नंदुरबार (प्रतिनिधी) –ग्रामपंचायत होळ तर्फे हवेली येथे “एक दिवस – एक तास – एक साथ” या घोषवाक्याखाली स्वच्छता ही सेवा २०२५ अभियानांतर्गत स्वच्छता महाश्रमदान मोहीम राबविण्यात आली.
या उपक्रमास पंचायत समिती नंदुरबारचे गटविकास अधिकारी सन्मा. अनिल बिराडे साहेब, सरपंच सन्मा. मनीष नाईक, विस्तार अधिकारी सन्मा. युवराज पवार नाना, ग्रामपंचायत अधिकारी श्री. विजय पाटील आप्पा साहेब, ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, सीआरसी प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, घनकचरा संकलन, गटारी व परिसर स्वच्छता या उपक्रमांवर भर देण्यात आला. ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळे ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबद्दल जनजागृती निर्माण झाली.
स्वच्छतेतून आरोग्य आणि विकास साध्य होतो, यावर सर्व मान्यवरांनी भर दिला. ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे मोहीम उत्साहात पार पडली.


