Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!
  • दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»आरोग्य»उजैन महाकाल नगरीत श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय सन्मान — ‘राष्ट्रीय अवंतिका सेवा सम्मान म.प्र. 2025’ ने गौरव 
आरोग्य

उजैन महाकाल नगरीत श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय सन्मान — ‘राष्ट्रीय अवंतिका सेवा सम्मान म.प्र. 2025’ ने गौरव 

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेOctober 11, 2025No Comments23 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

नंदुरबार (प्रतिनिधी) – “रक्तदान म्हणजे मानवतेचे खरे पूजन” या भावनेला जीवनधर्म मानणाऱ्या नंदुरबार येथील श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने पुन्हा एकदा नंदुरबारचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे. मध्यप्रदेशातील महाकाल नगरी उज्जैन येथे झालेल्या भव्य समारंभात या संस्थेला ‘राष्ट्रीय अवंतिका सेवा सम्मान म.प्र. – 2025’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान ‘उज्जयनी रक्त संचार संस्था सेवा गृप, उज्जैन’ यांच्या वतीने प्रदान करण्यात आला असून, श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनचा हा वर्ष 2025 मधील चौथा राष्ट्रीय पुरस्कार आहे — जे त्यांच्या अखंड सेवाभावाचे प्रतीक आहे.

🩸 सोशल मीडियातून निर्माण झालेली जीवनदायिनी साखळी

नंदुरबारमधील या फाऊंडेशनने व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून असंख्य रक्तदाते एकत्र आणले असून, गरजू रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध करून देण्यात ही संस्था आज जिल्ह्यात जीवनवाहिनी ठरली आहे. जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासल्यास, या ग्रुपवर केलेल्या एका संदेशानंतर काही मिनिटांतच रक्तदाते धावून येतात — अनेक जीव वाचविण्यात या चळवळीचा थेट हातभार लागतो.

रक्तदान या “महादान” कार्यात सातत्याने सक्रिय राहिल्यामुळेच मध्यप्रदेशातील उज्जैन येथील उज्जयनी रक्त संचार संस्था यांनी श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनच्या सेवाकार्याची दखल घेत ही राष्ट्रीय पातळीवरील गौरवाची शाल त्यांच्यावर चढवली आहे.

◆ भव्य समारंभात पुरस्कार स्वीकृती

उज्जैन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात फाऊंडेशनचे कार्यकर्ते श्री अरुण शांतीलाल साळुंखे व सौ. साधना अरुण साळुंखे यांनी हा पुरस्कार स्विकारला. या राष्ट्रीय सोहळ्यात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, गुजरात, तेलंगणा, छत्तीसगड आदी राज्यांतील ८० सामाजिक संस्थांचा गौरव करण्यात आला.

या प्रसंगी उज्जैन नगरपालिकेच्या सभापती कलावती यादव, नेता प्रतिपक्ष रवि राय, राज्य मंत्री व वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सनवर पटेल, तसेच मुख्यमंत्री मोहन यादव यांचे मोठे बंधू नारायण यादव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

◆ रक्तदात्यांच्या सेवाभावाचा विजय

या चळवळीत महेंद्र झवर, जीवन माळी, अजय देवरे, हितेश कासार, सुधीरकुमार ब्राम्हणे, पो.कॉ. अभय राजपूत आदी कार्यकर्त्यांचे उल्लेखनीय योगदान असून, या सर्वांच्या निस्वार्थ सेवेमुळे नंदुरबार जिल्हा आज “रक्तदात्यांचा आदर्श जिल्हा” म्हणून ओळख निर्माण करीत आहे.—

◆ संस्थेचा संदेश

श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनचे संस्थापक सदस्य म्हणाले — “रक्तदान म्हणजे मानवतेची साक्ष आहे. एका थेंबातून हजारो जीवांचे हसू फुलते, आणि हे हसू टिकविणे हेच आमचे ध्येय आहे.”

नंदुरबारसाठी अभिमानाचा क्षण!
महाकाल नगरीत राष्ट्रीय सन्मानाचा मान मिळवत श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनने “दान हीच सेवा, आणि सेवा हाच धर्म” या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून आकार दिला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

रोहिंग्या शिबिरांतील वाढता दहशतवाद आणि बांगलादेशसमोरील सुरक्षा संकट

June 2, 2026

विकसित भारत 2047 साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्याचा नंदुरबारमध्ये अभिनव उपक्रम

May 29, 2026

ऑपरेशन सिंदूर : आधुनिक युद्धातील भारताच्या तांत्रिक सामर्थ्याची प्रभावी झलक

May 11, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.