Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!
  • दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावाचा सर्वांगीण विकास करावा – आ. डॉ. विजयकुमार गावित, कोठली खु. येथे अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
ताज्या बातम्या

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावाचा सर्वांगीण विकास करावा – आ. डॉ. विजयकुमार गावित, कोठली खु. येथे अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेSeptember 18, 2025No Comments11 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter
नंदुरबार, प्रतिनिधी : गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग अत्यावश्यक असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन माजी आदिवासी विकास मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. कोठली खुर्द येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना आ. डॉ. गावित म्हणाले की, “केवळ बक्षीस मिळविण्यासाठी काम न करता शाश्वत विकासावर भर द्यावा. सर्व योजनांचे पारदर्शकपणे अभिसरण करून शेवटच्या माणसापर्यंत लाभ पोहोचवावा. कोठली खुर्द गावाने राज्यस्तरीय बक्षीस मिळवून आपल्या गावाचा गौरव करावा.”
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, माजी जि.प. अध्यक्षा डॉ. कुमोदिनी गावित, डॉ. सुप्रिया गावित, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसुरकर, गटविकास अधिकारी अनिल बिराडे, माजी जि.प. सदस्य राजश्री गावीत यांसह ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते.
डॉ. सुप्रिया गावित यांनी ग्रामस्थांनी रोजगार हमी योजना, पंतप्रधान आवास योजना, वृक्ष लागवड यांसह विविध योजनांचा लाभ घेऊन गावाच्या विकासात योगदान द्यावे. महिलांनी बचत गटांद्वारे लघुउद्योग सुरू करावेत, अशी सूचना केली.
जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेठी यांनी ग्रामस्थांनी सात सूत्रांच्या कार्यक्रमावर काम करत लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन विकसित करावे. जलसमृद्ध, स्वच्छ आणि हरित गाव निर्माण करणे, तसेच सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन करून स्वच्छतेची शाश्वतता राखावी, असे आवाहन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी पुढे सांगितले की, “पुढील 100 दिवसांत विविध उपक्रम राबवून कोठली खुर्द गावाने हिवरे बाजार व राळेगणसिद्धी यांसारख्या आदर्श गावांप्रमाणे महाराष्ट्राच्या नकाशावर नाव कोरण्याची संधी आहे. जिल्हा परिषद ग्रामस्थांसोबत आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी रोहिदास पवार यांनी केले. यावेळी सरपंच महेंद्र वळवी, उपसरपंच जगदीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य, विस्तार अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विष्णु जोंधळे यांनी केले.
या कार्यक्रमातून कोठली खुर्द गावाचा समृद्ध व शाश्वत विकास साधण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा संकल्प करण्यात आला.
Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

लिपिकांच्या मागण्यांवर शासन दरबारी सकारात्मक चर्चा; लवकर निर्णयाची शक्यता

March 15, 2026

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025

त्र्यंबकेश्वर येथील पत्रकार हल्ल्याचा निषेध : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जिल्हा मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा संयुक्तिक पुढाकार

September 23, 2025
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.