Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट

October 9, 2026

धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी

September 27, 2026

नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’

September 18, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
  • धडगावच्या भीषण अपघातातील जखमींच्या भेटीसाठी रतनदादा पाडवी रुग्णालयात; जखमींची विचारपूस करत दिला धीर
  • सामाजिक बांधिलकी जपत ‘अक्का माय फाउंडेशन’चा उपक्रम; होळ तर्फे रणाळा येथे पाणी जार वितरण
  • नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»स्थानिक बातम्या»धडगावच्या भीषण अपघातातील जखमींच्या भेटीसाठी रतनदादा पाडवी रुग्णालयात; जखमींची विचारपूस करत दिला धीर
स्थानिक बातम्या

धडगावच्या भीषण अपघातातील जखमींच्या भेटीसाठी रतनदादा पाडवी रुग्णालयात; जखमींची विचारपूस करत दिला धीर

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेSeptember 8, 2026No Comments71 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

शहादा | प्रतिनिधी

धडगावहून सावऱ्यादिगर-बुरखेडा पाड्याकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा काल तीव्र वळणाच्या उतारावर भीषण अपघात होऊन तब्बल २१ प्रवासी जखमी झाले. या अपघाताने संपूर्ण परिसर हादरला असून, जखमींच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सावऱ्यादिगर गावाजवळील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन रस्त्यावरच पलटी झाले. अपघाताची तीव्रता एवढी होती की, अनेक प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. एका प्रवाशाचा पाय फ्रॅक्चर झाला असून, तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तत्काळ धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जखमींना पुढील उपचारासाठी शहादा येथील रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मा. श्री. रतनदादा पाडवी यांनी रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये जाऊन अपघातातील जखमींची आस्थेने विचारपूस केली. यावेळी त्यांनी डॉक्टरांकडून जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली तसेच त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

यावेळी जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष छोटूभाऊ कुवर, माजी पंचायत समिती सदस्य ठाणशिंग पावरा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी झाली. आपल्या आप्तस्वकीयांच्या प्रकृतीची चिंता, रुग्णालयातील धावपळ आणि नातेवाईकांचा आक्रोश यामुळे वातावरण अत्यंत भावूक झाले होते.

अशा कठीण प्रसंगी जखमींच्या पाठीशी उभे राहत रतनदादा पाडवी यांनी रुग्णालयात जाऊन प्रत्येक जखमीची आपुलकीने विचारपूस केली. त्यांच्या भेटीमुळे संकटाच्या काळात असलेल्या जखमी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार मिळाला.

अपघातातील जखमींमध्ये गिता चंद्रसिंग पावरा, रायदास पावरा, सोनहि मोहन पावरा, दिनेश भोग्या भिल, जितान पावरा, रतन जोरदार पावरा, चिकला किला पावरा, किसन सान्या पावरा, दांड्या जान्या पावरा, जया टेकला पावरा, रुईला दमन्या पावरा, मगन पाडवी, सांगा पावरा, टेट्या पावरा, गिदार पावरा, जितेंद्र पावरा, केला पावरा, वंदना पावरा, सुनिल पावरा, गुंड्या पावरा, रोहिदास पावरा आणि शांतिलाल पावरा यांचा समावेश आहे.

दरम्यान, अपघातानंतर वाहनचालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाल्याची माहिती असून, या प्रकरणाची संबंधित यंत्रणेकडून चौकशी सुरू आहे. जखमींवर आवश्यक ते उपचार सुरू असून, सर्व जखमी लवकरात लवकर सुखरूप बरे व्हावेत, अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट

October 9, 2026

धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी

September 27, 2026

नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’

September 18, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.