Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत

August 27, 2026

गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

August 23, 2026

चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक

August 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत
  • गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान
  • चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक
  • मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड
  • कै. श्री. पी. एन. पाटील यांच्या कुटुंबीयांची ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सांत्वनभेट
  • नंदुरबार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! सराईत घरफोडी आरोपी जेरबंद; चार गुन्ह्यांची उकल, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
  • जिल्ह्याच्या विकासकामांना गती; ऑक्टोबरअखेर अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश
  • रस्त्यांच्या दुरवस्थेवर पालकमंत्र्यांची तीव्र नाराजी; आता दर महिन्याला तालुकानिहाय आढावा
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»राज्य-राष्ट्रीय»नंदुरबारचे सुपुत्र मनोज श्रॉफ यांचा फोर्ब्स यादीत गौरव जागतिक उद्योगविश्वातील भारतीय नेतृत्वाचा अभिमान
राज्य-राष्ट्रीय

नंदुरबारचे सुपुत्र मनोज श्रॉफ यांचा फोर्ब्स यादीत गौरव जागतिक उद्योगविश्वातील भारतीय नेतृत्वाचा अभिमान

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेJanuary 8, 2026No Comments3 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

नंदुरबारचे सुपुत्र मनोज श्रॉफ यांचा फोर्ब्स यादीत गौरव
जागतिक उद्योगविश्वातील भारतीय नेतृत्वाचा अभिमान

नंदुरबार : महाराष्ट्राच्या आदिवासी व सीमावर्ती भागातील नंदुरबार जिल्ह्याने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपली ओळख ठळक केली आहे. नंदुरबारचे सुपुत्र, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उद्योजक आणि NITI Group चे संस्थापक व अध्यक्ष मनोज शशिचंद्र श्रॉफ यांचा Forbes Middle East च्या प्रतिष्ठित यादीत समावेश झाला असून, मध्यपूर्वेतील अव्वल भारतीय उद्योगपतींमध्ये त्यांना ५९ वा क्रमांक मिळाला आहे. ही बाब नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे.

४ जानेवारी १९६४ रोजी नंदुरबार येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मनोज श्रॉफ यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नंदुरबार येथेच पूर्ण केले. मर्यादित साधनसंपत्ती असतानाही कष्ट, शिस्त आणि स्पष्ट ध्येय यांच्या बळावर त्यांनी उच्च शिक्षणासाठी मुंबई गाठली आणि पुढे जागतिक उद्योगविश्वात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.

त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात १९८६ साली संयुक्त अरब अमिरातीतील Al Habtoor Motors येथे केली. येथे मिळालेल्या आंतरराष्ट्रीय अनुभवाच्या बळावर १९९६ साली त्यांनी NITI Distribution ची स्थापना केली. केनिया येथून सुरू झालेला हा प्रवास आज आशिया, आफ्रिका, मध्यपूर्व, युरोप व उत्तर अमेरिका अशा तीन खंडांतील २० पेक्षा अधिक देशांपर्यंत विस्तारला आहे.

आज NITI Group हा IT वितरण, OEM उत्पादन, हॉस्पिटॅलिटी, औषधनिर्मिती, फर्निचर, ई-कॉमर्स आणि पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेला बहुराष्ट्रीय उद्योगसमूह म्हणून ओळखला जातो. NITI Distribution, AK Multinational (USA), Cursor Technologies, La Maison Royale Hotels (केनिया), Comfort Inn Hotels (USA), Jupiter Healthcare, Sky Super Store आणि Mojakart हे या समूहातील प्रमुख उपक्रम आहेत.

त्यांच्या नेतृत्वाखालील कुटुंबीय सहभागही उल्लेखनीय आहे. पत्नी नीती श्रॉफ या NITI Group च्या Co-Founder व Managing Director असून IT वितरण क्षेत्रातील प्रभावी महिला नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. तर पुत्र अनिकेत श्रॉफ, CEO – NITI Group, यांनी Choice Hotels International च्या आफ्रिकेतील पहिल्या विस्ताराचे नेतृत्व करत आंतरराष्ट्रीय हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात इतिहास घडवला आहे.

मनोज श्रॉफ यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत. डेलावेअर राज्यपालांचा जाहीरनामा (२०२५), AsiaOne Magazine – Person of the Year (२०१८), Entrepreneur Middle East कडून विशेष सन्मान, तसेच Forbes Middle East यादीतील समावेश हे त्यातील प्रमुख आहेत.

यशाच्या शिखरावर असतानाही त्यांनी आपल्या मातीत नाळ घट्ट जोडून ठेवली आहे. नंदुरबारमधील खडायता वाडी, नैरोबीतील नवनात भवन, वडोदऱ्यातील NITI भवन तसेच विविध धार्मिक व सामाजिक प्रकल्पांमध्ये त्यांनी मोठे योगदान दिले आहे. २०२६ साली स्थापन झालेली NMS Foundation ही संस्था मुलांच्या शिक्षण व मार्गदर्शनासाठी समर्पित आहे.
नंदुरबारच्या साध्या मातीतून जागतिक उद्योगविश्वात झळकणारे मनोज श्रॉफ हे आज हजारो तरुण उद्योजकांसाठी प्रेरणास्थान ठरले असून, त्यांच्या फोर्ब्स यादीतील समावेशाने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

रोहिंग्या शिबिरांतील वाढता दहशतवाद आणि बांगलादेशसमोरील सुरक्षा संकट

June 2, 2026

विकसित भारत 2047 साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्याचा नंदुरबारमध्ये अभिनव उपक्रम

May 29, 2026

ऑपरेशन सिंदूर : आधुनिक युद्धातील भारताच्या तांत्रिक सामर्थ्याची प्रभावी झलक

May 11, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,118

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025790

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025618
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.