Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!
  • दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»स्थानिक बातम्या»डॉ. सुप्रियाताई विजयकुमार गावित यांची भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड; नंदुरबारसह नाशिक विभागात जल्लोष
स्थानिक बातम्या

डॉ. सुप्रियाताई विजयकुमार गावित यांची भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड; नंदुरबारसह नाशिक विभागात जल्लोष

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेAugust 5, 2026No Comments345 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक वाटचालीत मोलाचे योगदान देणारे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या, संसदरत्न माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या भगिनी आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. सुप्रियाताई विजयकुमार गावित यांची भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती (एसटी) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण नाशिक विभागातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

डॉ. सुप्रियाताई गावित यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून काम करताना विकासाभिमुख दृष्टीकोन, जनतेशी सातत्याने ठेवलेला संवाद आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबतची संवेदनशीलता यामुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा प्रचंड लोकसंपर्क, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची शैली, संघटन वाढीसाठी असलेली तळमळ आणि पक्षनिष्ठा यामुळे त्या भारतीय जनता पक्षातील प्रभावी महिला नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात.

घरातूनच सामाजिक कार्य, जनसेवा आणि राजकारणाचे संस्कार लाभलेल्या डॉ. सुप्रियाताई यांनी आपल्या कार्यकौशल्याच्या बळावर पक्ष संघटनेत विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची सातत्यपूर्ण धडपड, महिलांचे सक्षमीकरण, युवकांना संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमधील सक्रिय सहभाग यामुळे त्या कार्यकर्त्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.

भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर सोपविलेली महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्या आपल्या प्रामाणिकपणा, नेतृत्व क्षमता आणि संघटन कौशल्याच्या जोरावर यशस्वीपणे पार पाडतील, तसेच राज्यभर अनुसूचित जमाती मोर्चा अधिक सक्षम, गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी मोलाचे योगदान देतील, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

ही नियुक्ती भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आली आहे.

डॉ. सुप्रियाताई गावित यांच्या या नियुक्तीमुळे नंदुरबार जिल्ह्याच्या राजकीय नेतृत्वाचा राज्य पातळीवरील प्रभाव अधिक दृढ झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. गावित परिवाराने अनेक दशकांपासून जनसेवा, विकास आणि आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान हे कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असून, या परिवाराच्या सक्षम नेतृत्वाचा प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला अभिमान असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त केली जात आहे.

डॉ. सुप्रियाताई गावित यांच्यावर सोपविण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण जबाबदारीमुळे भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बळकटीला नवी ऊर्जा मिळेल, तसेच राज्यातील अनुसूचित जमाती समाजाचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील, असा विश्वास व्यक्त करत नंदुरबारसह संपूर्ण नाशिक विभागातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट

October 9, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.