Author: जगदिश निळकंठ सोनवणे

जगदिश निळकंठ सोनवणे

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

मुंबई / नंदुरबार (जगदिश निळकंठ सोनवणे) राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा होत असल्याचे संकेत मिळत आहेत. जिल्हा परिषदांची गट रचना आणि आरक्षण ठरविण्याच्या पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका घेण्यास आता कायदेशीर अडथळे जवळपास दूर झाले आहेत. त्यामुळे महापालिकांच्या आधी झेडपी निवडणुका होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. ★ ६३० हून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित सध्या राज्यातील तब्बल सुमारे ६३० स्थानिक स्वराज्य संस्था – त्यात ३२ जिल्हा परिषदा, २८९ पंचायत समित्या, तसेच महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका प्रलंबित आहेत. ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना, कायदेशीर याचिका…

Read More

बामदोड/नंदुरबार (प्रतिनिधी) – राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सप्ताह २०२५ च्या अनुषंगाने शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे तिसऱ्या दिवशी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. “औषधांच्या दुष्परिणामांची नोंदणी : एक सामाजिक जबाबदारी” या विषयावर झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या विचारांची मांडणी केली. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना फार्माकोव्हिजिलन्सचे सामाजिक तसेच व्यावसायिक महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूजा गायकवाड यांनी केले. निबंधांचे मूल्यमापन परीक्षक प्रा. कल्याणी चौधरी, प्रा. जागृती शेवाळे आणि प्रा. भूषण गोपाळ यांनी केले. स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार असून विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे प्रदान करण्यात येतील. या…

Read More

नंदुरबार – महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटना व नंदुरबार जिल्हा ट्रायथलॉन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव, नंदुरबार येथे राज्यस्तरीय अक्वाथलॉन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून खेळाडूंनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. या स्पर्धेतून महाराष्ट्राचा राष्ट्रीय संघ निवडण्यात येणार असून ११ व १२ ऑक्टोबर रोजी भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत हा संघ राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. बक्षीस वितरण समारंभास जिल्हाध्यक्ष व युवा नेते किरण रघुवंशी, बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष यशवर्धन रघुवंशी, मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी, राज्य ट्रायथलॉन संघटनेचे अध्यक्ष दयानंद कुमार, सचिव राजेंद्र निंबाळते, जिल्हा सचिव डॉ. मयूर ठाकरे, तांत्रिक समितीचे अध्यक्ष अभय देशमुख, कमलेश नगरकर, तसेच…

Read More

नंदुरबार/पावला (प्रतिनिधी) – ASK फाउंडेशन मुंबई यांच्या आर्थिक सहाय्याने राबविण्यात येत असलेल्या समृद्ध किसान प्रकल्पा अंतर्गत इंडियन ग्रामीण सर्व्हिसेस (IGS) व CYDA यांच्या संयुक्त विद्यमाने पावला येथे रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. महोत्सवाचे सूत्रसंचालन मोहसीन मणियार यांनी केले, तर प्रास्ताविक प्रवीण अहिरे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र मोरे (DDM, नाबार्ड), दीपक पटेल (प्रकल्प संचालक, आत्मा), पैठणकर साहेब (LDM, SBI), पंकज पाटील (मॅनेजर, ASK फाउंडेशन), सौ. आरती देशमुख (विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोळदा), कांता बनकर (माविम, नंदुरबार), डॉ. शांताराम बडगुजर (सचिव, CYDA), तसेच स्थानिक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. मेळाव्यात तब्बल ३५ ते ४० प्रकारच्या रानभाज्यांच्या पाककृतींचे…

Read More

नंदुरबार (प्रतिनिधी)  सशक्त भारताचे कर्तुत्ववान व लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अनुसूचित जाति मोर्चातर्फे सेवा पंधरवाडा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण तसेच समाजातील गरीब व अपंग व्यक्तींचा सत्कार करून त्यांना “सत्कार मूर्ती” म्हणून गौरविण्यात आले. या कार्यक्रमात अशिफ कुरेशी, जुनेद शेख मनियार व जुबेर गफुर मनियार यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मंसुरी जमात उपाध्यक्ष शब्बीर पिंजारी, सामाजिक कार्यकर्ते अश्पाक काझी व अकिल दादा अन्सारी, अनुसूचित जाति मोर्चा जिल्हा अध्यक्ष अंबालाल साठे, जिल्हा उपाध्यक्ष श्रावण तिजवीज तसेच असलम पिंजारी, फैजान, खालिद मुनशी, शिरीष गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेला हा…

