Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- कर्तृत्व, कठोरता आणि विश्वासाचा चेहरा — हेमंत सुभाष पाटील साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
- सीएपीएफमधील आयपीएस नेतृत्वाची भूमिका संस्थात्मकदृष्ट्या का आवश्यक आहे?
- नाशिक येथे पत्रकार पदविका कोर्समध्ये विशाल गायकवाड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
- लिपिकांच्या मागण्यांवर शासन दरबारी सकारात्मक चर्चा; लवकर निर्णयाची शक्यता
- लिपिकांच्या मागण्यांवर शासन दरबारी सकारात्मक चर्चा; लवकर निर्णयाची शक्यता
- नंदुरबारमध्ये ‘नंदिनी मिनी सरस’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; पाच दिवसांत ५३ लाखांची उलाढाल
- शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये महादेवलाल श्रॉफ व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
- जनआंदोलनापासून तुकड्या-तुकड्यांच्या आंदोलनापर्यंत: बदलता कामगार संघटनांचा चेहरा
Author: जगदिश निळकंठ सोनवणे
नंदुरबार (प्रतिनिधी) शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय संविधान दिन मोठ्या उत्साहात, अनुशासनबद्ध वातावरणात आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. संविधान दिनाचे औचित्य साधत उपस्थितांनी प्रास्ताविक वाचनातून संविधानाबद्दल आदर व्यक्त केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संविधानाचे महत्व, त्यातील मूलभूत हक्क व कर्तव्ये आणि नागरिक म्हणून प्रत्येकाने पाळावयाच्या मूल्यांवर सखोल प्रकाश टाकला. “संविधान हा देशाच्या विकासाचा भक्कम पाया असून त्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले. युवा वर्गाने संविधानातील लोकशाही, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांना दैनंदिन…
नंदुरबार (प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीचे नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख युवा नेतृत्व आणि गेल्या चार–पाच वर्षांपासून पक्षाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळणारे युवा जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ सूर्यवंशी यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या मोठ्या प्रवेशामुळे भाजपला जिल्ह्यातील युवा वर्गामध्ये अधिक बळ प्राप्त झाले असून वंचित बहुजन आघाडीसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. या प्रवेश सोहळ्यास माजी मंत्री व आमदार डॉ. विजयकुमार गावित हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सुनील सूर्यवंशी यांच्या प्रवेशानंतर डॉ. गावित यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांचे मनापासून स्वागत केले. गेल्या काही वर्षांत सुनील सूर्यवंशी यांनी जिल्ह्यात मोठा जनसंपर्क वाढवत वंचित बहुजन…
नंदुरबार | प्रतिनिधी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना (शिंदे गट)चे वरिष्ठ नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्ह्यातील संपूर्ण राजकीय परिस्थिती, युतीचे प्रयत्न, उमेदवारांची स्थिती आणि आगामी रणनिती स्पष्टपणे मांडली. महायुतीने दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक पातळीवर युतीसाठी प्रयत्न झाले असले तरी काही ठिकाणी ते शक्य झाले नाही, असे त्यांनी सांगितले. नंदुरबार आणि तळोदा — धनुष्यबाणवर पूर्ण पॅनल उभा रघुवंशी यांनी स्पष्ट केले की नंदुरबार आणि तळोदा या दोन्ही नगरपालिकांमध्ये शिवसेना (शिंदे गट) धनुष्यबाण या अधिकृत चिन्हावर पूर्ण पॅनलसह निवडणूक लढवत आहे. नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे चार उमेदवारही या पॅनलमध्ये सहभागी असून, तेही धनुष्यबाणवरच निवडणूक…
बामडोद (ता. नंदुरबार) | दिनांक 4 नोव्हेंबर 2025 – शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथे “अविष्कार २०२६” या शैक्षणिक आणि संशोधनाधिष्ठित प्रकल्प सादरीकरण स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमात एकूण २८ विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपले नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सादर करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या दिशेने पाऊल टाकून नवसंकल्पना विकसित कराव्यात आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवावा, यासाठी “अविष्कार”सारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून श्री. भुषण टी. गोपाळ यांनी तर महिला समन्वयक म्हणून सौ. ताश्विता पी. मगरे यांनी कार्यभार…
नंदुरबार (प्रतिनिधी) नंदुरबार तालुक्यातील शनिमाडळ, तिलाली, तलवाडे आणि रनाळे परिसरातील शेकडो शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून मोठी राजकीय घडामोड घडवून आणली आहे. महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री व विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या विकासदृष्टी आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी आमदार डॉ. गावित, माजी खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील तसेच जिल्हा परिषदेचे शनिमाडळ गटाचे माजी सदस्य प्रवीण पाटील उर्फ मुन्नादादा प्रमुख उपस्थितीत पार पडला. भाजपात प्रवेश केलेल्यांमध्ये तिलाली गावचे माजी सरपंच व…
