Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!
  • दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»प्रशासकीय»सेवापुर्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभ देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम – सीईओ नमन गोयल, नंदुरबार जिल्हा परिषदेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा
प्रशासकीय

सेवापुर्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभ देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम – सीईओ नमन गोयल, नंदुरबार जिल्हा परिषदेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेFebruary 2, 2026No Comments16 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

नंदुरबार (प्रतिनिधी):
जिल्हा परिषद प्रशासनातील विविध विभागात दीर्घकाळ सेवा देऊन सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान व्हावा तसेच सेवापुर्तीच्या दिवशीच त्यांना सर्व सेवाविषयक लाभ मिळावेत, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या याहा मोगी सभागृहात सामान्य प्रशासन विभागामार्फत जानेवारीअखेर सेवानिवृत्त झालेल्या वर्ग–३ व वर्ग–४ मधील कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना नमन गोयल बोलत होते. त्यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
श्री गोयल म्हणाले की, जिल्हा परिषद प्रशासनातील कर्मचारी आपल्या आयुष्यातील ३० ते ३५ वर्षे प्रामाणिकपणे सेवा देतात. अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळी सन्मानपूर्वक निरोप देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. या भावनेतूनच सेवापुर्तीच्या दिवशीच निवृत्तीवेतन, ग्रॅच्युइटीसह सर्व सेवाविषयक लाभांचे आदेश देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना विविध कार्यालयांत फिरावे लागणार नाही.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसुरकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण देवरे, शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश मोरे यांनी केले.
यावेळी सेवानिवृत्त झालेले केंद्रप्रमुख श्रीमती ललिता भामरे, मुख्याध्यापक प्रभाकर ठाकरे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यादव मोरे, प्राथमिक शिक्षक साहेबराव रजाळे, पंतू गावित, नरेंद्र कुवर, राजाराम पाटील, श्रीमती सुरेखा सोनवणे, मानसिंग वळवी, श्रीमती ललिता पावरा, वरिष्ठ सहाय्यक रतिलाल चौरे व रतिलाल गावित यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल व वृक्षारोपण देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सेवापुर्ती निमित्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सर्व सेवाविषयक लाभांचे आदेश तत्काळ देण्यात आले.
सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्रीमती ललिता भामरे व शिक्षक पंतू गावित यांनी मनोगतातून जिल्हा परिषद प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. सेवापुर्तीनंतर लगेचच सेवाविषयक लाभ मिळाल्याने निवृत्तीनंतरची धावपळ थांबेल व निवृत्तीवेतन वेळेवर सुरू होणार असल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनील पाटील सर यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

लिपिकांच्या मागण्यांवर शासन दरबारी सकारात्मक चर्चा; लवकर निर्णयाची शक्यता

March 15, 2026

नंदुरबारमध्ये ‘नंदिनी मिनी सरस’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; पाच दिवसांत ५३ लाखांची उलाढाल

March 12, 2026

घरकुल व नरेगा कामांबाबत अधिकाऱ्यांचे आंदोलन ; नंदुरबारमध्ये प्रशासनाला निवेदन

December 8, 2025
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.