बामदोड (नंदुरबार), दि. २५ सप्टेंबर २०२५ –
शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे जागतिक फार्मासिस्ट दिन सामाजिक जाणीव, सांस्कृतिक उपक्रम आणि आरोग्यविषयक जनजागृतीच्या वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात रक्तदान शिबिराने झाली. यामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली. त्यानंतर मोफत आरोग्य तपासणी शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांनी परिसरात झाडे लावून हरित संदेश दिला.
जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर नाटिका (स्ट्रीट प्ले) सादर करून औषधांचा योग्य वापर, दुष्परिणाम आणि फार्मासिस्टची महत्त्वाची भूमिका जनतेसमोर प्रभावीपणे मांडली.
संस्कृती व कलेला प्रोत्साहन देण्यासाठी रांगोळी स्पर्धा व रिल स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेशासोबत कलात्मक कल्पकता सादर केली. तसेच प्रबोधनात्मक रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये “फार्मासिस्ट म्हणजे आरोग्याचा रक्षक” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विशेष अतिथी व्याख्यान. क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना फार्मासिस्टच्या जबाबदाऱ्या, उद्योगातील संधी व भविष्यातील दिशा याबाबत मार्गदर्शन केले.
या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. भूषण गोपाळ, प्रा. कल्याणी चौधरी, प्रा. जागृती शेवाळे, प्रा. भावना वसावे, प्रा. पूजा गायकवाड, प्रा. हेमलता वाडिले, प्रा. रोहिणी पाटील व प्रा. रोहित सोनावणे यांनी केले.
संस्थेच्या अध्यक्षा योगिता गणेश पाटील, सचिव गणेश गोविंद पाटील आणि प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करून उपक्रमांच्या यशस्वीतेबद्दल समाधान व्यक्त केले.


