नंदुरबार (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत नंदुरबार विभागीय आंतरमहाविद्यालयीन महिला कबड्डी स्पर्धा नुकत्याच वसंतराव नाईक महाविद्यालय, शहादा येथे पार पडल्या. या स्पर्धेत विभागातील नऊ महाविद्यालयांच्या संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.
स्पर्धेत जी. टी. पाटील महाविद्यालयाच्या महिला कबड्डी संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत विभागातील तीन संघांचा पराभव करून अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, मात्र जी. टी. पाटील महाविद्यालयाच्या खेळाडूंच्या चपळाई, अचूक पकडी आणि धडाकेबाज चढायांपुढे प्रतिस्पर्धी संघ टिकाव धरू शकला नाही.
संघाची कर्णधार कु. दीपिका पाडवी हिने अष्टपैलू खेळ आणि प्रभावी नेतृत्व करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तिच्या साथीला सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट साथ दिली. या शानदार विजयानंतर नंदुरबार ता.वि. समितीचे चेअरमन तथा विधान परिषद सदस्य श्री. चंद्रकांत रघुवंशी, व्हाईस चेअरमन श्री. मनोज रघुवंशी तसेच सर्व संचालक मंडळ यांनी संघाचे अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. एम. जे. रघुवंशी यांनी खेळाडूंच्या परिश्रमाचे कौतुक करत सांगितले की, “हा विजय महाविद्यालयासाठी अभिमानाचा क्षण आहे. कठोर परिश्रम आणि दृढ संकल्पाचे हे यश असून खेळाडूंना पुढेही सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.”
खेळाडूंच्या अभिनंदन सोहळ्यात महाविद्यालय उपप्राचार्य डॉ. एस. पी. पाटील, डॉ. एम. के. कदम, कुलसचिव श्री. सुरेश रघुवंशी, क्रीडा संचालक डॉ. टी. एल. दास तसेच प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. जी. टी. पाटील महाविद्यालयाच्या महिला संघाचा हा विजय संपूर्ण नंदुरबार विभागासाठी अभिमानाचा ठरला आहे.
Trending
- शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे इंडक्शन प्रोग्राम व पालक सभा संपन्न
- बिलाडी धरण प्रकल्पाला गती; दीड दशकांच्या अडचणींना अखेर मार्ग डॉ. विजयकुमार गावित यांची पत्रकार परिषदेत माहिती; खासदार डॉ. हिना गावित यांची उपस्थिती
- पळाशी येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त “समता सप्ताह” उत्साहात साजरा
- शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा १०० टक्के निकाल ; विद्यार्थ्यांनी उंचावला यशाचा आलेख
- घरकुल व नरेगा कामांबाबत अधिकाऱ्यांचे आंदोलन ; नंदुरबारमध्ये प्रशासनाला निवेदन
- महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी–२०२५ : शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये आदरांजली
- शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे राष्ट्रीय संविधान दिन उत्साहात साजरा
- वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का; नंदुरबारचे युवा जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात


