नंदुरबार (प्रतिनिधी) शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथे इयत्ता प्रथम वर्ष बी.फार्मसीचा १०० टक्के निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय शैक्षणिक यश संपादन करून संस्थेचे नाव उज्वल केले आहे.
या परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी करत खालीलप्रमाणे यश मिळविले —
✅ प्रथम क्रमांक – कावेरी किशोर पावरा (8.24 CGPA)
✅ द्वितीय क्रमांक – संस्कृती संतोश पाटील (8.21 CGPA)
✅ तृतीय क्रमांक – दिव्याणी राजाराम पटेल (8.00 CGPA)
✅ चतुर्थ क्रमांक – रुपल तुकाराम पाटील (7.79 CGPA)
✅ पंचम क्रमांक – दिव्या अमृत कोळी (7.66 CGPA)
विद्यार्थ्यांच्या या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांचे मार्गदर्शन तसेच सर्व प्राध्यापकवर्गाने दिलेले सातत्यपूर्ण मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचे ठरले.
या उल्लेखनीय निकालाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा योगिता गणेश पाटील, सचिव गणेश गोविंद पाटील, प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


