Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!
  • दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»स्थानिक बातम्या»वनपट्टाधारक शेतकऱ्यांची e-KYC तातडीने पूर्ण करा; पीक कर्जाचा मार्ग मोकळा करा – श्री रतनदादा पाडवी
स्थानिक बातम्या

वनपट्टाधारक शेतकऱ्यांची e-KYC तातडीने पूर्ण करा; पीक कर्जाचा मार्ग मोकळा करा – श्री रतनदादा पाडवी

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेAugust 3, 2026No Comments23 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

नंदुरबार : वनपट्टाधारक शेतकऱ्यांचे e-KYC तांत्रिक कारणांमुळे पूर्ण होत नसल्याने कर्जमाफीची प्रक्रिया रखडली असून त्याच कारणामुळे पुढील पीक कर्जही मिळत नसल्याने शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. या प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत e-KYC प्रक्रिया पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ तसेच पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट)चे प्रदेश सरचिटणीस तथा नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री. रतन के. पाडवी यांनी जिल्हाधिकारी, नंदुरबार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यासह अनेक वनपट्टाधारक शेतकऱ्यांचे e-KYC तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण होत नसल्याने शासनाच्या कर्जमाफी योजनेतील प्रक्रिया प्रलंबित राहिली आहे. परिणामी अनेक पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहत असून त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

याचबरोबर e-KYC पूर्ण नसल्याचे कारण पुढे करत बँकांकडून पुढील पीक कर्ज अथवा शेती कर्ज मंजूर केले जात नसल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते, कीडनाशके व इतर कृषी साहित्य खरेदीसाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होत नसल्याने शेतीची कामे खोळंबली असून चालू हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महसूल विभाग, वन विभाग, बँका, UIDAI तसेच इतर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या e-KYC संदर्भातील तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात. तसेच कर्जमाफीची e-KYC प्रक्रिया पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ आणि पुढील पीक कर्ज त्वरित उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी श्री. रतन के. पाडवी यांनी निवेदनातून केली आहे.

वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या उपजीविकेशी निगडित हा अत्यंत गंभीर आणि तातडीचा प्रश्न असून प्रशासनाने याकडे संवेदनशीलतेने पाहून त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही श्री. पाडवी यांनी व्यक्त केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट

October 9, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.