नंदुरबार/पावला (प्रतिनिधी) – ASK फाउंडेशन मुंबई यांच्या आर्थिक सहाय्याने राबविण्यात येत असलेल्या समृद्ध किसान प्रकल्पा अंतर्गत इंडियन ग्रामीण सर्व्हिसेस (IGS) व CYDA यांच्या संयुक्त विद्यमाने पावला येथे रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
महोत्सवाचे सूत्रसंचालन मोहसीन मणियार यांनी केले, तर प्रास्ताविक प्रवीण अहिरे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र मोरे (DDM, नाबार्ड), दीपक पटेल (प्रकल्प संचालक, आत्मा), पैठणकर साहेब (LDM, SBI), पंकज पाटील (मॅनेजर, ASK फाउंडेशन), सौ. आरती देशमुख (विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोळदा), कांता बनकर (माविम, नंदुरबार), डॉ. शांताराम बडगुजर (सचिव, CYDA), तसेच स्थानिक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
मेळाव्यात तब्बल ३५ ते ४० प्रकारच्या रानभाज्यांच्या पाककृतींचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी दीपक पटेल यांनी रानभाज्यांचे जीवनातील महत्व व संवर्धनाची गरज अधोरेखित केली. रवींद्र मोरे यांनी नाबार्डच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. तर पैठणकर यांनी अशा महोत्सवांचे आयोजन शहरांमध्येही करण्याची गरज व्यक्त करत बँकिंग क्षेत्रातून सहकार्याचे आश्वासन दिले. सौ. आरती देशमुख यांनी रानभाज्यांचे आरोग्यदायी फायदे सांगून महिलांना वर्षभर उपलब्धतेसाठी सोलर ड्रायर उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
पाककला स्पर्धेत तीन महिलांची विजेते म्हणून निवड झाली. त्यांना बक्षिसे देण्यात आली, तर सहा महिला व एका पुरुषाला प्रोत्साहनपर पुरस्कार व प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाची सांगता CYDA संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक जयश्री सपकाळे यांनी आभार प्रदर्शन करून केली. रानभाजी महोत्सव यशस्वी करण्यासाठी IGS व CYDA संस्थेचे कर्मचारी, जीविका मित्र व CRP यांनी विशेष परिश्रम घेतले.
Trending
- शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे इंडक्शन प्रोग्राम व पालक सभा संपन्न
- बिलाडी धरण प्रकल्पाला गती; दीड दशकांच्या अडचणींना अखेर मार्ग डॉ. विजयकुमार गावित यांची पत्रकार परिषदेत माहिती; खासदार डॉ. हिना गावित यांची उपस्थिती
- पळाशी येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त “समता सप्ताह” उत्साहात साजरा
- शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा १०० टक्के निकाल ; विद्यार्थ्यांनी उंचावला यशाचा आलेख
- घरकुल व नरेगा कामांबाबत अधिकाऱ्यांचे आंदोलन ; नंदुरबारमध्ये प्रशासनाला निवेदन
- महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी–२०२५ : शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये आदरांजली
- शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे राष्ट्रीय संविधान दिन उत्साहात साजरा
- वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का; नंदुरबारचे युवा जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात


