लोणखेडा (प्रतिनिधी) जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ३ डिसेंबर रोजी समूह साधन केंद्र लोणखेडा अंतर्गत दगाजी महाराज विद्यालय, पळाशी येथे समता सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्राचे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय जाधव साहेब व केंद्रप्रमुख माननीय तावडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला दिव्यांग शिक्षक, दिव्यांग व सामान्य विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रस्तरीय विशेष शिक्षिका श्रीमती निर्मला देशमुख मॅडम यांनी केले. यावेळी दिव्यांग विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा सत्कार करून त्यांचा गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले तसेच दिव्यांगांविषयी जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली.
माननीय जाधव साहेब यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या महत्त्वावर मार्गदर्शन करत त्यांना सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. तसेच केंद्रप्रमुख तावडे साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा व शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. टी. पाटील सर यांनी केले तर आभार प्रदर्शन भदाणे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक चौधरी सर व सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले. हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.


