Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!
  • दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»क्राईम»आंतरराज्यीय मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ३०.३० लाखांच्या ३२ दुचाकी जप्त, नंदुरबार एलसीबीची धडाकेबाज कामगिरी
क्राईम

आंतरराज्यीय मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ३०.३० लाखांच्या ३२ दुचाकी जप्त, नंदुरबार एलसीबीची धडाकेबाज कामगिरी

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेJune 27, 2026No Comments74 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

नंदुरबार  (प्रतिनिधी) नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारीविरोधातील मोहिमेत आणखी एक मोठे यश संपादन करत आंतरराज्यीय मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) केलेल्या या धडाकेबाज कारवाईत तब्बल ३० लाख ३० हजार रुपये किमतीच्या ३२ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून नंदुरबार, नाशिक, मध्यप्रदेश आणि गुजरातमधील एकूण १९ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप यांनी गुन्हे आढावा बैठकीत जिल्ह्यातील प्रलंबित मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने आढावा घेत संबंधित गुन्ह्यांचा तपास वेगाने पूर्ण करण्याचे आणि सक्रिय गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा बारकाईने अभ्यास करून चोरीचे ठिकाण, वेळ, पद्धत, संशयित गुन्हेगारांची माहिती तसेच गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय केले.

याच तपासादरम्यान २६ जून रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे म्हसावद येथील चिखली फाटा परिसरात सापळा रचण्यात आला. तेथे संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोन युवकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी चोरीची स्प्लेंडर मोटारसायकल विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले.

सखोल चौकशीत या तिघांनी नंदुरबार, नाशिक, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरी करून त्या नातेवाईक, मित्र आणि परिचितांकडे लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून ३२ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या.

तपासात नंदुरबार जिल्ह्यातील २, नाशिक जिल्ह्यातील ५, मध्यप्रदेशातील ६ आणि गुजरातमधील ६ असे एकूण १९ गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरित दुचाकींच्या मूळ मालकांचा शोध घेण्याचे काम सुरू असून संबंधित गुन्ह्यांची पडताळणी केली जात आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ तसेच त्यांच्या संपूर्ण पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वाढता धाक

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने गेल्या काही महिन्यांत अवैध धंदे, मोटारसायकल चोरी, घरफोडी, बनावट दारू, प्रतिबंधित गुटखा, अमली पदार्थ आणि इतर गंभीर गुन्ह्यांवर सातत्याने प्रभावी कारवाया केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होत आहे.

या कारवाईमुळे केवळ चोरीस गेलेल्या वाहनांचे मालकांनाच दिलासा मिळाला नसून, आंतरराज्यीय स्तरावर कार्यरत असलेल्या वाहनचोरीच्या टोळ्यांविरोधात नंदुरबार पोलीस सक्षम आणि सज्ज असल्याचा ठोस संदेशही गुन्हेगारांना मिळाला आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नंदुरबार पोलीस दल अशाच धडाकेबाज कारवाया पुढेही सुरू ठेवणार असल्याचा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

August 23, 2026

नंदुरबार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! सराईत घरफोडी आरोपी जेरबंद; चार गुन्ह्यांची उकल, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

August 15, 2026

सोशल मीडियावर तलवारीचे प्रदर्शन करून दहशत पसरविणाऱ्यावर पोलिसांची कारवाई; लोखंडी तलवार जप्त

August 3, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.