्री. भुषण टी. गोपाळ यांनी तर महिला समन्वयक म्हणून सौ. ताश्विता पी. मगरे यांनी कार्यभार…

Read More