Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत

August 27, 2026

गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

August 23, 2026

चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक

August 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत
  • गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान
  • चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक
  • मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड
  • कै. श्री. पी. एन. पाटील यांच्या कुटुंबीयांची ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सांत्वनभेट
  • नंदुरबार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! सराईत घरफोडी आरोपी जेरबंद; चार गुन्ह्यांची उकल, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
  • जिल्ह्याच्या विकासकामांना गती; ऑक्टोबरअखेर अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश
  • रस्त्यांच्या दुरवस्थेवर पालकमंत्र्यांची तीव्र नाराजी; आता दर महिन्याला तालुकानिहाय आढावा
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»राजकारण»आरक्षण सोडतीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ — अनेक इच्छुकांचा हिरमोड, महिला उमेदवारांना संधी
राजकारण

आरक्षण सोडतीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ — अनेक इच्छुकांचा हिरमोड, महिला उमेदवारांना संधी

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेOctober 13, 2025No Comments150 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter
नंदुरबार (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज जाहीर झालेल्या तालुकानिहाय आरक्षण सोडतीनंतर नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलल्याचे चित्र दिसून आले आहे. अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला आरक्षणामुळे अनेक गटांची संरचना बदलली असून गेल्या वर्षभरापासून लोकसंपर्क, सामाजिक बांधिलकी, मंडळांमधील सहभाग, वर्गण्या, कार्यक्रमांमध्ये उपस्थिती अशा माध्यमांतून आपली ताकद दाखवणाऱ्या अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.
     अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर या सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती महिलांसाठी गट राखीव झाल्याने बहुतेक सर्वसामान्य व नागरिकांचा मागास प्रवर्ग मधून येणाऱ्या पुरुष उमेदवारांना या वेळी स्पर्धेबाहेर रहावे लागणार आहे. विशेष म्हणजे, अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी, पिंपळखुटा, मोरखी, मोरांबा हे गट अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक पुरुष इच्छुकांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. तर अक्राणी तालुक्यातील सावऱ्यादिगर, तेलखेडी, कात्री रे., मांडवी बु. हेही महिला आरक्षित गट ठरले आहेत.
     शहादा तालुक्यातील आरक्षणामुळे तर मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. येथे मोहिदे तर्फे शहादा गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने काही प्रमुख नेत्यांचे राजकीय गणित कोलमडले आहे. त्याचवेळी म्हसावद, सुलतानपूर हे गट अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव ठरल्याने महिलांना मोठी संधी मिळाल्याचे चित्र आहे. वडाळी, कहाटूळ, सारंगखेडा, लोणखेडा, प्रकाशा या गटांवर नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण आल्याने अनेक प्रतिष्ठित नेत्यांची जागा राखीव गटात गेल्याने त्यांना पर्यायी गट शोधण्याची वेळ आली आहे.
    नंदुरबार तालुक्यातही आरक्षणाचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे. कोपर्ली गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आणि मांडळ, रनाळा, कोळदे, खोंडामळी हे गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाल्याने स्थानिक पातळीवरील सक्रिय पुरुष उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. तर पातोंडा, नांदर्खे, धानोरा हे गट अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव असल्याने महिलांना पुढे येण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
     नवापूर तालुक्यात तर महिला उमेदवारांसाठी ‘सोन्याची संधी’ निर्माण झाली आहे. सात गट अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव ठरल्याने येथील राजकीय समीकरणात महिलांचे वर्चस्व वाढणार आहे, तर पारंपरिक पुरुष नेतृत्वाच्या गोटात निराशेचे वातावरण आहे.
      या सर्व घडामोडींमुळे नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक गटांमध्ये उमेदवारांनी गेल्या वर्षभरापासून सामाजिक संपर्क वाढवून, गणेशोत्सव व नवरात्रोत्सवातील मंडळांमध्ये देणग्या देऊन, विविध सुखदुःखात सहभागी होत जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, आजच्या आरक्षण सोडतीने त्यांचे सर्व गणित विस्कटल्याचे चित्र आहे.
      तथापि, महिला आरक्षणाच्या वाढत्या संख्येमुळे राजकारणात नवीन चेहरे पुढे येण्याची शक्यता वाढली आहे. अनुसूचित जमाती व मागास प्रवर्गातील महिलांना राजकीय सक्षमीकरणाची संधी मिळाल्याने अनेकांनी उत्साह व्यक्त केला आहे. आता आगामी काळात कोण कोणत्या गटातून आपला राजकीय पत्ता बदलते, कोण नवीन चेहरे पुढे येतात आणि कोण आपली ताकद टिकवतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का; नंदुरबारचे युवा जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात

November 20, 2025

नंदुरबार व तळोद्यात शिवसेनेचे पूर्ण पॅनल; काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी अपयशी — आमदार रघुवंशी ची पत्रकार परिषदेत माहिती

November 18, 2025

भाजपात ‘संसद रत्न’ डॉ. हीना गावित यांचे पुनरागमन : नंदुरबार जिल्ह्यात भाजपला नवी ऊर्जा; येणाऱ्या काळात पक्षाच्या विजयाचा ‘केंद्रीय चेहरा’ ठरण्याची शक्यता

November 3, 2025
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,118

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025790

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025618
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.