Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट

October 9, 2026

धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी

September 27, 2026

नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’

September 18, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
  • धडगावच्या भीषण अपघातातील जखमींच्या भेटीसाठी रतनदादा पाडवी रुग्णालयात; जखमींची विचारपूस करत दिला धीर
  • सामाजिक बांधिलकी जपत ‘अक्का माय फाउंडेशन’चा उपक्रम; होळ तर्फे रणाळा येथे पाणी जार वितरण
  • नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने एकलव्य विद्यालयात रंगला आदिवासी गौरव दिन
शैक्षणिक

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने एकलव्य विद्यालयात रंगला आदिवासी गौरव दिन

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेAugust 8, 2026No Comments6 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

नृत्य, नाटिका आणि पारंपरिक कलाविष्कारातून विद्यार्थ्यांनी साकारली आदिवासी संस्कृतीची समृद्ध परंपरा

नंदुरबार : जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकलव्य विद्यालयात आदिवासी संस्कृती, परंपरा आणि वीरांचा इतिहास जागविणारा विविधांगी कार्यक्रम उत्साहात पार पडला. आदिवासी समाजाच्या पारंपरिक नृत्य, गीत आणि नाटिकांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण विद्यालयात उत्साहाचे व सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी देव मोगरा माता तसेच आदिवासी वीरांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश वळवी यांनी केले.

यावेळी प्रमुख वक्ते तथा पर्यवेक्षक टिका पाडवी यांनी आदिवासी दिन साजरा करण्याची सुरुवात, त्यामागील उद्देश आणि आदिवासी समाजाच्या इतिहासाबाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाने दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकताना त्यांनी आदिवासी समाज हा निसर्गपूजक, शांतताप्रिय आणि पर्यावरणाशी नाते जपणारा समाज असल्याचे सांगितले. देशाच्या विकासातही आदिवासी समाजाचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आदिवासी जीवनशैली आणि परंपरांचे प्रभावी दर्शन घडविले. ‘आदिवासी पेहचान’ या गीतावर श्वेता पवार व इयत्ता दहावी ‘क’च्या विद्यार्थ्यांनी, तसेच प्रगती पाडवी, सुप्रिया वसावे व समूहाने आकर्षक नृत्य सादर केले.

आदिवासी समाजातील विविध उत्सवांमध्ये केली जाणारी पूजा तसेच वाघदेव परंपरेचे दर्शन घडविणारे नाटक सार्थक पाडवी, प्राजक्ता वळवी व समूहाने सादर केले. घट्या देव उत्सवावर आधारित नाटिका आनंद सूर्यवंशी व समूहाने सादर केली. ‘आदिवासी नंबर 1’ या गीतावर अहिल्या कन्या छात्रालयातील तुलसी पाडवी, निशा वळवी व विद्यार्थिनी तसेच इयत्ता आठवी ‘ब’च्या पलक पाडवी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त नृत्य सादर केले.

या सांस्कृतिक सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी आदिवासी समाजाच्या समृद्ध परंपरा, श्रद्धा, उत्सव, निसर्गाशी असलेले नाते आणि सांस्कृतिक वारसा जिवंत केला. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे, उपमुख्याध्यापक डॉ. गिरीश पवार, पर्यवेक्षक टिका पाडवी, ज्येष्ठ शिक्षक मिलिंद वडनगरे, वसंत वसईकर, संतोष पाटील, गौरीशंकर धुमाळ, विद्यालयाचे माजी विद्यार्थी गौतम बैसाने, प्रशांत जव्हेरी तसेच जकू गावित, राजेश वळवी, सुनील वळवी, पियुष वळवी, प्रशांत तडवी, विकास पाडवी, रतिलाल पाडवी, आत्माराम गायकवाड, उजेश वळवी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी अहिरे व नूतन वसावे यांनी केले, तर आयुषी गावित यांनी आभार मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 23, 2026

गुरुपौर्णिमेनिमित्त एकलव्य विद्यालयात महर्षी व्यास व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त

August 3, 2026

राजर्षी छत्रपती शाहू महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

June 26, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.