Read More

शहादा (प्रतिनिधी) आदर्श परंपरा व संस्कृतीची जपणूक करणे नवीन पिढीची जबाबदारी आहे.त्यासाठीच कै.अण्णासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.या वक्तृत्व स्पर्धेला अकरा वर्षाची परंपरा आहे,असे प्रतिपादन पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांनी केले. येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ व श्री.पी.के.अण्णा पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै.अण्णासाहेब पी.के.पाटील स्मृती प्रित्यर्थ आंतर महाविद्यालयीन विभागीय पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर विश्वेश्वरय्या सभागृहात झाले. उद्घाटन समारंभ प्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी मंचावर मंडळाचे उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, माजी उपनगराध्यक्ष दीपकभाई पटेल, शहादा पालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक के.डी. पाटील, मंदाने येथील माजी उपसरपंच…

Read More

नंदुरबार (जिमाका) : भारत सरकारचा वित्तीय सेवा विभाग आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक समावेशन (Financial Inclusion) वाढवण्यासाठी आणि नागरिकांना बँकिंग सेवांची माहिती देण्यासाठी छत्रपती शिवाजी नाट्यगृह येथे नुकतेच एक भव्य संयुक्त शिबीर घेण्यात आले होते अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नंदकुमार पैठणकर यांनी एका शासकीय प्रसिद्ध पत्रकान्वये कळविली आहे या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी (IAS) यांच्या हस्ते झाले, तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे महाव्यवस्थापक रजनीश सिंह हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. रिझर्व्ह बँकेचे व्यवस्थापक विशाल गोंदके अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नंदकुमार पैठणकर आदि मान्यवर यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आपल्या भाषणात…

Read More

नंदुरबार, प्रतिनिधी : गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग अत्यावश्यक असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन माजी आदिवासी विकास मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. कोठली खुर्द येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना आ. डॉ. गावित म्हणाले की, “केवळ बक्षीस मिळविण्यासाठी काम न करता शाश्वत विकासावर भर द्यावा. सर्व योजनांचे पारदर्शकपणे अभिसरण करून शेवटच्या माणसापर्यंत लाभ पोहोचवावा. कोठली खुर्द गावाने राज्यस्तरीय बक्षीस मिळवून आपल्या गावाचा गौरव करावा.” यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, माजी जि.प. अध्यक्षा डॉ. कुमोदिनी गावित, डॉ.…

Read More

अक्कलकुवा (प्रतिनिधी)  अक्कलकुवा ग्रामिण रुग्णालयातील एकात्मिक चाचणी व समुपदेशन केंद्राचे समुपदेशक महेश कुवर हे नंदुरबार जिल्ह्यात राबवित असलेल्या रक्तदान चळवळीची दखल घेऊन त्यांचा आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव करण्यात आला.        महेश कुवर हे गेल्या 15 वर्षा पासुन अक्कलकुवा ग्रामिण रुग्णालयात एकात्मिक चाचणी व समुपदेशन केंद्राचे समुपदेशक म्हणून काम पाहत आहेत. महेश कुवर हे एच. आय. व्ही. एड्स या गंभीर आजाराबाबत समाजात, विद्यार्थ्यांत, तसेच समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष, यांच्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करुन एच. आय. व्ही. एड्स या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हे नियमित काम करत असतांना नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल अनेमिया, थॅलेसिमिया,…

Read More

    नंदुरबार (प्रतिनिधी)    शैक्षणिक क्षेत्रात स्वतःला झोकून देत अनेक अडथळ्यांवर मात करुन विद्यार्थिनींना शिक्षण क्षेत्रात उभं करुन त्यांच्यात नवं चैतन्य निर्माण करुन एक आदर्श निर्माण करणाऱ्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ज्योती रामचंद्र लष्करी यांना अहिल्यारत्न म्हणुन गौरव करण्यात आला.      राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात त्यांच्या समर्पित सेवेचा गौरव करण्यात आला. अक्कलकुवा या  आदिवासी बहुल क्षेत्रातील रहिवासी असलेल्या डॉ ज्योती लष्करी यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले व सोबतच लहान भाऊ बहिणी यांचे देखील शिक्षण पूर्ण केले. डॉ. ज्योती लष्करी यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे डॉ. कविता साळुंके…

Read More