Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत

August 27, 2026

गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

August 23, 2026

चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक

August 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत
  • गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान
  • चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक
  • मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड
  • कै. श्री. पी. एन. पाटील यांच्या कुटुंबीयांची ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सांत्वनभेट
  • नंदुरबार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! सराईत घरफोडी आरोपी जेरबंद; चार गुन्ह्यांची उकल, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
  • जिल्ह्याच्या विकासकामांना गती; ऑक्टोबरअखेर अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश
  • रस्त्यांच्या दुरवस्थेवर पालकमंत्र्यांची तीव्र नाराजी; आता दर महिन्याला तालुकानिहाय आढावा
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»राज्य-राष्ट्रीय»आर्थिक समावेशन जनजागृतीसाठी १४ बँकांचे संयुक्त शिबीर संपन्न – नंदकुमार पैठणकर
राज्य-राष्ट्रीय

आर्थिक समावेशन जनजागृतीसाठी १४ बँकांचे संयुक्त शिबीर संपन्न – नंदकुमार पैठणकर

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेSeptember 18, 2025No Comments1 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

नंदुरबार (जिमाका) : भारत सरकारचा वित्तीय सेवा विभाग आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक समावेशन (Financial Inclusion) वाढवण्यासाठी आणि नागरिकांना बँकिंग सेवांची माहिती देण्यासाठी छत्रपती शिवाजी नाट्यगृह येथे नुकतेच एक भव्य संयुक्त शिबीर घेण्यात आले होते अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नंदकुमार पैठणकर यांनी एका शासकीय प्रसिद्ध पत्रकान्वये कळविली आहे

या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी (IAS) यांच्या हस्ते झाले, तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे महाव्यवस्थापक रजनीश सिंह हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. रिझर्व्ह बँकेचे व्यवस्थापक विशाल गोंदके अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नंदकुमार पैठणकर आदि मान्यवर यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आपल्या भाषणात सर्व बँकांनी एकत्र येऊन हे शिबीर आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी बँकांना डिजिटल फसवणुकीच्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कारवाई करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात रिझर्व्ह बँकेचे महाव्यवस्थापक रजनीश सिंह यांनी आरबीआय लोकपाल योजनेची (RBI Ombudsman Scheme) माहिती दिली, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या बँकिंग तक्रारींचे निराकरण करण्यास मदत होईल.

◆ विशेष मार्गदर्शन सत्र

या शिबिरात बँक प्रतिनिधींनी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर नागरिकांना मार्गदर्शन केले: स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक वीरेंद्र माचेरला यांनी ग्राहकांना Re-KYC चे महत्त्व आणि प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती दिली. युनियन बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक प्रभात कुमार यांनी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सामाजिक सुरक्षा योजना जसे की प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY), प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY), प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना (PMJJBY) आणि अटल पेन्शन योजना (APY) याबद्दल मार्गदर्शन केले, जेणेकरून जास्तीत जास्त लोक या योजनांचा लाभ घेऊ शकतील. बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर प्रवीणकुमार सिंह आणि एसएलबीसी (SLBC) प्रतिनिधी यांनी डिजिटल फसवणुकीचे प्रकार आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

◆ नागरिकांसाठी बँकिंग सेवांचा स्टॉल

नंदुरबार शहरातील १४ विविध बँकांनी या शिबिरात सहभाग घेतला होता. प्रत्येक बँकेने आपला स्टॉल उभारून ग्राहकांना विविध सेवा उपलब्ध करून दिल्या. यामध्ये नवीन बँक खाते उघडणे, Re-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आणि इतर बँकिंग सुविधांची माहिती देणे अशा सेवांचा समावेश होता. या शिबिरात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने फिरते एटीएम (Mobile ATM) आणि किओस्क सेवा देखील उपलब्ध करून दिली, ज्यामुळे ग्राहकांना तात्काळ व्यवहार करणे शक्य झाले.
या शिबिराचे आभारप्रदर्शन स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहायक महाप्रबंधक संतोषकुमार सोनी यांनी केले. नंदुरबार शहर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातून नागरिकांनी या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याचेही जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. पैठणकर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

रोहिंग्या शिबिरांतील वाढता दहशतवाद आणि बांगलादेशसमोरील सुरक्षा संकट

June 2, 2026

विकसित भारत 2047 साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्याचा नंदुरबारमध्ये अभिनव उपक्रम

May 29, 2026

ऑपरेशन सिंदूर : आधुनिक युद्धातील भारताच्या तांत्रिक सामर्थ्याची प्रभावी झलक

May 11, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,118

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025790

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025618
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.