नंदुरबार (प्रतिनिधी) सशक्त भारताचे कर्तुत्ववान व लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अनुसूचित जाति मोर्चातर्फे सेवा पंधरवाडा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण तसेच समाजातील गरीब व अपंग व्यक्तींचा सत्कार करून त्यांना “सत्कार मूर्ती” म्हणून गौरविण्यात आले. या कार्यक्रमात अशिफ कुरेशी, जुनेद शेख मनियार व जुबेर गफुर मनियार यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मंसुरी जमात उपाध्यक्ष शब्बीर पिंजारी, सामाजिक कार्यकर्ते अश्पाक काझी व अकिल दादा अन्सारी, अनुसूचित जाति मोर्चा जिल्हा अध्यक्ष अंबालाल साठे, जिल्हा उपाध्यक्ष श्रावण तिजवीज तसेच असलम पिंजारी, फैजान, खालिद मुनशी, शिरीष गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेला हा सेवा पंधरवाडा उपक्रम १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.