Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 2026

आंतरराज्यीय घरफोडी टोळी जेरबंद; १७.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार गुन्हे उघड

June 8, 2026

रोहिंग्या शिबिरांतील वाढता दहशतवाद आणि बांगलादेशसमोरील सुरक्षा संकट

June 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत
  • आंतरराज्यीय घरफोडी टोळी जेरबंद; १७.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार गुन्हे उघड
  • रोहिंग्या शिबिरांतील वाढता दहशतवाद आणि बांगलादेशसमोरील सुरक्षा संकट
  • सोनसाखळी चोरांच्या आंतरराज्यीय टोळीला बेड्या; १८ गुन्हे उघड, ५.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त
  • कत्तलखान्याच्या मुद्द्यावर नंदुरबारची राजकीय रणधुमाळी; विरोधकांचा हिंदुत्वाचा सवाल तर सत्ताधाऱ्यांचा प्रसिद्धी स्टंटचा आरोप
  • विकसित भारत 2047 साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्याचा नंदुरबारमध्ये अभिनव उपक्रम
  • शहादा पोलिसांची मोठी कारवाई : ४.८१ लाखांचा सुका गांजा जप्त; दोन आरोपी ताब्यात
  • ऑपरेशन सिंदूर : आधुनिक युद्धातील भारताच्या तांत्रिक सामर्थ्याची प्रभावी झलक
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»क्राईम»सोनसाखळी चोरांच्या आंतरराज्यीय टोळीला बेड्या; १८ गुन्हे उघड, ५.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

सोनसाखळी चोरांच्या आंतरराज्यीय टोळीला बेड्या; १८ गुन्हे उघड, ५.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेJune 1, 2026No Comments38 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

 

स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई; पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणखी एक मोठे यश

नंदुरबार : जिल्ह्यातील वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नंदुरबार पोलीस दलाने मोठी कामगिरी करत आंतरराज्यीय सोनसाखळी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक करून नंदुरबार जिल्ह्यातील ५ आणि महाराष्ट्रासह कर्नाटकातील १३ असे एकूण १८ गुन्हे उघडकीस आणले असून ५ लाख ४३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मागील काही महिन्यांपासून नंदुरबार शहर, उपनगर परिसर तसेच राज्यातील विविध भागांमध्ये धुमस्टाईल सोनसाखळी चोरीच्या घटना घडत होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर प्रकारांची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी गुन्ह्यांचा छडा लावण्याचे स्पष्ट निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.
या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांनी अत्यंत बारकाईने तपासाची सूत्रे हातात घेतली. विविध जिल्ह्यांतील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास करून त्यांनी तपासाला योग्य दिशा दिली. त्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड येथे सापळा रचून राहुल राजाराम गायकवाड व अविनाश नवनाथ टिळकर या दोघांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपींनी नंदुरबार जिल्ह्यातील ५ सोनसाखळी चोरीचे गुन्हे कबूल केले. त्यांच्याकडून ४ लाख १८ हजार २०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली १ लाख २५ हजार रुपयांची मोटारसायकल असा एकूण ५ लाख ४३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपींनी अकोला, अमरावती, जळगाव, अहिल्यानगर, सांगली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर तसेच कर्नाटकातील बेळगाव येथे देखील अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पडताळणीत महाराष्ट्र व कर्नाटकातील आणखी १३ गुन्हे उघडकीस आले. यामुळे या टोळीचा मोठा गुन्हेगारी नेटवर्क उघड झाला आहे.

हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारांवर वचक

नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी तपास लावण्यात आला आहे. अवैध धंद्यांवर कारवाई, अंमली पदार्थविरोधी मोहिमा, चोरी व दरोड्यांचे गुन्हे उघड करणे तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेने अनेक आव्हानात्मक गुन्ह्यांची उकल करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे.

सोनसाखळी चोरीसारख्या गंभीर आणि आव्हानात्मक गुन्ह्यांचा छडा लावत आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेले हे यश नंदुरबार पोलीस दलासाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार मुकेश तावडे, मनोज नाईक, मोहन ढमढेरे, अभय राजपूत, आनंदा मराठे आदींच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

आंतरराज्यीय घरफोडी टोळी जेरबंद; १७.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार गुन्हे उघड

June 8, 2026

शहादा पोलिसांची मोठी कारवाई : ४.८१ लाखांचा सुका गांजा जप्त; दोन आरोपी ताब्यात

May 16, 2026
ताज्या बातम्या

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025802

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025769

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025602

नंदुरबार व तळोद्यात शिवसेनेचे पूर्ण पॅनल; काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी अपयशी — आमदार रघुवंशी ची पत्रकार परिषदेत माहिती

November 18, 2025566
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.