नंदुरबार – स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर झटलेले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नंदुरबार येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणांद्वारे महात्मा फुले यांच्या समाजपरिवर्तनातील योगदानाचे स्मरण केले आणि त्यांच्या कार्याला उजाळा दिला. मृणाली राजपूत, दिव्या पाटील, नंदू ठाकरे, मोहिनी मोरे, जिया पाटील, ज्ञानदीप वाघ, दक्ष पाटील, यशराज परमार व मोहित राजपूत यांनी सहभागातून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे नियोजन कल्चरल कमिटीतील प्राध्यापिका कल्याणी चौधरी, जागृती शेवाळे, पूजा गायकवाड, भावना वसावे, तश्विता मगरे व श्रद्धा पटेल यांनी समन्वयाने उत्कृष्टपणे केले. संस्थेच्या अध्यक्षा योगिता गणेश पाटील व सचिव गणेश गोविंद पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे व समितीच्या कार्याचे कौतुक केले.
संस्थेमध्ये दिवसभर महात्मा फुले यांच्या विचारांचे व योगदानाचे स्मरण ठेवत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.