नंदुरबार जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक समीकरणात मोठा बदल घडवणारी घटना म्हणजे ‘संसद रत्न’ पुरस्कार विजेत्या माजी खासदार डॉ. हीना विजयकुमार गावित यांचे पक्षात झालेले जोरदार पुनरागमन. भाजपात पुनःप्रवेश घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत केलेली वक्तव्ये केवळ राजकीय भूमिका नसून पक्षासाठी येणाऱ्या काळात मार्गदर्शक दिशादर्शक ठरणारी ठरली आहेत. त्यांचे पुनरागमन हे नंदुरबार भाजपासाठी नवा श्वास मानला जात आहे. 🔹 राजकीय पुनरागमनाची पार्श्वभूमी गेल्या काही महिन्यांत डॉ. गावित यांनी पक्षाचा तांत्रिक राजीनामा दिला होता, मात्र त्यांनी प्रत्यक्षात कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवत पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम आणि विविध संघटनात्मक उपक्रम राबवले. त्यामुळे त्यांच्या पुनरागमनाची प्रक्रिया केवळ औपचारिक होती. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मा…
भारताची एकता ही केवळ कायद्याने लादलेली नाही; ती दैनंदिन जीवनात, सणांमध्ये, कलाप्रकारांमध्ये, संगीतामध्ये आणि सामायिक परंपरांमध्ये अनुभवली जाते. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त, राष्ट्रनिर्माणात संस्कृती आणि विविधतेची भूमिका ओळखणे हे देश कसा विविधतेचा उत्सव साजरा करताना सुसंवाद टिकवतो याचे सर्वांगीण आकलन देते. ◆◆ भारताचा सांस्कृतिक मोझेक काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारतात शेकडो भाषा, डझनभर धर्म आणि असंख्य सांस्कृतिक प्रथा आहेत. सण, विधी आणि कलात्मक अभिव्यक्ती या समुदायांमधील पूल म्हणून काम करतात, परस्पर समज आणि आदर वाढवतात. या माध्यमांतून नागरिकांना आपली वेगळेपण आणि सामूहिक ओळख दोन्ही साजरी करता येतात. प्रादेशिक मेळे, लोककला सादरीकरणे आणि पारंपरिक सण विविध पार्श्वभूमीतील लोकांना एकत्र आणतात आणि भौगोलिक, जातीय किंवा…
🔷 नंदुरबारचा सामाजिक आणि राजकीय पट — संघर्ष, विचार आणि आशेचा प्रवास नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्राच्या उत्तर कोपऱ्यातील भौगोलिकदृष्ट्या मागास, परंतु विचारांनी प्रगल्भ असा प्रदेश. येथील डोंगरकपारींमध्ये राहणारा आदिवासी समाज, वंचित घटक आणि शोषित वर्ग आजही आपल्या हक्कांसाठी संघर्ष करत आहे. या संघर्षाच्या भूमीतून नेहमीच काही विचारवंत, समाजसेवक, आणि लढवय्ये नेते निर्माण झाले आहेत. अशाच या भूमीत आज एक नव्या युगाचा प्रवास सुरू झाला आहे वंचित बहुजन आघाडी आणि तिचा तरुण नेता श्री सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली!— 🔷 सुनील सूर्यवंशी — संघर्षातून उभा राहिलेला तरुण नेता फक्त 33 वर्षांचा हा तरुण! पण विचार मात्र अत्यंत प्रगल्भ. डॉ. बाबासाहेब…
नंदुरबार (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज जाहीर झालेल्या तालुकानिहाय आरक्षण सोडतीनंतर नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलल्याचे चित्र दिसून आले आहे. अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला आरक्षणामुळे अनेक गटांची संरचना बदलली असून गेल्या वर्षभरापासून लोकसंपर्क, सामाजिक बांधिलकी, मंडळांमधील सहभाग, वर्गण्या, कार्यक्रमांमध्ये उपस्थिती अशा माध्यमांतून आपली ताकद दाखवणाऱ्या अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे. अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर या सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती महिलांसाठी गट राखीव झाल्याने बहुतेक सर्वसामान्य व नागरिकांचा मागास प्रवर्ग मधून येणाऱ्या पुरुष उमेदवारांना या वेळी स्पर्धेबाहेर रहावे लागणार आहे.…
नंदुरबार (प्रतिनिधी) – “रक्तदान म्हणजे मानवतेचे खरे पूजन” या भावनेला जीवनधर्म मानणाऱ्या नंदुरबार येथील श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने पुन्हा एकदा नंदुरबारचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे. मध्यप्रदेशातील महाकाल नगरी उज्जैन येथे झालेल्या भव्य समारंभात या संस्थेला ‘राष्ट्रीय अवंतिका सेवा सम्मान म.प्र. – 2025’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान ‘उज्जयनी रक्त संचार संस्था सेवा गृप, उज्जैन’ यांच्या वतीने प्रदान करण्यात आला असून, श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनचा हा वर्ष 2025 मधील चौथा राष्ट्रीय पुरस्कार आहे — जे त्यांच्या अखंड सेवाभावाचे प्रतीक आहे. 🩸 सोशल मीडियातून निर्माण झालेली जीवनदायिनी साखळी नंदुरबारमधील या फाऊंडेशनने व्हॉट्सॲप ग्रुपच्या…

