Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने एकलव्य विद्यालयात रंगला आदिवासी गौरव दिन

August 8, 2026

डॉ. सुप्रियाताई विजयकुमार गावित यांची भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड; नंदुरबारसह नाशिक विभागात जल्लोष

August 5, 2026

सोशल मीडियावर तलवारीचे प्रदर्शन करून दहशत पसरविणाऱ्यावर पोलिसांची कारवाई; लोखंडी तलवार जप्त

August 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने एकलव्य विद्यालयात रंगला आदिवासी गौरव दिन
  • डॉ. सुप्रियाताई विजयकुमार गावित यांची भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड; नंदुरबारसह नाशिक विभागात जल्लोष
  • सोशल मीडियावर तलवारीचे प्रदर्शन करून दहशत पसरविणाऱ्यावर पोलिसांची कारवाई; लोखंडी तलवार जप्त
  • गुरुपौर्णिमेनिमित्त एकलव्य विद्यालयात महर्षी व्यास व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त
  • वनपट्टाधारक शेतकऱ्यांची e-KYC तातडीने पूर्ण करा; पीक कर्जाचा मार्ग मोकळा करा – श्री रतनदादा पाडवी
  • PM-किसान योजनेतील ‘Block Level Pending’ अर्ज तातडीने निकाली काढा; पात्र शेतकऱ्यांना लाभ द्या – श्री रतनदादा पाडवी
  • मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयामुळे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा; कर्जमाफी व वीजबिल माफी ऐतिहासिक : मंत्री संजय सावकारे
  • लोकनेते स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहात वृक्षारोपण
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»स्थानिक बातम्या»मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयामुळे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा; कर्जमाफी व वीजबिल माफी ऐतिहासिक : मंत्री संजय सावकारे
स्थानिक बातम्या

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयामुळे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा; कर्जमाफी व वीजबिल माफी ऐतिहासिक : मंत्री संजय सावकारे

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेJuly 24, 2026No Comments39 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयामुळे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा; कर्जमाफी व वीजबिल माफी ऐतिहासिक : मंत्री संजय सावकारे

नंदुरबार : राज्य सरकारने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ आणि शेतकऱ्यांच्या 48 हजार कोटी रुपयांच्या वीजबिल थकबाकी माफीचा निर्णय हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले.

नंदुरबार येथील विजय पर्व येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उत्तर महाराष्ट्र समन्वयक विजयभाऊ चौधरी, जिल्हाध्यक्ष निलेश माळी, सदानंद रघुवंशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री सावकारे यांनी सांगितले की, राष्ट्रीयकृत, व्यापारी, खासगी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. याआधीच्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 50 हजार रुपयांच्या लाभाची मर्यादा होती. मात्र, आता ती मर्यादा रद्द करण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे.

तसेच, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 2026-27 मध्ये कर्ज घेऊन वेळेत परतफेड करण्याची अटही रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय, राज्यातील साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपधारकांकडून वीजबिल आकारले जात नसले तरी त्यांच्या 48 हजार कोटी रुपयांच्या जुन्या थकबाकीचीही पूर्ण माफी करण्यात येणार असल्याने लाखो शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या निर्णयाबद्दल राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले.

पत्रकार परिषदेत कृषी क्षेत्रासाठी राज्य सरकार राबवत असलेल्या विविध योजनांचीही माहिती देण्यात आली. राज्य शासन दरवर्षी कृषी क्षेत्रासाठी सुमारे 95 हजार कोटी रुपये खर्च करत असून, 136 लाख क्विंटल कापसाची खरेदी करून 10 हजार 883 कोटी रुपयांचे चुकारे, तसेच 6 लाख टन सोयाबीनची 3 हजार 198 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कांदा खरेदीमुळे बाजारभाव स्थिर ठेवण्यास मदत झाली असून, ठिबक सिंचनासाठी प्रलंबित 217 कोटी रुपये लवकरच वितरित केले जातील. तसेच कृषी समृद्धी योजनेतील उर्वरित निधीही पुरवणी मागण्यांद्वारे उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

डॉ. सुप्रियाताई विजयकुमार गावित यांची भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड; नंदुरबारसह नाशिक विभागात जल्लोष

August 5, 2026

वनपट्टाधारक शेतकऱ्यांची e-KYC तातडीने पूर्ण करा; पीक कर्जाचा मार्ग मोकळा करा – श्री रतनदादा पाडवी

August 3, 2026

PM-किसान योजनेतील ‘Block Level Pending’ अर्ज तातडीने निकाली काढा; पात्र शेतकऱ्यांना लाभ द्या – श्री रतनदादा पाडवी

August 3, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,118

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025790

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025617
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.