Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026

दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट

October 9, 2026

धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी

September 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
  • धडगावच्या भीषण अपघातातील जखमींच्या भेटीसाठी रतनदादा पाडवी रुग्णालयात; जखमींची विचारपूस करत दिला धीर
  • सामाजिक बांधिलकी जपत ‘अक्का माय फाउंडेशन’चा उपक्रम; होळ तर्फे रणाळा येथे पाणी जार वितरण
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत
शैक्षणिक

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेJune 13, 2026No Comments1,119 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

 

नंदुरबार (प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात करण्यासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ जून रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा नियमित वेळेत सुरू होणार असून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत आकर्षण निर्माण व्हावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि शालेय जीवनाची सकारात्मक सुरुवात व्हावी, या उद्देशाने प्रवेशोत्सव साजरा केला जात आहे.
या कार्यक्रमासाठी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे नंदुरबार जिल्ह्यात उपस्थित राहणार आहेत. ते धडगाव तालुक्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय शाळा येथे विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत करणार आहेत. यावेळी खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित राहून नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करतील.
प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि विकसित महाराष्ट्र २०४७ या संकल्पनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.

जिल्ह्यातील शाळांमधील पटसंख्या वाढविणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देणे आणि विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करणे या उद्देशाने प्रवेशोत्सव राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मिताली सेठी, नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी, योजना शिक्षणाधिकारी उर्मिला पारधे, उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे, भावेश सोनवणे, डॉ. युनूस पठाण तसेच सर्व तालुक्यांतील गटशिक्षणाधिकारी तयारीत व्यस्त आहेत.

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे यंदाचा शाळा प्रवेशोत्सव विशेष ठरणार असून जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 23, 2026

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने एकलव्य विद्यालयात रंगला आदिवासी गौरव दिन

August 8, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.