शहादा (प्रतिनिधी) आदर्श परंपरा व संस्कृतीची जपणूक करणे नवीन पिढीची जबाबदारी आहे.त्यासाठीच कै.अण्णासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.या वक्तृत्व स्पर्धेला अकरा वर्षाची परंपरा आहे,असे प्रतिपादन पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांनी केले.
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ व श्री.पी.के.अण्णा पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै.अण्णासाहेब पी.के.पाटील स्मृती प्रित्यर्थ आंतर महाविद्यालयीन विभागीय पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर विश्वेश्वरय्या सभागृहात झाले. उद्घाटन समारंभ प्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी मंचावर मंडळाचे उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, माजी उपनगराध्यक्ष दीपकभाई पटेल, शहादा पालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक के.डी. पाटील, मंदाने येथील माजी उपसरपंच अनिल भामरे,परीक्षक सतीश पप्पू (जळगाव) व सौ.स्मिता दिक्षित (जळगाव),वक्तृत्व स्पर्धेचे मार्गदर्शक माजी प्राचार्य डॉ. विश्वासराव पाटील, माजी प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, विविध ज्ञानशाखांचे प्राचार्यांची उपस्थिती होती.बापूसाहेब दीपकभाई पाटील पुढे म्हणाले,शालेय व महाविद्यालयीन जीवनात आदर्श परंपरांचे संस्कार होणे आवश्यक आहे.आपण जन्माला आलो आणि त्याचे सार्थक व्हावे असे जर वाटत असेल तर सामाजिक दृष्टीने सेवाभाव जपणे गरजेचे आहे. वक्तृत्व स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ. विश्वासराव पाटील यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन प्रा. डॉ. विजयप्रकाश शर्मा यांनी केले.आभार प्रा. डॉ. चंद्रशेखर सुतार यांनी मानले. या वक्तृत्व स्पर्धेत धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील 38 विविध महाविद्यालयांच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला.अनेकांनी स्वदेशी, पर्यावरण संवर्धन, निसर्गाच्या घडामोडी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींची ज्ञानसाधना याविषयावर आपले मनोगत व्यक्त केले मात्र तिसऱ्या महायुद्धाकडे जगाची वाटचाल याविषयी एकाही स्पर्धकाने मनोगत व्यक्त केले नाही. यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिकांसह स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील व सचिव श्रीमती कमलताई पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. पटेल, प्राचार्य डॉ.विश्वासराव पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्यांची उपस्थिती होती. मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धा संयोजन समितीच्या सदस्यांनी स्पर्धेचे नियोजन केले होते.
दरम्यान, सकाळी सात वाजेपासूनच कै.अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या लोणखेडा येथील पूर्णाकृती पुतळा तसेच मंडळाच्या प्रशासकीय कार्यालयासमोरील स्मारकस्थळी अभिवादनासाठी मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, श्रीमती कमलताई पाटील,सौ.जयश्रीबेन दीपक पाटील,सौ.माधवीबेन मकरंद पाटील, सौ.डॉ. रुचिता मयूर पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक, सहकारिता, व्यावसायिक, वैद्यकीय, प्रशासकीय, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर,विद्याश्रम परिवारातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
◆◆ पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेचा निकाल असा ◆◆
★ प्रथम– विवेक पितांबर पाटील (व्यवस्थापन प्रशासन इन्स्टिट्यूट कबचौ उमवी जळगाव)
★ द्वितीय– अनुष्का सचिन विसपुते (आरसी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन एन्ड रिसर्च शिरपूर) व कल्पेश संजय माळी (ब्रह्मा व्हॅली इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट)
★ तृतीय– शिवानी रमेश मौर्य (आरसी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी शिरपूर)
★ उत्तेजनार्थ– कुंजन प्रवीण पाटील (आरसी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन रिसर्च शिरपूर) व पवन बडग्या वळवी (पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय शहादा)