Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!
  • दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»स्थानिक बातम्या»PM-किसान योजनेतील ‘Block Level Pending’ अर्ज तातडीने निकाली काढा; पात्र शेतकऱ्यांना लाभ द्या – श्री रतनदादा पाडवी
स्थानिक बातम्या

PM-किसान योजनेतील ‘Block Level Pending’ अर्ज तातडीने निकाली काढा; पात्र शेतकऱ्यांना लाभ द्या – श्री रतनदादा पाडवी

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेAugust 3, 2026No Comments17 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

नंदुरबार : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत अक्राणी तालुक्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांचे अर्ज दीर्घकाळापासून “Block Level Pending” स्थितीत प्रलंबित असल्याने शेतकरी आर्थिक लाभापासून वंचित राहत आहेत. या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून सर्व पात्र शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट)चे प्रदेश सरचिटणीस तथा नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री. रतन के. पाडवी यांनी जिल्हाधिकारी, नंदुरबार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, अक्राणी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केले असून त्यांची स्थिती अनेक महिन्यांपासून “Block Level Pending” अशीच कायम आहे. संबंधित शेतकरी कृषी विभाग व इतर संबंधित कार्यालयांमध्ये वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्या अर्जांवर कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने त्यांना शासकीय कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत आहेत.

या विलंबामुळे पात्र शेतकरी केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या आर्थिक सहाय्यापासून वंचित राहत असून त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश देऊन प्रलंबित अर्जांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करावेत आणि त्यांना योजनेचा लाभ त्वरित उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी श्री. रतन के. पाडवी यांनी केली आहे.

जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढल्यास अक्राणी तालुक्यातील शेकडो पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट

October 9, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.