Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत

August 27, 2026

गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

August 23, 2026

चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक

August 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत
  • गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान
  • चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक
  • मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड
  • कै. श्री. पी. एन. पाटील यांच्या कुटुंबीयांची ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सांत्वनभेट
  • नंदुरबार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! सराईत घरफोडी आरोपी जेरबंद; चार गुन्ह्यांची उकल, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
  • जिल्ह्याच्या विकासकामांना गती; ऑक्टोबरअखेर अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश
  • रस्त्यांच्या दुरवस्थेवर पालकमंत्र्यांची तीव्र नाराजी; आता दर महिन्याला तालुकानिहाय आढावा
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»राज्य-राष्ट्रीय»विकसित भारत 2047 साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्याचा नंदुरबारमध्ये अभिनव उपक्रम
राज्य-राष्ट्रीय

विकसित भारत 2047 साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्याचा नंदुरबारमध्ये अभिनव उपक्रम

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेMay 29, 2026No Comments17 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

 

“यंग प्रोफेशनल्स राउंडटेबल”मधून डिजिटल वेलनेस, नेतृत्व आणि राष्ट्रनिर्माणावर मंथन

नंदुरबार, (दि. 29 मे 2026) देशाला “विकसित भारत 2047” या ध्येयाकडे नेण्यासाठी केवळ आर्थिक प्रगती नव्हे, तर मानसिकदृष्ट्या सक्षम, तंत्रज्ञानसाक्षर आणि मूल्याधिष्ठित युवा पिढी घडविणे अत्यावश्यक असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश नंदुरबार येथे आयोजित “Viksit Bharat Young Leaders Dialogue 2026 – Young Professionals Roundtable” या विशेष कार्यक्रमातून देण्यात आला. युवकांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाने नंदुरबार जिल्ह्यात नव्या वैचारिक चळवळीची सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली माय भारत नंदुरबार आणि झेप फाउंडेशन (World Digital Detox Day) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. “विकसित भारतासाठी भविष्य-सज्ज मनुष्यबळ घडवणे” हा कार्यक्रमाचा मुख्य विषय होता. विशेष म्हणजे, नंदुरबारच्या इतिहासात प्रथमच अशा स्वरूपाचा “Young Professionals Roundtable” आयोजित करण्यात आला होता.
ग्रामीण आणि आदिवासी भागातील युवकांना राष्ट्रीय विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून प्रभावीपणे करण्यात आला. डॉ. रेखा चौधरी आणि झेप फाउंडेशन यांच्या पुढाकारातून तसेच काकासाहेब महाविद्यालयाच्या सहकार्याने हा उपक्रम साकार झाला. युवकांना केवळ नोकरीसाठी नव्हे, तर नेतृत्व, नवोन्मेष, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिर्माणासाठी तयार करण्याचा व्यापक दृष्टिकोन या कार्यक्रमामागे होता.

कार्यक्रमाला माजी आमदार श्री. शिरीषदादा चौधरी, झेप फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. रेखा चौधरी, जिल्हा युवा अधिकारी श्री. भुषण पाटील, नंदुरबार नगरपालिकेचे उपाध्यक्ष श्री. प्रथमेश चौधरी, नगरसेवक श्री. गौरव चौधरी, मुंबई येथील सोनिया देशमुख तसेच डॉ. चंद्रकांत वाणी आदी मान्यवर उपस्थित होते. पॅनलिस्ट म्हणून डॉ. रेखा चौधरी, प्रा. युवराज भामरे आणि मुंबईचे ॲड. सारांश सोनार यांनी युवकांना मार्गदर्शन केले.

आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे युवकांसमोर नव्या संधींसह गंभीर मानसिक आणि सामाजिक आव्हानेदेखील उभी राहत आहेत. या पार्श्वभूमीवर डिजिटल वेलनेस, डिजिटल व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य, एकाग्रता, नेतृत्व विकास, रोजगारक्षम कौशल्ये, उद्योजकता आणि राष्ट्रनिर्माणातील युवकांची भूमिका या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

डॉ. रेखा चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “विकसित भारत 2047 चे स्वप्न साकार करण्यासाठी डिजिटलदृष्ट्या सक्षम पण मानसिकदृष्ट्या संतुलित युवा पिढी घडविणे अत्यावश्यक आहे.” त्यांनी पुढे नमूद केले की, World Digital Detox Day ही जागतिक चळवळ आज 78 देशांमध्ये डिजिटल वेलनेस आणि संतुलित तंत्रज्ञान वापराबाबत जनजागृती करत असून युवकांना अधिक सर्जनशील, उत्पादक आणि राष्ट्राभिमुख बनविण्याचे कार्य करत आहे.

राउंडटेबल चर्चेदरम्यान युवकांनी कौशल्य विकास, रोजगार, मानसिक स्वास्थ्य, डिजिटल शिस्त, सामाजिक नेतृत्व आणि नवकल्पना यासंदर्भात विविध विधायक सूचना मांडल्या. युवकांमध्ये केवळ सरकारी नोकरीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून नवउद्योजकता, स्टार्टअप संस्कृती आणि सामाजिक नेतृत्व याकडेही आकर्षण वाढत असल्याचे चर्चेतून स्पष्ट झाले.
या कार्यक्रमात सुमारे 200 युवक-युवती सहभागी झाले होते. पॅनलिस्ट आणि युवकांमधील मुक्त संवादामुळे अनेक सकारात्मक आणि दूरदृष्टीपूर्ण विचार समोर आले. चर्चेतून समोर आलेल्या शिफारसी पुढील काळात विकसित भारत 2047, माय भारत मिशन आणि World Digital Detox Day च्या जनजागृती अभियानांमध्ये समाविष्ट करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. सुचित पिंगळे यांनी केले.

“विकसित भारतासाठी तंत्रज्ञान आवश्यक आहे; मात्र त्याहून अधिक महत्त्वाचा आहे मानसिकदृष्ट्या सक्षम, संतुलित, मूल्यनिष्ठ आणि जबाबदार युवा,” हा संदेश या युवा राउंडटेबलमधून प्रभावीपणे अधोरेखित झाला.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

रोहिंग्या शिबिरांतील वाढता दहशतवाद आणि बांगलादेशसमोरील सुरक्षा संकट

June 2, 2026

ऑपरेशन सिंदूर : आधुनिक युद्धातील भारताच्या तांत्रिक सामर्थ्याची प्रभावी झलक

May 11, 2026

सीएपीएफमधील आयपीएस नेतृत्वाची भूमिका संस्थात्मकदृष्ट्या का आवश्यक आहे?

March 28, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,118

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025790

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025618
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.