शहादा (प्रतिनिधी): शहादा येथील साने गुरुजी मित्र मंडळ तर्फे प्राथमिक शिक्षक नरेंद्र दगा कुवर व शांतीलाल रामचंद्र अहिरे यांना प्रतिष्ठेचा ‘खान्देशरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
सदर शिक्षकांचा जिवलग मित्र पंचशील ग्रुप तर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सहपत्नीक सत्कार करण्यात आला. या गौरवाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या कार्यक्रमाला केंद्रप्रमुख नरेंद्र महिरे, केंद्रप्रमुख संतोष पंढरीनाथ कुवर, पत्रकार बापू घोडराज, ग्रामसेवक राजेंद्र आगळे, प्रकाश निकम, प्रवीण खाडे, प्रा. चंद्रविलास बिऱ्हाडे, संगणक चालक मिलिंद शिरसाट, बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वरिष्ठ लिपिक तुकाराम बागले, ग्रामसेवक रमेश बर्डे, पोलीस नाईक धनंजय पवार यांसह जिवलग मित्र परिवाराचे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना केंद्रप्रमुख नरेंद्र महिरे म्हणाले की,
“शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांना शासकीय किंवा संस्थात्मक पुरस्कार मिळवण्यासाठी अनेक प्रक्रिया, प्रस्ताव, कात्रणे सादर करावी लागतात. मात्र साने गुरुजी मंडळाने कोणताही प्रस्ताव न मागविता केवळ ऐकिव माहितीनुसार उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना थेट पुरस्कार देऊन गौरवले आहे. हा पुरस्कार शिक्षकांना खऱ्या अर्थाने न्याय देणारा आहे.” कार्यक्रमाचे आभार केंद्रप्रमुख संतोष कुवर यांनी मानले.


