Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!
  • दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»क्राईम»नंदुरबार पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम; ३५.२० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, जिल्ह्यात सुरक्षिततेची भावना अधिक बळकट
क्राईम

नंदुरबार पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम; ३५.२० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, जिल्ह्यात सुरक्षिततेची भावना अधिक बळकट

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेJune 27, 2026No Comments73 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

नंदुरबार  (प्रतिनिधी) नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने अवैध धंदे, गंभीर गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरू केलेल्या धडक मोहिमेला सातत्याने यश मिळत असून, त्यातून सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई, गुन्ह्यांचा वेगाने उलगडा आणि अवैध व्यवसायांवर कठोर अंकुश यामुळे पोलीस दलाबद्दल जनतेचा विश्वास अधिक वाढत आहे.

याच धडाकेबाज कारवाईचा भाग म्हणून नवापूर पोलिसांनी सुमारे ३५ लाख २० हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू आणि कंटेनर जप्त करत मोठी कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नवापूर येथील कुणाल हॉटेल परिसरात नाकाबंदी करून राजस्थान क्रमांकाच्या कंटेनरची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान विविध पार्सलमध्ये लपवून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधी तंबाखू आढळून आला. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मालाची तपासणी करून तो महाराष्ट्रात प्रतिबंधित असल्याचे स्पष्ट केल्यानंतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकास अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनात नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

यापूर्वीही जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक गंभीर गुन्ह्यांचा उलगडा, अवैध धंद्यांवर कारवाई, चोरी, दरोडे, अवैध मद्य, अमली पदार्थ तसेच इतर गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यात पोलीस दलाला यश आले आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी समन्वयाने काम करत असल्याने गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला आहे.

अवैध व्यवसायांना आळा घालणे, गुन्हेगारांना तातडीने अटक करणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणे या उद्देशाने नंदुरबार पोलीस दल सातत्याने कार्यरत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होत आहे. विशेषतः ग्रामीण व शहरी भागात सुरू असलेल्या या प्रभावी मोहिमेमुळे कायद्याचा सन्मान वाढत असून गुन्हेगारीला आळा बसण्यास मोठी मदत होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

जिल्ह्यातील नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करून संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ देण्याचे आवाहन करण्यात आले असून, पोलीस व जनता यांच्या समन्वयातून नंदुरबार जिल्हा अधिक सुरक्षित आणि गुन्हेमुक्त करण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने कायम ठेवला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

August 23, 2026

नंदुरबार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! सराईत घरफोडी आरोपी जेरबंद; चार गुन्ह्यांची उकल, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

August 15, 2026

सोशल मीडियावर तलवारीचे प्रदर्शन करून दहशत पसरविणाऱ्यावर पोलिसांची कारवाई; लोखंडी तलवार जप्त

August 3, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.