नंदुरबार (प्रतिनिधी) पिंजारी, मन्सुरी, नदाफ समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच करिअर संदर्भात मार्गदर्शन व्हावे या हेतूने नंदुरबार जिल्हा मन्सुरी–पिंजारी–नदाफ सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट आणि जे.के. पार्क इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दि. २१ सप्टेंबर रोजी जे.के. पार्क हॉल, नंदुरबार येथे सकाळी १० वाजता उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मन्सुरी–पिंजारी समाज मुंबई आरीफ अली मन्सुरी, जे.के. पार्क फाऊंडेशनचे अध्यक्ष हाजी डॉ. किस्मत शेख, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हाजी कलीम हाजी हसन मन्सुरी, नगर परिषद शहादा मुख्याधिकारी साजिद मुनाफ पिंजारी, पोलीस निरीक्षक राजन मोरे, रेल्वे स्टेशन अधीक्षक मुंबई अशपाक शेख यांच्यासह धुळे, नाशिक, जळगाव, उधना सुरत, मालेगाव आदी जिल्ह्यांतील पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा अध्यक्ष आरीफ मासूम पिंजारी यांनी केली. त्यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर संदेश दिला. रोमाना इम्रान पिंजारी (संपादक – सा. पोलीस रत्न), ताहीर हुसेन नजीर मन्सुरी (एमएससी कॉम्प्युटर सायन्स, सेट शहादा), रोजमीन आरीफ पिंजारी (डिप्लोमा इंजिनिअरिंग), कैफ हाजी मोहसीन मन्सुरी (बीबीए, एमबीए शहादा) यांनी करिअर मार्गदर्शनाचे टिप्स विद्यार्थ्यांसमोर मांडले. शेवटी प्रदेशाध्यक्ष आरीफ अली मन्सुरी यांनी अध्यक्षीय भाषण करून विद्यार्थ्यांना करिअर घडविण्यासाठी प्रेरित केले तसेच समाजाने संघटित राहून प्रगती साधण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात डॉक्टर, वकील, सीए, इंजिनिअर, पदवीधर, पदव्युत्तर पदवीधारक तसेच दहावी–बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरीफ मासूम पिंजारी (जिल्हाध्यक्ष), जावीद हाजी हसन पिंजारी (उपाध्यक्ष), जुबेर अ. सत्तार मन्सुरी (जिल्हाकार्याध्यक्ष), फिरोजखान मोहम्मदखान पिंजारी (जिल्हा सचिव), सलीम मुशिर मन्सुरी (जिल्हा सदस्य), अॅड. इम्रान याकुब पिंजारी (तालुका अध्यक्ष), हाजी नईम हाजी सादिक मन्सुरी (माजी जिल्हाध्यक्ष), हाजी मो. शफी नबू मन्सुरी (माजी उपाध्यक्ष) यांच्यासह जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


