Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने एकलव्य विद्यालयात रंगला आदिवासी गौरव दिन

August 8, 2026

डॉ. सुप्रियाताई विजयकुमार गावित यांची भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड; नंदुरबारसह नाशिक विभागात जल्लोष

August 5, 2026

सोशल मीडियावर तलवारीचे प्रदर्शन करून दहशत पसरविणाऱ्यावर पोलिसांची कारवाई; लोखंडी तलवार जप्त

August 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने एकलव्य विद्यालयात रंगला आदिवासी गौरव दिन
  • डॉ. सुप्रियाताई विजयकुमार गावित यांची भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड; नंदुरबारसह नाशिक विभागात जल्लोष
  • सोशल मीडियावर तलवारीचे प्रदर्शन करून दहशत पसरविणाऱ्यावर पोलिसांची कारवाई; लोखंडी तलवार जप्त
  • गुरुपौर्णिमेनिमित्त एकलव्य विद्यालयात महर्षी व्यास व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त
  • वनपट्टाधारक शेतकऱ्यांची e-KYC तातडीने पूर्ण करा; पीक कर्जाचा मार्ग मोकळा करा – श्री रतनदादा पाडवी
  • PM-किसान योजनेतील ‘Block Level Pending’ अर्ज तातडीने निकाली काढा; पात्र शेतकऱ्यांना लाभ द्या – श्री रतनदादा पाडवी
  • मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयामुळे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा; कर्जमाफी व वीजबिल माफी ऐतिहासिक : मंत्री संजय सावकारे
  • लोकनेते स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहात वृक्षारोपण
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»क्राईम»सोशल मीडियावर तलवारीचे प्रदर्शन करून दहशत पसरविणाऱ्यावर पोलिसांची कारवाई; लोखंडी तलवार जप्त
क्राईम

सोशल मीडियावर तलवारीचे प्रदर्शन करून दहशत पसरविणाऱ्यावर पोलिसांची कारवाई; लोखंडी तलवार जप्त

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेAugust 3, 2026No Comments17 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

नंदुरबार : सोशल मीडियावर हातात तलवार घेऊन व्हिडिओ प्रसारित करत नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या युवकाविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसांनी तातडीची कारवाई करत त्याला अटक केली असून त्याच्या ताब्यातील लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच भारतीय हत्यार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या सूचनेनुसार नंदुरबार शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

याच मोहिमेअंतर्गत १ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजता नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, हलवाई गल्ली परिसरात एक युवक हातात लोखंडी तलवार घेऊन फिरत असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून नागरिकांमध्ये भीती निर्माण केली जात आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित युवकाला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली.

या प्रकरणी कासीम मुस्ताक हलवाई (वय २७, रा. बोडगाव, ता. जि. नंदुरबार) याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७(१)(३) सह कलम १३५ तसेच भारतीय हत्यार अधिनियम, १९५९ मधील कलम ४/२५ अन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोलीस हवालदार जगदीश पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल रुपेश पगारे, राजेंद्र कटके, ललित गवळी, अमित भरवाड, राहुल राठोड आणि निंबा वाघमोडे यांच्या पथकाने केली.

दरम्यान, नंदुरबार शहर पोलीस हद्दीत विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या हद्दपार इसमांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १४२ अन्वये तसेच चोरीची मालमत्ता बाळगणाऱ्यांविरुद्धही सातत्याने कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

◆◆ नागरिकांना पोलिसांचे आवाहन ◆◆

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी किंवा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने घातक शस्त्रांचे प्रदर्शन करणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे. अशा कृत्यांना कोणतीही सहानुभूती दाखविण्यात येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी कोणीही बेकायदेशीररीत्या घातक शस्त्र बाळगत असल्याचे किंवा सोशल मीडियावर अशा प्रकारचे व्हिडिओ, रील्स अथवा पोस्ट प्रसारित होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नंदुरबार शहर पोलिसांनी केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

आंतरराज्यीय मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ३०.३० लाखांच्या ३२ दुचाकी जप्त, नंदुरबार एलसीबीची धडाकेबाज कामगिरी

June 27, 2026

नंदुरबार पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम; ३५.२० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, जिल्ह्यात सुरक्षिततेची भावना अधिक बळकट

June 27, 2026

शेतकऱ्यांच्या घामाच्या कमाईवर चोरट्यांचा डल्ला; ग्रामीण भागातील वाढत्या चोरींनी शेतकरी भयभीत, पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा

June 27, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,118

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025790

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025617
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.